Tuesday, 29 August 2017

महालक्ष्मी प्रसन्न


महालक्ष्मी प्रसन्न

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

बोलाविण्या तूज

आज आली मी दारात

स्वागता तुज

स्वागता तुज

रांगोळी सजली नवरंगात

सजली नवरंगात

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

स्वागता तुज

सजले आरतीचे हे ताट

सजले हे ताट

धूप आणि उदबत्तीचा

दरवळे सुगंध

दीपाचा उजळे प्रकाश

उजळे प्रकाश

निरांजन लावण्या

घालिते मी फुलवात

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

फुलोनि आले माझे मन

झाले गं फुलवा

झाले गं फुलवा

विविधरंगी सुगंधी

माळ तुला अर्पिता

माळ तुला अर्पिता

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

सागराची तू कन्या

विष्णूची तू प्रिय कांता

कमलाक्षी, कमलप्रिये

भान हरपले तुज पाहता,

मम; भान हरपले तुज पाहता

प्रगट तू आज होता

प्रगट तू आज होता

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

प्रगटतेस तू स्वच्छतेतूनी

प्रगटतेस तू नाणी, पैश्यातुनी

प्रगटतेस तू स्वच्छ आचरणातुनी

शुध्द आचरणातुनी

शुध्द आचरणातुनी

ध्यान लागे दुसरीकडे

ध्यान तुझे लावता

ध्यान तुझे लावता

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

शक्ती तुझी असे जागृत

पराक्रम तव विशाल

संहारिले तू असूर

संहारिले तू असूर

काम, क्रोध, मद, लोभ,

दंभ, मत्सर

जळो अमुचे या; मनातील असूर

या मनातील असूर

जळो अमुच्या अहंकाराचा महिषासूर

अहंकाराचा महिषासूर

हाच दे तू आम्हां, आता वर

ये गं, ये गं

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

प्रसन्न तू होशी,

सज्जन, सात्त्विक घरात

सात्त्विक घरात

कटकट, चिडचिड, वखवख

ही असे अलक्ष्मी

अस्वच्छ , कुहिट मन

ही असे अलक्ष्मी

ही असे अलक्ष्मी

नांदतेस तू महालक्ष्मी

नांदतेस तू महालक्ष्मी

सज्जन, सात्विक विचारात

सज्जन, सात्त्विक मनांत

ये गं, ये गं

महालक्ष्मी तू येsss गं

 

ये गं, ये गं,

ये गं, ये गं,

महालक्ष्मी तू येsssगं

ये गं, ये गं, ये गं, ये गं

आम्हांला तू ने तारुन

आमचा उध्दार करुन

समृध्दीची तू असे खाण

समृध्दीची तू असे खाण

प्रसन्न तू होता राही

कशाची वाण

राही कशाची वाण

ये गं, ये गं,

ये गं, ये गं,

महालक्ष्मी तू येss गं

रेणुका तू येss गं

तुळजा भवानी येss गं

ये गं, ये गं,

ये गं, ये गं,

महालक्ष्मी तू येsss गं

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२९//२०१७.

Sunday, 27 August 2017

सारं काही तुझ्याजवळ


सारं काही तुझ्याजवळ

झाडं, पानं, वेली नि फुलं

फुलाफुलांनी गंधित होणं

 

सारं काही तुझ्याजवळ

आकाशीच्या रंगछटा

धरित्रीचा हिरवा बगिचा

 

सारं काही तुझ्याजवळ

प्रकाशकिरणांचं फाकणं

चन्द्र, तारकांचं चांदणं

सारं काही तुझ्याजवळ

झाडातले खोपे पक्ष्यांचे

रानातले नाच मयुरांचे

वनातले कळप हरणांचे

 

सारं काही तुझ्याजवळ

वाघांची डरकाळी

पाखरांची किलबिल

हत्तींचा डामाडौल

सारं काही तुझ्याजवळ

नदीचं खळखळणं

समुद्राचं खवळणं

पावसाचं बरसणं

सारं काही तुझ्याजवळ

मातीचा सुगंध ओला

सौदामिनीचा कडाड चपल

सारं काही तुझ्याजवळ

कुठे प्रदेश राकट खडकाळ

प्रमाणवेळेत चाले

रात्रंदिनीचा खेळ

 

सारं काही तुझ्याजवळ

पानांची सळसळ

वा-याची झुळझुळ

किड्यांची वळवळ

नादही तुजला

लयही तुजला

सूरही तुजला

तालही तुजला

सारं काही तुझ्याजवळ

रे निसर्गा,......

सारं काही तुझ्याजवळ.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२७//२०१७.