Sunday, 9 July 2017

शुभचिंतन


क्षण अन् क्षण असा यावा

नवनिर्मितीचा आनंद घ्यावा

भूतकाळातील आठवणींचा ठेवा

आजही डोळ्यांत भरुन राहावा

ज्या ज्या क्षणांनी भरभरुन दिले

आपुलकी, जिव्हाळा, मायेचे

सुखद वरदान दिले

त्या त्या क्षणांनी माझा

नमस्कार स्वीकारावा

 

आयुष्याचे खेळ वेगळे

काळवेळाचे ढंग वेगळे

अपरिचित आयुष्याचे

गूढ आजवर आकळे

भूतकाळातील अनुभवांनी

वर्तमानाचा वेध घ्यावा

भविष्यातला मार्ग दाखवावा

 

इवल्याशा आज रोपट्याचा

पुढे मोठा वृक्ष व्हावा

आजच्या जिद्द, प्रयत्नांना

आजच्या चांगल्या आकांक्षांना

स्वप्नपूर्तीचा आनंद मिळावा

अनंत ज्ञानप्रेरणेने, बळ, निष्ठेने

आयुष्याचा पेला भरत राहावा

 

अनाथांना नाथ मिळावा

गरीबांना न्याय मिळावा

अपंगांना सन्मान मिळावा

अंधाराला प्रकाश मिळावा

निराशेने झाकोळल्यांना

आशेचा किरण दिसावा

हरवलेल्यांना मार्ग गवसावा

प्रेमाचा प्रेमळ साथीदार मिळावा

अक्षय प्रकाश सुख चांदण्यांचा

या भारतभूवर पडत राहावा

सोन्याचा धूर पूर्वीचा हरवलेला

फिरुन परत इथे पसरावा

 

अन्याय, अत्याचार, कुनीतीचा

इरादा कायम नष्ट व्हावा

सुविचारांचे मळे फुलूनी

चारित्र्यसंपन्न वसंत यावा

प्रत्येकाच्याच व्यक्तित्त्वाला

प्रतिभेचा सुगंध यावा

कर्तबगार व्यक्तीव्यक्तींनी

देशाला सन्मान मिळावा

अशा आलेल्या, येणा-या क्षणाक्षणाला

सोन्याचांदीचा वर्ख चढावा

सोनेरी क्षणांच्या सोबतीत...

जीव न् जीव बहरुन यावा

जीव न् जीव आनंदित व्हावा

जीव न् जीव फुलून यावा....!!!

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

Tuesday, 4 July 2017

विठ्ठला रे विठ्ठला


विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

आज भजनात तुझ्या दंग

आज कीर्तनाला चढे रंग

आज आषा एकादशीला गाऊ

तव नामाचा रे अभंग

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

 

आसमंत दुमदुमे सारा

भक्तीचा तव महिमा न्यारा

भक्तीने भरला ओतप्रोत

सहृदयी मनांचा गाभारा

शीळ घाली वारंवार आज वारा

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

 

विठ्ठल रखुमाई तू

भक्तांची माय माऊली तू

वरदायी, अखंड साऊली तू

भेटण्या तव आतुर झाला

दर्शन घेण्या तव जीव आसुसला

देहभान हे विसरुन सारा

विठ्ठल नामाचा गजर झाला

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

 

आषाढी, कार्तिकीला भक्तगणांचा

मेळा दाटला

भक्तीरसात न्हाऊन निघाला

चन्द्रभागेचा काठ सारा

साकडं घालती प्रेमाचं सारे

लाडक्या सावळ्या विठूला

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

 

तुळशीमाळ शोभे गळा

कासे पितांबर पिवळा

प्रसन्न मूर्ती तू घननीळा

कंठी शोभे कौस्तुभ मणिमाला

विटेवरी उभा राहूनी पोसितो

अवघ्या जगाचा संसार

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

नसानसातून भिनले नाम विठ्ठल

देहमंदिरात तू स्थिर विठ्ठल

पंढरीचा राजा देव विठ्ठल

ओसंडून वाहो या धरणीला

तव प्रसन्न कृपेचा महापूर

मिळो तव कृपे चैतन्य साठा भरपूर

दुःखान्त होवो, सुख दाटूनी येवो

अवघ्या जीवन कळा होवो दूर

हेच मागणे तुला आज विठ्ठला

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

विठ्ठला रे विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

Sunday, 2 July 2017

जिंदगी


मेरे हिस्से में तू कितनी???

ये तो मुझे मालूम नहीं

....लेकिन....जितनी भी तू मिले....

प्यार की गहराईयाँ दामन छू ले

वफा से रिश्तेदारी मुठ्ठी पकड ले

अस्मानी ऊंचाई आँचल में समा ले

जिंदगी......!!!!

 

मेरे हिस्से में तू कितनी???

ये तो मुझे मालूम नहीं

....लेकिन....जितनी भी तू मिले....

बैर, दबोच से छुटकारा मिले

कोसों दूर रहकर भी कोसा हमें किसीने

दुःख दिया, दर्द दिया किसीने

फिर भी.....

उन्हें राह में राहत मिले

वक्त का पहिया चाहे कैसा भी चले...

तू बदलेगी कभी...और ना कभी

तेरी फितरत बदले

 

जिंदगी......!!!!

 

मेरे हिस्से में तू कितनी???

ये तो मुझे मालूम नहीं

....लेकिन....जितनी भी तू मिले....

कोशिश से कामयाबी तक चले

चाहे कितनी बार हार मिले

फिर भी.....जीत की ओर कदम चले

अपनों से अपनापन मिले

दोस्ती की ना दिवार टूटे

मन के उजालों का...

ना कभी सूरज ढले

 

जिंदगी......!!!!

 

मेरे हिस्से में तू कितनी???

ये तो मुझे मालूम नहीं

....लेकिन....जितनी भी तू मिले....

ऐसी ही तू चलती चले

उम्र के साथ साथ.....

बढते बढते खुशियाँ मिले....

 

जिंदगी......!!!!

 

मेरे हिस्से में तू कितनी???

ये तो मुझे मालूम नहीं

....लेकिन....जितनी भी तू मिले...

जितनी भी तू मिले....

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

जुलै २०१७.