आजचा
जमाना बायोपिकचा आहे. प्रॉडक्शन हाऊसेसमध्ये
M.B.A. नेमलेले असतात. त्यांना म्हणे बायोपिक करणे सोपे जाते,
कारण 'कथा' तयार असते.
सिरियल्ससाठी कथालेखक हवा असतो. ओढूनताणून
कथा तयार करावी लागते.
परवाच 'प्रसाद ओक' वरचा कार्यक्रम
पाहिला. त्यात तो म्हणाला की
गार्गीची संमती असेल तर मला
'निळू फुले' वर बायोपिक करावयाची
आहे. त्यांच्यामध्ये ती सर्व प्रोसेस
करण्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध असतात.
प्रमोदवर बायोपिक व्हावी असे मी अरुणपाशी
बोलले होते. त्याने त्यानुसार आराखडाही तयार केला होता.
पण 'आता मी करु
शकणार नाही. मी खूप बिझी
आहे. मला शेवटचाच प्रोजेक्ट
मिळाला आहे,' असेही तो बोलला होता.
त्याला नेव्हीचा प्रोजेक्ट मिळाल्याचे कळले होते. तोच
अर्थ मी घेतला. पण
त्याची तब्येत ढासळली होती. त्याला डॉक्टरने कुठेच जाऊ नका असा
सल्ला दिला होता; हे
काहीच माहित नव्हते. त्याने त्याचे दुःख आम्हा कुटुंबियांपासून
लपवले होते. त्याला फुफ्फुसाचा cancer होता हे आम्हाला
खूपच उशीरा कळले.
४८ दिवस दवाखान्यात
admit राहून १ मार्च २०१९
ला त्याने त्याची जीवनयात्रा संपविली. आम्ही सर्व सुन्न होऊन
गेलो, कारण अरुण आमच्या
काळजाचा तुकडा होता. येत्या १ मार्च २०२०
ला अरुणची जीवनयात्रा संपल्याला वर्ष पूर्ण होत
आहे. अनेक आठवणींचा पट
डोळ्यांसमोरुन सरकत आहे. 'अरुण'
आमचे जीवन व्यापून उरला
आहे.
असे
कां होते? इतकी एखादी व्यक्ती
कां बरे आपल्या मनावर
अधिराज्य गाजवित असते? अमीट छाप अरुणने
सर्वांवर सोडण्याचे कारण त्याने सर्वांसमोर
कार्यकुशलतेचा आदर्श घालून दिला. त्याच्याइतकी उमेद, उत्साह व नियोजन कौशल्य
कुणामध्येच नव्हते. आयआयटी मुंबईमध्ये CAD विभागाचा सर्व कार्यभार सांभाळत
असताना, सर्वोच्च पदावर अधिव्याख्याता म्हणून काम करीत असताना
जोडीला Piping Course चे क्लासेस घेऊन
आयआयटीला अर्थसाहाय्यही करण्याची त्याची क्षमता होती. सुरुवातीला वर्षातून एकदा Piping Course तो घ्यावयाचा. नंतर
वर्षातून ३-४ कोर्सेस
इतके प्रमाण त्याने वाढविले होते. दिवसरात्र मेहनत करावयाचा. झोप खूपच अपुरी
घ्यायचा. कामाचा झपाटा जबरदस्त होता. 'ध्यास' घेतला होता अनेक गोष्टींचा!
आईचे सर्व नातू
मुंबईला आणतो, त्यांना नोकऱ्या देतो असे म्हणायचा.
कौटुंबिक जिव्हाळा तर त्याच्याइतका कोणामध्येच
नव्हता. सर्वांसाठी त्याला खूप काही करायचे
होते. 'कितीही केले तरी करायचे
राहूनच जाते' असे नेहमी म्हणायचा.
केवळ ६५ वर्षांच्या आयुष्यात
त्याने केलेल्या कामांचा प्रचंड आवाका पाहिला की थक्क व्हायला
होते.
अरुण
देखणा होता. सडपातळ, गौरवर्ण, कुशाग्र बुध्दिमत्ता, प्रेमळ स्वभाव, कुटुंबासाठी कोणतेही काम करण्याची तयारी,
आईबाबा व सर्वच सुहृदांवर
अपार माया, व्यायाम करण्याची हौस लहानपणापासूनच! अरुण
माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान!
त्याचे बालपण खूप गोंडस होते.
अंग खूप लवचिक होते.
