पाहूनी
गजरा
तुझ्या
केसात
प्रीतीचा
धुमारा
फुटला
मनांत
गोड
मधुर
शब्दांत
सुंदर
कोमल
फुलांत
मृदुल
धुंद
आठवणींत
हळूवार
तरल
स्वप्नांत
प्रीतीच्या
धाग्यात
गुंफलेला
तो
गजरा...
गुंफितो
मजला
तव
प्रीतीत
म्हणूनच
म्हणतो
सखे
गं
म्हणूनच
म्हणतो
प्रिये
गं
माळ
असा
केसांत
तू
कधीतरी
असा
गं
जरा....गजरा...
माळलेला
तुझ्या
केसातला
गजरा
गजर
उठवितो
मम
हृदयात
बकुळी,
जाई,
जुई
की
मोगरा
गज-यात शोभसी तू गं सुंदरा
बेधुंद
सुवास
मोहवी
एका
क्षणांत
म्हणूनच
म्हणतो
सखे
गं
म्हणूनच
म्हणतो
प्रिये
गं
माळ
असा
केसांत
तू
कधीतरी
असा
गं
जरा....गजरा...
गजरा
तुझा
अस्तित्व
तुझे
भरुन
राहिल
पुरुन
उरेल
फिरुन
वळवेल
मला
तुझ्यात
दरवळेल
सुगंध
हा
सारा
माझ्या
श्वासाश्वासात
अंतरा
अंतराने
फुलेल
हळूहळू
मम
अंतरीचा
गाभारा
म्हणूनच
म्हणतो
सखे
गं
म्हणूनच
म्हणतो
प्रिये
गं
माळ
असा
केसांत
तू
कधीतरी
असा
गं
जरा....गजरा...
लावण्यवती
तव
देखणा
शृंगार
रुपयौवन
मुखडा
तव
लाजरा
गजरा
फुलाफुलांचा
तुझा
साजिरा
गुलमोहर
बहरवी
मम
तनामनांत
म्हणूनच
म्हणतो
सखे
गं
म्हणूनच
म्हणतो
प्रिये
गं
माळ
असा
केसांत
तू
कधीतरी
असा
गं
जरा....गजरा...
म्हणूनच
म्हणतो
सखे
गं
म्हणूनच
म्हणतो
प्रिये
गं
माळ
असा
केसांत
तू
कधीतरी
असा
गं
जरा....गजरा...
'गजरा' हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं ना!! सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेशआहे.. गोवा,कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत. गजरा-सौंदर्य हा संबंध सर्वश्रुत आहेच.
सध्या
तीव्र
उन्हाळा
सुरु
आहे.पण निसर्गात पाहिलं तर 'मोगरा,चाफा,बकुळ ' यांना बहर आला आहे. बघा!! किती काळजी आहे निसर्गाला आपली!!
या
सर्वात
जास्त
सुगंध
पसरविणाऱ्या
फुलांची
योजना
उन्हाळ्यातचं केली गेली आहे.आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत.म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा, नाही का? कसा? तर सर्वात सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे!! केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत राहतो.मन शांत करतो.अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच...
स्त्री
शरीर
हे
मुख्यतः
उष्ण
धर्माचे
मानले
जाते.दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या pituitary gland च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वाहत असतात.त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते.गजरा,किंवा फुलांचा वास नाकाद्वारे जेंव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथींचे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. परिणामी स्त्रीयां मधील संतुलन रहाण्यास मदत होते.
मनोरोगात
तर
फुलांना
खूप
महत्व
आहे.
स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो.
परदेशातील
बाक
थेरपी,अरोमा थेरपी या काय आहेत? फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.पण आपलं कसंय, 'घर की मुर्गी... 'भरगच्च पैसे देऊन अरोमा थेरपी घेऊ..पण गजरा माळून old fashioned होणार नाही.. असो..
आताच्या
काळात
बहुतांश
स्त्रिया
नोकरी
करतात.
अनेकजणींना
गजरा
लावायची
आवडही
असते;
परंतु
शाळा,
कॉलेजमधील
नोकरी,
सरकारी
कार्यालयातील नोकरी किंवा कंपनीतील नोकरी, कसा लावायचा गजरा?? चांगलं दिसेल का तिथे?? या सर्व विचारांमुळे 'गजरा' जरा काय? नेहमीच बाजूला राहतो!! कित्तीही आवड असली तरीही!! आता 'गजरा' फक्त सण-समारंभातच लावला जातो!! तोही मोठे केस असलेल्या स्त्रियाच लावू शकतात!! जुन्या मराठी आणि हिन्दी सिनेमांतून तर हमखास
गज-याचा scene असायचा!! माझे बाबा दरवर्षीच्या दिवाळीतील चार दिवसात मला व आईला गजरा आणत. बाबांनी आपुलकीने आणलेल्या त्या गज-याला त्यांच्या गोड, निरागस प्रेमाचा स्पर्श असे. 'गजरा'....!! खरं म्हणजे छोटीशी भेट. त्यातली फुलंही काही तासांनी कोमेजणार!! पण आपल्या आवडत्या व्यक्तीने आणलेला गजरा माळण्यात आणि तो लावून सण-समारंभांना मिरविण्यात एक वेगळीच भावनिक माळ जपली जाते....एवढं मात्र नक्की.....
मग
काय
मैत्रिणींनो!!
मग
काय
सख्यांनो!!
लावणार
नं
तुम्ही
सवडीने
असा
कधीतरी
मोहक
गजरा.....????
ठरवा
की
नक्की
आजपासूनच!!!
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२६/४/२०१७.