Friday, 10 June 2022

वो एक बर्गत का पेड़

वो एक बर्गत का पेड़, अपनी मिट्टी से वफ़ा करता

न जाने कितनी पीढ़ियों से पकडे हुए अपनी जड़ों को, खड़ा था

धुप की चादर ओढ़े, बारिशों के थपेड़े सहता

अपने ही पत्तों की सरसराहट में झूम उठता

कितनी ही  शाखाये गिर पड़ी, कितने ही पत्ते मुर्झायें

न डरा कभी, डटा रहा बाहें फैलाये

उसकी छाँव तले सुकूँ बसता था

उसकी बाँहों में कईयों का डेरा था


अबकी बार जब दिखा लेकिन, मानो बूढ़ा लगने लगा था

शायद उसने अपने दर्द को जज्ब करके रख्खा था

शाखाये खुरदरी, पत्ते सारे मुरझाये

उसकी जाडी टहनियोंपर, अब घाव थे गहरे

उसमेसे टपकते आंसू , जरासिमों का खाना हैं 

देना ही जीवनधर्म हैं, मानो कहते हैं

बावजूद इसके खड़ा था,अपनी रूह को पकडे


काट डाला परसो, कुछ बेरहमोने उसे

अब वहाँ एक वीरान सन्नाटा है

कुछ सूखीं लकड़ियां पड़ी हैं, मानो अस्थियाँ जैसे

उसके न होनेसे एक खला सा हैं 

मानो जैसे जीनेका सहारा गिर पड़ा है


अमोल पाटखेड़कर

१०-जून-२०२२ 


Wednesday, 8 June 2022

आहे अजून

 झाड उभे आहे अजून

 स्वतःच्या अस्तित्वाची सावली होऊन


  सावली सावळी सावळी आहे अजून

   गर्द उन्हाचे चटके लेऊन


  गुलमोहर लाल लाल उभा आहे अजून

    पांथस्थ प्रेमाचा वसा घेऊन


 फुल अन् फुल गंधित आहे अजून

  पाकळी पाकळीसवे क्षणभंगूर होऊन


  पान अन् पान हिरवं आहे अजून

  हिरवाईचं सृष्टीला आंदण देऊन


  उगवती उगवती रंगछटा आहे अजून

  मावळतीच्या दिशेला निराशा नाही अजून


  नदी सागराचा खळखळाट आहे अजून

  परिपूर्णतेच्या ध्यासाला सीमा नाही अजून


  पर्वतशिखरांना चढी हिम्मत आहे अजून

  क्षितिजापार जाण्याला अंत नाही अजून


  नेमस्त जगण्याला अर्थ आहे अजून

 पणतीच्या प्रकाशाला उजाळा आहे अजून


 साधेपणातल्या सौंदर्यातच जग आहे अजून

 लुच्च्या, खोट्या मुखवट्याला जागा नाही अजून


 तुझ्या माझ्या प्रवासाला अंत नाही अजून

 आत्मशोधाच्या वाटेला खंत नाही अजून


 दुःखापल्याडच्या सुखाला मरण नाही अजून

 समाधानाच्या शब्दाला जीवन आहे अजून


 कल्पनेतल्या स्वप्नांना वाव आहे अजून

 वास्तवातल्या जाणिवांना श्वास आहे अजून


 अर्धा पेला भरलेला आहे अजून

 बाकी काही मागायचे उरले नाही अजून


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

      ८ जून २०२२