घरी झोपाळा, ज्याला आम्ही पाळणा म्हणत असू त्यावर कोलांट
उड्या घ्यायचा.
आई त्याला शाळेत घालायच्या आधीपासूनच घरीच त्याला पाढे,
वर्णाक्षरे शिकवायची. आई व अरुण
ही जोडी आजही जशीच्या
तशी त्यावेळची माझ्या डोळ्यांसमोर आहे. छबुताई माहुरकर
हिंदु मुलींच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. त्या आमच्या वाड्यात,
ज्याला आम्ही कोठा म्हणत असू
, तिथे राहत असत. अरुणला
त्यांचा लळा होता. त्या
ओढीने तो हिंदु मुलींच्या
शाळेत जाऊ लागला. कुशाग्र
बुध्दीमत्तेमुळे काहीच चिंता नव्हती. शिडी वर जाणारच
होती. आई व मी
तो शाळेतून येण्याची वाड्याच्या दारात उभे राहून वाट
पाहत असू.
घरचे वातावरण शाळामय
होते. बाबा सी.पी.अँड बेरार मध्ये
शिक्षक असल्यामुळे व शिक्षकी पेशा
पूर्ण अर्थाने निभवण्याची जिद्द असल्यामुळे अभ्यास एके अभ्यास असा
सर्व माहोल होता. घरी सर्व सणवार
असल्यामुळे, पूजापाती, व्रतवैकल्ये यांना तोटा नव्हता. आरत्या
पाठ कराव्या लागत नव्हत्या. सर्व
संस्कार आपसूक घडत होते.
अरुणची निरीक्षणशक्ती खूप चांगली होती.
याचे प्रत्यंतर त्याने लिहिलेल्या साहित्यातून आपल्याला जाणवते. 'आईबाबा' हे त्याचे काव्य
याचे उत्तम उदाहरण आहे. त्यात त्याची
विनोदबुध्दीही जाणवते. अवश्य वाचा.
वयाच्या
दहाव्या वर्षापर्यन्त स्मृती पक्की होत नसावी. त्यामुळे
त्याआधीचे काय काय घडले
असावे हे इतके कुणी
सांगू शकेल असे वाटत
नाही.
आईबाबांचा संसार घडत गेला, घडत
गेला, व सर्वजण आम्ही
मोठे झालो. शिकत गेलो, शिकत
गेलो. सर्वजण घरची कामें करत
गेलो. ज्याने त्याने आईबाबांच्या तालमीला सलामी दिली. अरुण सी.पी.अँड बेरार मधून
दहावी परीक्षा आठव्या मेरीटने पास झाला.
आई त्याला शाळेत घालायच्या आधीपासूनच घरीच त्याला पाढे,
वर्णाक्षरे शिकवायची. आई व अरुण
ही जोडी आजही जशीच्या
तशी त्यावेळची माझ्या डोळ्यांसमोर आहे. छबुताई माहुरकर
हिंदु मुलींच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. त्या आमच्या वाड्यात,
ज्याला आम्ही कोठा म्हणत असू
, तिथे राहत असत. अरुणला
त्यांचा लळा होता. त्या
ओढीने तो हिंदु मुलींच्या
शाळेत जाऊ लागला. कुशाग्र
बुध्दीमत्तेमुळे काहीच चिंता नव्हती. शिडी वर जाणारच
होती. आई व मी
तो शाळेतून येण्याची वाड्याच्या दारात उभे राहून वाट
पाहत असू.
घरचे वातावरण शाळामय
होते. बाबा सी.पी.अँड बेरार मध्ये
शिक्षक असल्यामुळे व शिक्षकी पेशा
पूर्ण अर्थाने निभवण्याची जिद्द असल्यामुळे अभ्यास एके अभ्यास असा
सर्व माहोल होता. घरी सर्व सणवार
असल्यामुळे, पूजापाती, व्रतवैकल्ये यांना तोटा नव्हता. आरत्या
पाठ कराव्या लागत नव्हत्या. सर्व
संस्कार आपसूक घडत होते.
अरुणची निरीक्षणशक्ती खूप चांगली होती.
याचे प्रत्यंतर त्याने लिहिलेल्या साहित्यातून आपल्याला जाणवते. 'आईबाबा' हे त्याचे काव्य
याचे उत्तम उदाहरण आहे. त्यात त्याची
विनोदबुध्दीही जाणवते. अवश्य वाचा.
