ज्या गोष्टी
प्रत्यक्षात नाहीत; त्या कल्पनाविश्वात
बघण्याची पहिली प्रक्रिया बालपणापासूनच
सुरु होते, असे
मला वाटते. सात-आठ वर्ष
वयाच्या आठवणींत वास्तव आणि
कल्पनेतल्या जगाचे रंग मुलांच्या
मन चित्राने मजेदारपणे
एकमेकांत मिसळून रेखाटले असतात.
अशा आठवणींचे रेखाटन
पुढील आयुष्यात लख्खपणे
आठवतं.
आई, वडील,
आजी, आजोबा मला
लहानपणी कधी काऊच्या,
कधी चिऊच्या, परीकथेच्या,
चांदोबाच्या गोष्टी सांगायचे. परीकथेत
परी आली. बरं..
हे सगळे कथा
इतकी रंगवून सांगत
की, डोळ्यांसमोर हुबेहूब
परी दिसावी. परी...
तिचा तो फुलं
लावलेला गुलाबी फ्रॉक, तिचे
निळे किंवा घारे
डोळे, ती निळ्या
आकाशातली तिची झेप,
तिला असणारे पंख,
मग... ती आपल्या
आयुष्यात येऊन सगळा
शेवट कसा गोड
करते... वगैरे सगळे वर्णन
मी हुबेहूब रात्री
कल्पनेत रंगवत असे. जसेच्या
तसे. मुलांना गोष्ट
आवडावी, त्यांनी रमावं म्हणून
रमवून रमवून रम्य
बालपणात गोष्ट सांगितली जाते.
परीकथा अगदी खरीच
वाटे. खरंच आपल्याला
परी भेटेल असे
वाटे. चांदोबाच्या गोष्टींचंही
तसंच!! 'चांदोबा, चांदोबा भागलास
का? निंबोणीच्या झाडामागे
लपलास का?' हे
गाणं रोज आळवलं
जाई. चंदा मामाचे
तर मला बालपणापासूनच
आकर्षण!! त्याचा तो शांत,
शीतल प्रकाश मन
धुंद करणारा!! रोज
दिसणारा मामा चन्द्र!!
म्हणूनही तो प्रिय!!
स्वप्नांत बरेचदा चन्द्राला पाहिले.
तो माझ्याबरोबर पळतांना
दिसला. झाडांमागे लपतांना दिसला.
पुढे शाळा कॉलेजच्या
दिवसांत अनेक चन्द्रावरची
हिंदी, मराठी गाणी पाठ
केली. चन्द्र आकाशातला
एक ग्रह असूनही
मला मात्र तो
माझा प्रिय सखा
वाटायचा!! जेंव्हा प्रथम इंग्रजी
शिकले, तेंव्हा रोज मी
आधी चन्द्राला 'Good Night' म्हणत
असे व नंतर
झोपत असे.
विक्रम वेताळाच्या गोष्टी,
'अमृत' मासिक, ईसापनीती, 'चांदोबा',
'अलीबाबा आणि चाळीस
चोर' - त्यातील मर्जिनाची हुशारी!!
हरी नारायण आपटे
यांच्या 'वज्राघात', 'उषःकाल', 'गड
आला पण सिंह
गेला', या कादंब-या हातच्या
सोडवत नसत. एकदा
वाचूनही समाधान होत नसे.
त्यातील चित्रेही खूप बघण्यालायक
असत. बालमन अगदी
रमून जात असे.
कुस्ती, कबड्डी, खो-खो
यांसारखे मैदानी खेळ तेंव्हा
रंगत होते. ते
पाहण्यातही मुलं रमत
असत.
राजकुमारीच्या गोष्टीत, राजकुमार घोड्यावरुन
येतो व राजकुमारीला
ऐटीत घेऊन जातो.
कल्पनेच्या दुनियेत हे सगळे
मला लहानपणी जसेच्या
तसे दिसे. या
सगळ्या छान छान
गोष्टी ज्यांनी मला सांगितल्या,
माझे बालपण रम्य
केले त्या सगळ्यांना
आज या बालदिनाच्या
निमित्ताने खूप धन्यवाद
द्यावेसे वाटतात. तुम्ही नसतात
तर माझे बालपण
होरपळले असते!!!
