Saturday, 31 December 2016

शुभेच्छा २०१७

  जुन्या वर्षाचा दूर करु फाफट पसारा
स्वागत करु वर्ष आले दोन हजार सतरा

 मन कप्प्यांची द्वारे आज खुली करा
नुसतीच घराची नाही तर मनाचीही साफसफाई करा दूर गेलेल्या नात्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करा

 कुणालाही दुखवण्याचा संकल्प करा
३१ डिसेंबरच्या रात्री जरा वेगळ्या दंगलीचा विचार करा

     दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल महान विचारांची

   दंगल..दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल कणखर खंबीरतेची

  दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल जिज्ञासू ज्ञानाची

  दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल नवनवीन सद्गुणांची

  दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल मंगल गोष्टींची

  दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल संकल्पपूर्तीच्या स्वप्नांची

  दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल तुमच्या आमच्या गोड नात्याची

  दंगल...दंगल...दंगल...
 करु मनांत दंगल आठवणींच्या गुंफणीची

      धांगडधिंगा नुसता
     धम्माल मस्ती नुसती
   वाईट दंगलींना या दूर दूर सारा
पसरु द्या आसमंतात सर्वदूर सकारात्मकतेचा वारा

 जिद्द, ज्ञान, समृध्दीचा होवो कधीच कोंडमारा सत्य संकल्प आणि सिध्दीसाठी सर्व झटू या जरा

जोडुनि मनामनांना माणुसकीच्या भिंती उभारा आयुष्यात अज्ञानी काजळीला नसो थारा

  अंतरीच्या माझ्या या भावभावना
   सदिच्छा बनून पसरो दिगंतरा
सुख, समृध्दी, आरोग्य, आनंदाचा घडा सर्वांना सापडो खराखुरा

   शुभेच्छारुपी माझी ही श्रध्दासुमनें
     हृदयात आज आपण भरा

     मृदुला मुकुंद पाटखेडकर.

      ३१ डिसेंबर २०१६.

Friday, 30 December 2016

क्या क्या पाया??.......

 बिती हुई गलिंयों से फिर गुज़रना मुझे मंजूर नहीं l भूतकाल के आइने में झांककर अपने ही चेहरे को फिर से देखना मेरा दस्तूर नहीं ll

     जो हुआ वो बीत गया
   पलों में उन; मैं जी भर जिया l
जो मिला, जैसा मिला, जिंदगी से मिला या और किसीसे मिला l मैनें हमेशा दिल खोलके सबका स्वागत किया ll

    जो गया उसका गिला नहीं l
    जो छूटा उसका शिकवा नहीं ll

 काली कलुटी रातों की कितनी भी हो घनघोर छाया l बाहर तो रहता ही रोज़ सुबह की धूप का उजाला l अन्दर भी बहुत बार बुझे दियों को मैने जलाया ll

    मन की शक्ती को भीतर समेटकर l
  उजालों की राहों पर हमेशा चलकर l
 बीते हुए गीले शिकवों को भूलकर l
बीती हुई छोटी छोटी घडियों से सीख लेकर l
कल के सूरज की रोशनी का अरमान सीने से लगाया l आज का पल, आज की घडी, आज के दिन को अंतिम समझकर जीने का अंदाज पाया ll

खुशनसीब हूँ मैं जिन्होने मुझे जिंदगी को जिन्दादिली से जीना सिखाया l पत्थर को भी ठोकर लगाना सिखाया ll  काँटोंपर भी चलना सिखाया ll हिम्मतवाला बनाकर हिम्मत से काम लेना सिखाया ll

किसी भी परिस्थिती में डंटकर मुकाबला करना सिखाया ll नाकामयाबी में भी कामयाबी की ओर जाना सिखाया ll हर हाल में मुझे उन्होने मुस्कुराना सिखाया ll

   और क्या क्या बताऊँ दोस्तों तुम्हें l
  मेरे माँ बाप से मैनें क्या क्या पाया l
    कुछ खोया नहीं आजतक,
     सबकुछ पाया ll
उन्होने ही तो मेरी जिंदगी को खुशनुमा बनाया l उन्होने ही तो मेरी जिंदगी को खुशनुमा बनाया ll

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        ३०/१२/२०१६.

Wednesday, 28 December 2016

जखम

    जखमेला नसतो काळ वेळ
       कधीही येते
    लवकर मात्र जात नाही
   
    काळ तिचा ठरलेला असतो
   भरुन यायला वेळ लागतो

   जखम शरीराची वेदना देणारी,
भळभळणारी, टोचणारी, त्रास देणारी
 भरुन येईपर्यन्त व्रण कायम ठेवणारी

 जखम मनाची; बोचणारी, जिव्हारी लागणारी, घाव घालणारी, शल्य वाटणारी 'जाऊ दे नं'!! म्हणून जाणारी जख्खं म्हातारी होऊन मनांत जम बसविते ती जखम!!!!!
मनाच्या तळाशी तळ ठोकून बसते ती जखम!!!!!

या जखमेला नसतो लेप आणि मलमांचा थर
जखम मनाची अंगावर आणते शहारं
आठवण येता तिची चित्तं होतं कावरं बावरं
बोलाविताही ती बोलाविते आपल्याला ये रं ये रं
  ती येताच माजतं चित्तात काहूर

  जखम मनाची मनांत करते दंगल
जखमेवर मीठ चोळलं की ती घडविते अमंगल
 कुठूनही येते, कुणाकडूनही येते
    ती असते चंचल
आयुष्य संपेपर्यन्त आयुष्यात जखमांचं असंच येत राहतं वादळ

भरुन काढता काढता तिला जीवाची
   उडत राहते धांदल
जखमाच जखमांच्या करीत राहतात अदलाबदल
तीव्र अतितीव्र होऊनी ती वाढविते मनातला सल येता जखमा मनाला राहावे लागते स्थिर, निश्चल जखमांचे घाव घेराव घालूनि कोमेजून टाकतात; नाजूक मन सुकोमल

आयुष्य आहे तर जखम आहे; किंबहुना
जखमा आहेत मनामनांत जमा
दिल्या असतील आपण इतरांना अशा मनस्वी जखमा; तर... तेंव्हाच्या तेंव्हाच मागून टाकावी क्षमा

जखमांना या औषधं पुरवित पुरवितच आयुष्यात तू चल, पुढे पुढे चल तूपुढे पुढे चल, मित्रा, चल, चल, चल, चल!!
  जखमा तर तुला बनवितीलच विकल
मनाला उभारी देऊन तुलाच लढवायची आहे शक्कल

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        २८/१२/२०१६.