वयाच्या
दहाव्या वर्षापर्यन्त स्मृती पक्की होत नसावी. त्यामुळे
त्याआधीचे काय काय घडले
असावे हे इतके कुणी
सांगू शकेल असे वाटत
नाही.
आईबाबांचा संसार घडत गेला, घडत
गेला, व सर्वजण आम्ही
मोठे झालो. शिकत गेलो, शिकत
गेलो. सर्वजण घरची कामें करत
गेलो. ज्याने त्याने आईबाबांच्या तालमीला सलामी दिली. अरुण सी.पी.अँड बेरार मधून
दहावी परीक्षा बाराव्या मेरीटने पास झाला.
१९६९
मध्ये दहावीच्या परीक्षेतील १२ व्या मेरीटबरोबर
अजून एक मानाचा तुरा
त्याच्या शिरपेचात खोवला गेला. मराठीत सर्वाधिक गुण मिळाले. बोर्डाचे
शंभर रुपयाचे बक्षिस मिळाले. लागोपाठ तीन वर्ष कन्नमवार
पुण्यतिथीनिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. शंभर रुपयाची शिष्यवृत्ती
दहावीनंतर B.Tech. होईपर्यंत मिळविली. सर्व बौध्दिक स्पर्धात
बक्षिसे पटकावली.
आई-बाबांची सर्वच
मुलें इतकी हुशार कशी
निघाली? मुलांनी उच्चतम यश कसे प्राप्त
केले? याचे अनेकजणांना आजही
आश्चर्य वाटते. सगळेजण निर्व्यसनी, सचोटीच्या मार्गाने जाणारे हेही आजच्या काळात
नवल वाटावे असेच आहे.
जडण-घडणीतला आईबाबांचा
वाटा खूप मोठा आहे.
'वाडा' सर्वांना अत्यंत प्रिय! वाड्यावरही अरुणने खूपच सुंदर काव्य
केले आहे.
अरुणचे सर्वच विषय खूप पक्के
होते. 'मराठी' तर अप्रतिम होते
हे त्याने त्याच्या सर्वच लिखाणाने सिध्द करुन दाखविले आहे.
त्याच्या लिखाणाचा 'आस्वाद' घेण्यासाठी आधी त्याची सर्व
शिक्षणाविषयीची धडपड बघणे आवश्यक
आहे.
नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून प्री युनिव्हर्सिटी परीक्षा
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्यानंतर B.Tech साठी त्याने नागपूरच्या
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी(L.I.T.) मध्ये प्रवेश
घेतला. सायकलने इतक्या लांब जात असे.
अगदी सकाळी थोडे जेवण करुन
त्याला निघावे लागे. आईला इतक्या लवकर
त्याच्यासाठी स्वयंपाक करावा लागत असे. कधीही
कोणती तक्रार करणे अरुणच्या स्वभावात
नव्हते, असे मला ठळकपणे
आठवते. खूप अभ्यासाचीही त्याला
कधी गरज पडली नाही;
असेही नेहमी जाणवायचे. सर्वात कुशाग्र बुध्दीमत्तेचा असे मी त्याला
म्हणेन!
B.Tech. ही
पदवी प्रथम श्रेणीत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.
नंतर
त्याने कानपूर आयआयटी मधून M.Tech व P.H.D. ह्या पदव्या प्राप्त
केल्या. हे लिहिणे खूप
सोपे आहे. पण इतका
भारी अभ्यास त्याने खरोखरच लीलया पेलला असेच वाटते. कारण
आम्हाला कधी जाणवलेच नाही
की त्याच्यावर काही ताण आहे.
त्याची पत्रें यायची! मलाही यायची. त्याच्या शिक्षणाच्या काळात मी नोकरीवर होते.
नंतर माझेही लग्न झाले. मी
नोकरीवर असताना; मला घ्यायला तो
बसस्टँडवर उपस्थित असावयाचा! आईला माहितही नसायचे!
अरुणने घरामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या,
ज्या, ज्या वेळी उपस्थित
झाल्या, त्या त्या वेळी
पूर्ण सहभाग दिलेला आहे. मग ते
आम्हा बहिणींची लग्नें असोत, घरातील आजारपणें असोत की आंबेफोडणीवर
आंबे फोडून द्यायचे काम असो, घराची
डागडुजी असो की टालावरुन
आलेली लाकडे, वर माडीवर नेऊन
ठेवायचे काम असो, बाजारहाट
करणे असो की अंथरुण
पांघरुणाच्या घड्या घालणे असो. सर्वांसाठी अरुण
न सांगता हजर असावयाचा हे
मला पक्के आठवते.