...माझ्या जशा बालपणीच्या
आठवणी रम्य आहेत
तशाच सर्वांच्या असतील
का? असा प्रश्न
आज मनांत आला.
उत्तर बहुतेक नाही
असेच सापडते; कारण
अनेक मुलांना गरिबी,
अपंगत्व अशा अनेक
कारणांमुळे बालपण असूनही उपभोगता
येत नाही.
आजच्या विद्यमान स्थितीत
मात्र भौतिक सुखांच्या
सहज उपलब्धतेमुळे १२
ते १४ वर्ष
वयातील मुलांचे भावविश्व बदलत
चालले आहे. अगदी
छोट्या खेड्यांपासून ते मोठ्या
शहरांपर्यन्त मोबाईल, Laptop व इंटरनेट
चा नको तितका
गैरवापर, नको ते
videos आणि games लहान वयात
इंटरनेटद्वारे बघणे, नको त्या
films बघणे, आई वडील
दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेरच
असल्यामुळे, घरी आल्यावरही
ते मुलांना फारसा
वेळ देऊ शकत
नाहीत. मुले घरी
कसा आणि कुठे
वेळ घालवतात हे
त्यांना कळू शकत
नाही. कामकाजानिमित्त बाहेर
असलेल्या पालकांच्या अनुपस्थितीत ही
बालके कुणाचाही धाक
नसल्याने मायाजालाच्या मोहपाशात गुरफटत चालली
आहेत. शाळा, कोचिंग
क्लास आणि घर
या प्रवासात अवांतर
वाचन तर त्यांना
ठाऊकच नाही. वाचन
संस्कृती तर अगदीच
नगण्य आहे; तरीही
नऊ, दहा वर्षाच्या
मुलाला चष्मा लागतो!! लहान कुटुंब,
त्यामुळे पाळणाघरातच मुले मोठी
होतात. पालक १२
तास कामावर असतात;
त्यामुळे आईवडील व मुले
यांच्यातील संवाद हरवला आहे.
घरात आजी आजोबा
नसतातच!!! शिवाय टीव्हीवरील कार्टून
shows आणि games shows असतातच बिघडवायला!! Technology चा
वापर करायला हरकत
नाही, पण तो
कसा करायचा हे
ज्याचे त्याला कळले पाहिजे.
आईवडिलांनी मुलांकडे लक्ष दिले
पाहिजे, वेळात वेळ काढून!!!
..... देशाचे
भावी भविष्य जर
चांगले घडवायचे असेल तर
बालपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार
असणे आवश्यक असते.
पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण वाढत
चालले आहे. बालपण
समृध्द तर पुढील
आयुष्य समृध्द!! म्हणून बालपण
हा भावी आयुष्याचा
पाया असतो.
नेहरुंनी छोट्या मुलांवर
खूप प्रेम केले,
कारण मुले ही
निष्कपट आणि निरागस
असतात. त्यांच्या इंदिराचे बालपण
त्यांनी मनापासून जपले. मी
नेहरुंनी इंदिराजींना लिहिलेली पत्रें
व इंदिराजींनी वडिलांना
लिहिलेली अनेक पत्रें
कॉलेजच्या काळात वाचली. काही
पत्रें तर इतकी
भावतरल भावना दर्शविणारी आहेत
की वाचकाला रडू
येईल!! वडील व
मुलीमधले ते आदर्श
नाते होते. त्यांनी
त्यांच्या एकुलत्या एक मुलीला
खूप खंबीर व
कणखर बनविले.
आज नेहरु
जयंती. बालकदिन. कुणाचेही रम्य
बालपणाचे दिवस कोणत्याही
जाचक कारणांमुळे हिरावले
जाऊ नये, असे
आज कळकळीने वाटत
असल्यामुळे हा
लेख लिहावासा वाटला.
१२७ व्या
जयंतीनिमित्त नेहरुंना माझ्यातर्फे विनम्र
अभिवादन.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१४ नोव्हेंबर
२०१६.