स्वयंप्रकाशी
अढळ तारा तो
तमा
न बाळगता मात देणारा तो
संगीत
सप्तस्वरांचा मैत्र तो
पाव्यातला
अंतर्नाद मुकुंद तो
सुचित्र
रेखाटणारा चित्रकार तो
हरहुन्नरीतला
हर हुनर तो
प्रातःसमयीची
आशा तो
माध्यान्ह
काहिलीतला शीतल तो
मन
काहूर संध्येतला किरण तो
स्त्रीमनाचा
सहृदयी पुरुष तो
विद्युल्ल
तारतंत्री शिक्षक तो
साधा
सरळ निर्मोही तो
साथसंगतीतला
निःसंग स्वामी तो
अविश्वासी
दुनियेतला विश्वास तो
डोळ्यांतील
अश्रूंची मोकळी वाट तो
आयुष्यरणांतला
मजबूत खांब तो
माया
मोठी छाया मोठी वृक्षवल्ली
तो
कुळी
कन्या पुत्रांसाठी कल्पवृक्ष तो
सुखदुःखाचे
चढण चढत जिंकणारा
प्रिय
माझा पिता तो
सुखदुःखाचे
चढण चढत जिंकणारा
प्रिय
माझा पिता तो
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२२
सप्टेंबर २०१९.