कुटुंबातील एकही लहान वा
मोठी व्यक्ती अशी नाही की
अरुण ज्याच्यासाठी झटला नाही. अखंड
'कुटुंबवत्सल' असेच त्याच्याबाबतीत म्हणावेसे
वाटते. त्याच्या सर्व साहित्यातून हाच
कौटुंबिक जिव्हाळा पदोपदी जाणवतो. रत्नाकरराव व विजयाताई केळकरांची
ज्येष्ठ कन्या सरिताशी १६ नोव्हेंबर १९८४
ला त्याचे लग्न झाले. त्यानंतर
तो रुरकीला होता. प्रमोदही तिथेच होता. त्याकाळात मीही माझ्या परिवारासोबत
रुरकीला गेले होते. प्रमोदचे,
अरुणचे घर खूप
छान होते. सरिता त्यावेळी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. अरुणने
आमचा पाहुणचार खूपच छान केला होता.
नंतर
त्याने शेवटपर्यंत मुंबईतच
वास्तव्य केले. आयआयटी तर्फे त्याला क्वार्टर मिळत असे. पुढे
त्याने स्वतःचीही M.T.P.L. कंपनी काढली, स्वतःची घरे घेतली, त्याचा
तो सर्व उत्कर्ष मी
पाहिलेला आहे. त्याची पाठ
थोपटली आहे.
सरिताला कंपनीचे डायरेक्टर केले. शरयू , मंजिरीला उत्तम शैक्षणिक सोयी सुविधांचे वातावरण
देऊन मोठे केले. आज
त्याच्या मुली पीएचडी आहेत
व उत्तम नोकऱ्यांवर आहेत. शरयूचे लग्न केले. त्या
लग्नाला मी उपस्थित होते.
शरयूचे कन्यारत्नही त्याने पाहिले. मंजिरी पीएचडी पार करणार हे
तर निश्चितच होते.
खूप दैदिप्यमान त्याचे
कर्तृत्व होते. मला ते तितक्या
चांगल्या पध्दतीने मांडता येत नाही याची
मला जाणीव आहे; कारण शब्दात
त्याचे कर्तृत्व उलगडणे मला कठीण वाटत
आहे.
अमोल, माझा मुलगा, अमेरिकेला
नोकरीसाठी गेल्यानंतर त्याने आम्हा दोघांना तिथे बोलावले, त्यासाठीचा
व्हिसा व नंतर अमेरिकेला
प्रयाण या सगळ्या प्रक्रियेत
मी व मुकुंदराव पाटखेडकर
यांना अरुणच्या कुटुंबाची खूप मदत झाली.
या २०१० सालातल्या घटना
आहेत. १५ मे २०१०
ला व्हिसा मिळाला. २८ मे ला
अमेरिकेसाठी निघालो. २४ नोव्हेंबर २०१०
ला वापस अकोल्यासाठी निघालो.
रेल्वे स्टेशनवर अरुण व सरिता
आले होते. १६ डिसेंबर २०११
ला आम्ही दुसऱ्यांदाही अमेरिकेला गेलो तेव्हाही अरुणच्याच
घरी उतरलो होतो. ३ फेब्रुवारी २०१२
ला वापस आलो. तेव्हाही
सरिता कार घेऊन विमानतळावर
आली होती. आदरातिथ्य करण्यात त्या सर्वांचाच हातखंडा
आहे. त्या काळात त्याला
खूप व्यायाम करतांना मी बघितले आहे.
नोव्हेंबर
२०१२ मध्ये अमोल मुंबईला नोकरीसाठी
आला, त्यानिमित्ताने त्याच्याकडे जाणे व्हायचे तेव्हाही
अरुणची गाठभेट व्हायची! त्याच्याकडे तो आम्हाला जेवायला
बोलवायचा! वैशालीच्या साक्षगंध व लग्न या
दोन्ही समारंभासाठी आम्ही उपस्थित होतो. अरुणने तेही कार्य पेलले
होते. प्रमोदच्या निधनानंतर प्रमोदच्या कुटुंबाची जबाबदारी अरुणने स्वतःची समजून त्याही दिव्यातून तो पार गेला.
