'माझ्या' कवितेप्रमाणे-
नारी
तुला
वेळेनुसार
बलवान
व्हायचं
आहे
नारी
तुला
काळानुसार
बदलायचं
आहे
फोडून
टाक
ती
काचेची
भिंत
जिच्या
पलीकडचं
जग
तुला
हिणवत
राहतं
आणि
म्हणतं;
'तुला
नाही
हे
जमणार'?
'तुझी धाव इथपर्यंतच'....!!!
पी.
टी.
उषासारखं
तुला
यशासाठी
धावायचं
आहे
नारी
तुला
वेळेनुसार
बलवान
व्हायचं
आहे
नारी
तुला
काळानुसार
बदलायचं
आहे
धरणीसारखी
सहनशील,
प्रेमळ
माया
तू
पुरुषांना
आयुष्यात
साथ
देणारी
छाया
तू
प्रकृतीचा
समृध्द
मूळ
पाया
तू
आज
तुझ्या
मुळावरच
घाव
घालती
सारे
समस्यांच्या
मुळाशी
जाऊन
तुला
तोंड
द्यायचं
आहे
नारी
तुला
वेळेनुसार
बलवान
व्हायचं
आहे
नारी
तुला
काळानुसार
बदलायचं
आहे
युगानुयुगे
तुझ्यापुढती
ह्या
अवघड
वाटा
पावलागणिक
टोचू
पाहतो
तुझ्या
पायात
काटा
संधी
साधू
लागतो
अन्याय,
अत्याचार
गाठून
तुझी
वाट,
दाबून
तुझा
आवाज
विरोधातला
आवाज
बुलंद
तुला
करायचा
आहे
नारी
तुला
वेळेनुसार
बलवान
व्हायचं
आहे
नारी
तुला
काळानुसार
बदलायचं
आहे
निराश,
बेचिराख
झालं
आयुष्य
तरी
'फिनिक्स' सारखं राखेतून वर यायचं आहे
पंखांना
बळ
देत
आकाशात
उंच
उडायचं
आहे
नारी
तुला
वेळेनुसार
बलवान
व्हायचं
आहे
नारी
तुला
काळानुसार
बदलायचं
आहे
आयुष्याची
तार
छेडत,
तारेवरची
कसरत
तुझी!!
जगाला
घडविण्याची
अजब
ताकद
तुझी!!
उभी
होतीस
ताकदीनिशी,
उभी
राहशील
यापुढेही.....
तुझ्या
अस्तित्वाची
लढाई
तुलाच
जिंकायची
आहे
नारी
तुला
वेळेनुसार
बलवान
व्हायचं
आहे
नारी
तुला
काळानुसार
बदलायचं
आहे.
'माझ्या' वरील कवितेप्रमाणेच यावर्षीच्या जागतिक महिला दिनाची Theme आहेः- Be Bold for Change. 'वेळेनुसार बलवान व्हा' आणि 'बदला.' जागतिक महिला दिन युनो संघटनेने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन वर्ष म्हणून जाहीर केला. फार फार पूर्वापार काळापासून स्त्रियांसाठी कायमस्वरुपी 'चौकट' आखली गेली. या चौकटीबाहेरचे जग स्त्रीने बघायचे नाही असा ठराव पुरुषप्रधान संस्कृतीने मांडला. ती अबला आहे, तिच्यात काही धाडस करण्याची क्षमता नाही; तिने 'चूल आणि मूल' यातच धन्यता मानावी. 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' या उक्तीप्रमाणे कोणत्याही स्वातंत्र्याची, विचार मांडण्याची, आवाज उठविण्याची मुभा तिला नाही, पुरुषांच्या आधारानेच तिला जीवन जगणे भाग आहे....आणि....जी विरोध करेल, आवाज उठवेल, तिला जीवन जगणे मुश्कील होईल असे वर्तन समाजातील काही घटक करत असत. पूर्वीच्या चौकटीतून आजची स्त्री चौकटीबाहेरचं जग बघत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाची एक एक पायरी यशस्वीरित्या चढत आहे. आज ती वैज्ञानिक आहे, डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, प्राध्यापिका आहे, खेळाडू आहे, देशाच्या सर्वोच्च पदांवर विराजमान झाली आहे; तरीही तिच्या अस्तित्वाची लढाई संपलेली नाही; कारण आजच्या काळानुसार बदलते विचार, बदलता काळ, बदलती आव्हाने, यानुसार तिलाही बदलण्याची आवश्यकता भासू लागली आहे. घर सांभाळणे, नोकरीतील विविध आव्हानांशी सामना करणे यात तिची तारेवरची कसरत होत आहे.
