"दिसामाजी काहीतरी ते लिहावे
प्रसंगी
अखंडित
वाचित
जावे"
"प्रयत्नांती परमेश्वर."
"यत्न तो देव जाणावा"
"प्रयत्नें वाळूचे कण रगडिता तेलही गळे"
"सामर्थ्य आहे चळवळीचे
जो
जे
करील
तयाचे
परंतु
तेथे
भगवंताचे
अधिष्ठान
पाहिजे"
"निश्चयाचा महामेरु
बहुत
जनांसी
आधारु"
"मरावे परी कीर्तीरुपे उरावे"
शाळेच्या
भिंतीवर
अतिशय
सुवाच्य
आणि
ठळक
अक्षरात
कोरलेली
ही
अमृत
वचनें
मनाच्या
भिंतीत
कधी
खोलवर
कोरली
गेली,
कळलंच
नाही.
ही
वचनें
वाचता
वाचता
सहज
पाठ
झाली.
श्री
समर्थ
रामदासस्वामींनी ती लिहिली आहेत हे नंतर कळले.
दिवस
असायचा
रामदासनवमीचा!! माझ्या शाळेचा प्रशस्त हॉल. एका मोठ्या टेबलवर रामदासांचा तेजस्वी आणि सुंदर हार घातलेला फोटो. बाजूलाच सरस्वतीची मोहक मूर्ती!! सकाळची वेळ. सनईच्या सुरांनी एकूणच शाळेची इमारत मंत्रमुग्ध झालेली!!. कार्यक्रमाआधीची ही सर्व वातावरणनिर्मिती मोहवून टाकणारी होती. सगळीकडे positive vibrations पसरविणारे श्री समर्थ रामदासांचे 'मनाचे श्लोक' आमच्या शाळेतले गायक, संगीत शिक्षक तालासुरात, अत्यंत मधुर आवाजात म्हणावयाचे!! शाळेतल्या सर्व मुली तिथे जमत असत. सरांनी मनाच्या श्लोकातील एकेक ओळ म्हणायची आणि त्यांच्यापाठोपाठ आम्ही!! दरवर्षी शाळेतला हा दिवस समर्थमय जाई आणि आज इतकी वर्षे झाली तरी समर्थ रामदासस्वामी आपल्यात नाहीत असे वाटतच नाही!! आजच्या दिवशी शाळेतील हा दिवस आठवतोच!!
"गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मूळारंभ
आरंभ
तो
निर्गुणांचा"
"मना सज्जना भक्तिपंथेची जावे".....या एकूणच सगळ्या ओळी समर्थ रामदासांच्या पावन आणि समर्थ लेखणीतून आजही मनामनांवर संस्कार घडविणा-या आहेत. चंचल, चलबिचल, आणि विचलित मनाला सामर्थ्यसंपन्न, शुध्द, सज्जन, सात्विक, नम्र आचरणाचे कसे बनवावे याचे सुंदर वर्णन समर्थांनी मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरुन, अंतरीच्या आत्म्याला साद घालत, प्रत्येक काळातील मनामनांना लागू पडतील असे लिहिले. मनाचे श्लोक मनातल्या मनात पाठ करणे, कुणी म्हणत असतील तर शांतचित्ताने त्याचे श्रवण करणे यासारखा दुसरा अद्वितीय आनंद नाही, इतके सामर्थ्य त्या एकेका श्लोकांत आहे. वाचता वाचता, ऐकता ऐकता ते श्लोक बेमालूमपणे आपल्या मनात रुजतात आणि त्याचबरोबर समर्थ रामदासही!! एक वेगळेच चैतन्य, तेज; जे 'नारायण सूर्याजीपंत ठोसर' म्हणजेच समर्थ रामदास यांच्याठायी ठासून भरले होते, ते आपल्यातही नकळत अवतरित होते.
प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर त्यांनी दिलेला भर, जोरदार प्रयत्न जेंव्हा आपण करतो तेंव्हा निश्चितच या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. आजच्या काळानुसार बोलायचे झाले तर ही त्यांची वचनें आणि समास मला एखाद्या Baseline, Tagline सारख्या वाटतात. मनाला योग्य ते वळण लावणा-या Lines!!!
"निश्चयाचा महामेरु,बहुत जनांसी आधारु"- या ओळीतून समर्थांनी शिवाजी महाराजांची स्तुती केली आहे; परंतु एकूणच व्यक्ती कशी असावी याचेही दर्शन घडविण्याचे सामर्थ्य या ओळीत आहे.
"शिवरायांचे आठवावे रुप
शिवरायांचा
आठवावा
प्रताप
शिवरायांचा
आठवावा
साक्षेप
......
भूमंडळी"-
या
सर्वच
ओळी
बोधामृताचे
सारासार
विवेकी
शिकवण
देणाऱ्या
आहेत.
"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची" ही गणेश आरती तसेच मारुतिस्तोत्र समर्थांनी रचले जे आजही आपणास श्रवणीय वाटतात. समर्थांचे कार्यही समर्थ होते. नुसताच उपदेश त्यांनी केला नाही तर 'आधी केले मग सांगितले' या त्यांच्याच वचनाप्रमाणे ते आधी स्वतः तसे वागले. ठिकठिकाणी अतिशय उंचावर मारुतीच्या मंदिरांची स्थापना त्यांनी केली. समाजमनांना एकत्र जोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. शिवाजी महाराजांना राज्यकारभारविषयक उपदेश वेळोवेळी त्यांनी केला. कितीतरी ठिकाणी मठ स्थापन केले. निष्ठावान शिष्यसंप्रदाय जमला. समर्थांचे समर्थ कार्य आणि त्यांनी मांडलेले समर्थ विचार इतकी वर्षे झाली तरी आजही आपल्या मनाला समर्थ बनविण्याचे कार्य करीत आहेत. कोणत्याही काळाला लागू पडणारी त्यांची ही वचनें आणि समास आपल्याला नेहमीच आठवत राहणार आणि मनात 'जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा' या ओळी घोळत राहून मनोमन आपण सर्व त्यांना वंदन करीत राहणार!!!
ll जय जय रघुवीर समर्थ ll
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२०/२/२०१७.
रामदासनवमी.