एक आयुष्य म्हणजे खूप मोठा इतिहास
असतो. जो जबाबदारी पेलणारा
आहे, त्याच्यावर खूपच करण्याची वेळ
येत असते.
१० एप्रिल २००१
मध्ये 'बाबांचा मृत्यू' ही घटना सारे
आयुष्यच पालटवून टाकणारी घटना ठरली. आईचीही
जबाबदारी अरुणने घेतली. १४ जानेवारी २००३
मध्ये 'प्रमोदचा मृत्यू' ही दुसरी निर्णायक
घटना! असे खूप आघात
अरुणवर झाले. आतून तो खूप
उसवून गेला असावा!
बाबांच्या 'अमृत कलश,' 'मज्जीवनमणिमाला'
आणि 'अध्यक्ष महाराज'(बाबांच्या लेखांचा संग्रह) या पुस्तकांचे संपादन,
लेखन आणि प्रकाशनाची सर्व
जबाबदारी त्याने उचलली. आश्विन पौर्णिमा(कोजागिरी), ५/१०/२०१७,
प्रमोदवरही त्याने 'बाळ विजय' काव्य
लिहिले, बाळ-१, बाळ-२, बाळ-३
प्रमोदचा इतिहास लिहिला. माझ्यावरही, मी नाही नाही
म्हणत असताना 'गोंधळ' लिहिला.
भागवत
व पुराणांचा अभ्यास करुन त्यावरही विद्वत्तापूर्ण
लिखाण केले. 'कापूसकोंड्या' व 'बोक्कामुच्चू' या
त्याच्या ब्लॉग्ज वरील त्याचे प्रदीर्घ
लिखाण त्याची विनोदबुध्दी, त्याची कल्पकता, त्याची विद्वत्ता, त्याची रसिकता, त्याचा अभ्यास या सर्व गुणांची
साक्ष देणारे आहे. केव्हाही ब्लॉग
उघडा व वाचनाचा आनंद
मिळवा. त्याचे संशोधनात्मक लेख ही तर
आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
' उत्तम शिक्षक' म्हणून आयआयटीने नावाजले, पुरस्कार दिले. Piping कोर्सने जगन्मान्यता दिली. देश, विदेशातील दौरे
केले. आयआयटी मुंबईला पैसा देण्याइतकी ऐपत
कमावली. आज काय तर
बडोद्याला आहे, उद्या काय
तर दुबईला गेला आहे, परवा
काय तर दिल्लीला व्याख्यानासाठी
गेला आहे, मग काय
तर अमेरिकेत आहे, मध्य एशियात
व्याख्याने देतो आहे असे
कळावयाचे. त्याच्या कर्तृत्वासमोर शिर झुकवावेसे वाटायचे.
अमोलला नोकरी दिली, आशुतोषला दिली. सर्वांसाठी
मुक्त उधळण होती.
स्वतःच्या पुस्तकांवर स्पर्धा ठेवून मोठमोठ्या रकमांची बक्षिसे त्यानिमित्ताने कुटुंबातील भाचे, पुतणे, नाती, नात यांना जाहीर
केली. मुलांनो! या सर्वांची आठवण
ठेवा. 'जगण्याची कला' त्याने पूर्ण
अवगत केली होती. शक्यतोवर
सर्व कार्यक्रमांना तो उपस्थित असावयाचा;
पण गेल्या ७-८ वर्षात
त्याला ते शक्य होत
नव्हते. 'सरिता' सर्व कार्यक्रमांना हजर
राहावयाची.
आपले
दुःख लपविण्याची किमयाही त्याने करुन दाखविली. ही
फार मोठी गोष्ट आहे.
आरडाओरडा, कल्ला तर सगळ्यांनाच जमतो.
इतक्या दुर्धरावस्थेतही त्याने जो संयम दाखविला
व जे कार्य केले
त्याला तोड नाही. इतरांचे
घास त्याने अडविले नाहीत. ही फार मोठी
सिध्दी मला वाटते. त्याचे
आयुष्यातून उठून जाणे खूप
काही शिकवून गेले.
तो स्वतःला नास्तिक
म्हणवून घ्यायचा, पण मला तो
तसा कधीच वाटला नाही.
धार्मिकतेचे पूर्ण संस्कार घराण्यानेच त्याला दिले होते. तुम्हा
आम्हाला माहीत नसतील इतक्या सर्व रीतीभाती त्याला
माहीत होत्या. त्याची सर्वांप्रती आत्मीयता व त्याचे दैदिप्यमान
कार्य हाच आस्तिकतेचा पुरावा
मी मानते. 'Work is Worship.'