स्त्री
ही
प्रकृतीचा
मूळ
पाया
आहे.
तिला
पृथ्वीची
आणि
गाईची
उपमा
दिली
जाते.
पृथ्वीवर
आपण
मानव
कितीतरी
घाव
घालतो,
तिला
खड्डे
पाडतो;
तरीही
ती
आपल्यासाठी
हे
सगळे
घाव
सहन
करते
आणि
पहिला
पाऊस
पडला
की
पुन्हा
मातीला
सुगंध
आणते.
गाईचा
स्पर्श,
गाईपासून
मिळालेले
दूध,
गोमूत्र,
शेण
हे
आपल्या
संस्कृतीत
पवित्र
मानले
जाते.
निष्पाप,
निर्मळ
आणि
पवित्र
अशा
पृथ्वी
आणि
गाईप्रमाणेच
तर
स्त्रीचे
अस्तित्व
समृध्द
आहे.
माहेरी
आणि
सासरी
गरजेनुसार
प्रत्येकाच्या मन, इच्छा, आकांक्षा यांना ती प्राधान्य देते; प्रसंगी स्वतःचे मन मारुन कुटुंबियांच्या आनंदात उत्साहाने सहभागी होते, म्हणून तर तिला 'दुहिता' असेही म्हणतात!! दोन्ही कुळांचे हित साधणारी!! ..... पण जी प्रकृतीचे मूळ आहे, तिलाच पायमल्ली तुडविणे, तिच्या मुळावर घाव घालणे, तिचा अपमान करणे, तिचे अस्तित्व नाकारणे, तिच्याविषयी कृतघ्न वर्तन करणे, शासकीय किंवा खाजगी कार्यालयातून तिचा लैंगिक छळ करणे, तिला केवळ उपभोग्य वस्तू समजणे, तिचे हरप्रकारे शोषण करणे, सर्व अनीतींचा वापर करुन तिच्यावर बळजबरी करणे, अशा कितीतरी बातम्या आपण आजही टी.व्ही. वर बघतो आणि वृत्तपत्रांतून वाचतो. याचे उत्तर एकच!! आजच्या २१व्या शतकातही 'स्त्री' सुरक्षित नाही.
काळानुसार
झाशीची
राणी,
जिजाबाई,
मुक्ताबाई,
इंदिरा
गांधी,
सरोजिनी
नायडू
ह्यांनी
खंबीरपणे
विरोधाला
न
जुमानता
सर्व
शक्तीनिशी
बळ
एकवटले
आणि
स्त्री
शक्तीचे
विराट
दर्शन
या
जगाला
दिले,
तसेच
सामर्थ्य
आणि
शक्ती
एकवटण्याची
गरज
आजच्या
स्त्रीने
स्वतःत
उतरविणे
महत्वाचे
ठरेल.
आजचा
काळ
हा
युध्द,
आक्रमण
आणि
लढायांचा
नसला
तरी
स्त्रियांची
होणारी
पिळवणूक,
तिला
मागे
खेचण्याची
काही
पुरुषांची
वृत्ती
याविरुध्दची
लढाई
आजही
स्त्रीला
लढायची
आहे.
पूर्वीपेक्षा काळ खूप बदलला असला तरी ब-याच ठिकाणी पुरुषी मानसिकता बदललेली नाही. स्त्री-पुरुष समानता येऊन, सकारात्मक दृष्टीने स्त्रियांच्या समस्येकडे पुरुषांनीही माणुसकीने बघितले तर आणि प्रत्येक स्त्रीला झगडण्यासाठी, झुंजण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी समाजातील समस्त पुरुषवर्गानंही पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे; कारण स्त्रियांमुळेच जग आहे, आपण सर्व आहोत ही भावना मनात ठेवली तर किती चांगले होईल!! पुरुषांचा पुरुषार्थही स्त्रीमुळेच शाबूत आहे. स्त्रियांच्या पुरुषार्थाची नवी चौकट उलगडण्याची आत्ताच खरी वेळ आली आहे.
महिला
दिनानिमित्त
अनेक
कार्यक्रम,
सत्कार
आणि
भाषणांची
रेलचेल
असते.
सर्व
क्षेत्रात
उत्कृष्ट
कामगिरी
करणाऱ्या
स्त्रियांचा
सत्कार
या
दिवशी
केला
जातो.
