*शून्य अस्तित्व*
माहित असुनी तर्क आणि तत्वज्ञान
गुरफटतो निरर्थक पसारा सावरण्यात
चंचल मन विकार, करी भौतिक संचय
अधिकाधिकाचा मोह, नाशिवंत अनंत निग्रह
का पडलो वादविवादे, ओझे ज्ञानाचे फरफटले
न काही पदरी पडले, डोकेदुखी उफाळे
ब्रह्मदेव हसतो, किडेमुंग्या समजतो
क्षणभंगूर जगतो, काळ ब्रह्मदेवाचा सांगतो
न पेलू शके आपले आपण ओझे
सरणावर नेणारे चार खांदे दुसरे
शरीर जळले, मनही जळले असावे
राख माझ्या अस्तित्वाची, कोणी चिवडली कोण जाणे?
अस्तित्व माझे काय होते, आसक्तीने विचारले
ब्रह्मदेवा लेखी, उल्लेख माझा नसे
अमोल पाटखेडकर
१३-डिसेंबर-२०२४
No comments:
Post a Comment