पूर्वीच्या
राष्ट्रपती
प्रतिभा
पाटील
यांनी
महिला
सक्षमीकरण
आणि
सबलीकरणावर
जास्त
भर
दिला
होता.
प्रत्येक
घरातील
स्त्रिया
सक्षम
आणि
सबल
झाल्या
तरच
त्या
वेळेनुसार
बलवान
होतील.
गतिमान
काळासोबत
गतिमान
होण्याचा
संकल्प
करतील
तर
सुराज्यांच्या इतर कल्पना आणि स्वप्नांसोबतच स्त्रीच्या अस्तित्व, कर्तृत्व आणि मानसन्मानाचं सुराज्य स्वप्नातून सत्यात उतरेल यात शंकाच नाही.
स्त्रीच
स्त्रीची
शत्रू
न
होता,
सखी
बनून,
प्रत्येक
स्त्रीमध्ये
असलेल्या
प्रतिभारुपी
सौंदर्याचं
प्रकटीकरण
करुन,
मातब्बर,
जिद्दी,
निर्भय
महिलांची
फळी
एकजुटीने,
एकदिलाने,
एकसंघ
होऊन
समोर
येत
गेली
तर
देशाच्या
प्रगतीला
बाधा
येणार
नाही.
महिलांची
प्रगती
तर
देशाची
प्रगती,
महिला
सामर्थ्यवान,
बलशाली
तर
देश
सामर्थ्यवान
आणि
बलशाली!!
ज्या
स्त्रियांजवळ पैसा आहे, प्रतिभा आहे, ज्या सामाजिक संस्था चालविणा-या आहेत अशा स्त्रिया एकत्र येऊन समाजातील दुर्बल, अशिक्षित आणि पीडित महिलांसाठी कार्य करीत आहेत. त्यांना बळ आणि प्रेरणा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुर्बल घटकांतील स्त्रियांचे समाजजीवन सुधरविणे आवश्यक आहे तरच त्या बलवान होतील. आजच्या काळासोबत चालण्याची ताकद त्यांच्यात येईल. या उद्देशाने अनेक संधी अनेकानेक स्त्रियांसाठी आज उपलब्ध आहेत.
जिथे
अन्याय
होतो
आहे
त्याविरुध्द
विरोधातला
आवाज
बुलंद
करण्याची
ताकद
आजही
अनेक
स्त्रिया
व
मुलींमध्ये
आहे.
'गुरमेहर
कौर'
हिचे
याबाबतीतले
अलीकडचे
उदाहरण!!
तोंडावर
Acid टाकून
आयुष्य
उध्वस्त
झालेल्या
मुली
व
स्त्रियांसाठी सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस हिरीरिने कार्य करीत आहेत. देशाच्या सीमा ओलांडून हॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली प्रियंका चोप्रा, सिनेक्षेत्रातील कितीतरी आव्हानांना तोंड देत, आत्मविश्वासाने यश मिळविती झाली.
'तुला अमुक एक गोष्ट जमणारच नाही,' असं कुणी म्हणालं तर कोणत्याही स्त्रीने खचून न जाता, निर्धारपूर्वक आणि जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन यश स्वतःकडे खेचून आणावं!! जी घर-संसार सांभाळू शकते, जी जगाला मार्ग दाखवू शकते, ती स्वतःत सर्व शक्ती एकवटू शकतेच आणि हेच तिचे खरे बलस्थान आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या-ज्या संधी उपलब्ध आहेत त्या-त्या संधीचं आत्मविश्वासाने चीज करणं, त्यातून आपली ओळख तयार करणं, जग बदलतं आहे, आपण त्यासोबत बदलणं आणि बदलत असतांनाही आपली ओळख जपणं, आपलं स्वत्व जपणं, आपल्या कक्षा वाढवणं, जिथे आवश्यक आहे तिथे मर्यादित मर्यादा ठेवणं ही जिची तिची जबाबदारी आहे.
श्रमाच्या
पराकाष्ठेने
जिने
आनंदाची
पालवी
फुलवली,
धैर्याने
स्त्री
शिक्षणाचे
स्वप्न
साकारुन
मुहुर्तमेढ
रोवली,
कणखरतेचे,
बलशाली
स्त्रीचे
प्रतीक
असलेल्या
सावित्रीबाई
फुले
यांच्या
लेकी
आपण!!
वेळेनुसार
बलवान
होऊ
या,
काळानुसार
बदलू
या.
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
21-May-2017