त्याला
'सलील कुलकर्णी' व 'संदीप खरे'
यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा
कार्यक्रम खूप आवडायचा. त्यातील
'नास्तिकते' वरची कविता - ईश्वरावर
सर्व भार न टाकता,
जो स्वतः भार सांभाळू शकतो,
ईश्वरालाही तो आवडतो' या
अर्थाची - त्याला खूप आवडायची. आम्हा
दोघांनाही त्यावेळी प्रमोद आठवायचा. त्यावर आमची चर्चाही झाली
होती.
ती कविता अशीः 'नास्तिक'
(संदीप खरे)
"एक
खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा
खरं तर गाभाऱ्यातच भर
पडत असते
कि कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा
होते निर्माण गरज
देवाने
आपला आळस झटकून देवळाबाहेर
येण्याची
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा
कोऱ्या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या
हालचाली, भाविकांच्या जत्रा..
कोणीतरी
स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर
सांभाळत
असल्याचे समाधान लागते देवालाच
म्हणून
तर एक खराखुरा नास्तिक
जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा
देवाला एक भक्त कमी
मिळत असेल कदाचित
पण मिळते आकंठ समाधान एक
सहकारी लाभल्याचे
देऊळ
बंद झाल्यावर एक मस्त आळस
देऊन
बाहेर
ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव
म्हणतो, ‘दर्शन देत जा अधून
मधून..
तुमचा
विश्वास नसेल आमच्यावर पण
आमचा तर आहे ना!’
देवळाबाहेर
थांबलेला एक खराखुरा नास्तिक
कंटाळलेल्या
देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात
तेव्हा
कुठे अनंत वर्षे आपण
घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या
भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे!"
त्याने
'उद्या लग्न आहे' या
काव्याचे वाचन शरयूच्या लग्नाच्या
आधल्या दिवशी जेवण समारंभ आयोजित
करुन, अनेक लोकांना आमंत्रित
करुन केले होते. त्याचे
ते पुस्तक त्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेकडेही पाठवले होते. 'पुरस्कारांचे काय निकष असतात
- माहीत नाही' - असे तो म्हणाला
होता. मी त्यावेळी मुंबईला
होते. 'तुझा डायरेक्ट परमेश्वराकडे
वशिला आहे' असे त्याने
फोनवरुन बोलताना म्हंटले होते. अशा विषयावरचे काव्य
मराठीत उपलब्ध नाही, तुझ्या पुस्तकाला बक्षीस मिळायलाच हवे असे मी
म्हंटले होते. 'उद्या लग्न आहे' चे
ठिकठिकाणी त्याने कार्यक्रम केले. याची प्रेरणा त्याने
'आयुष्यावर बोलू काही' या
कार्यक्रमावरुन घेतली असल्याचे तो माझ्याजवळ बोलला
होता. अनेकांपर्यंत त्याचे काव्य पोहोचले याचा आनंद वाटतो.
कुटुंबातील
व परिवारातील सर्वच सुहृदांना त्याच्या प्रेमळतेचा अनुभव आलेलाच आहे. त्याचे शाळेपासूनचे
मित्र 'देव' व 'गायकी'
त्याचे अखेरपर्यंत निकट संबंधीयच राहिले.
त्याने 'ब्लॉग' काढले. त्याचे सर्व लिखाण, त्यावर
उपलब्ध आहे. बाबांची जन्मशताब्दी
२०१५ मधे त्याने साजरी
केली. त्यानिमित्ताने 'मोहरीर' ग्रूप' तयार झाला. सर्वांनी
मुक्तपणाने लिहावे अशी त्याची इच्छा
होती.
सर्वजण लिहिते बोलते झाले. ग्रूपमुळे जास्तीतजास्त जवळ आले. त्याने
ज्या 'पाऊलखुणा' तयार करुन ठेवल्या
आहेत, त्याच्यावर आम्ही आजही चालतो आहोत.
'काळावर अमीट ठसा उमटविणे'
म्हणजे काय याचे तो
प्रत्यंतर नेहमीच देत आला आहे.
अरुणला 'विसरणे' अशक्य आहे. आम्ही जोपर्यंत
आहोत तोपर्यंत तो सदैव आमच्यासोबत
आहे. त्याचे साहित्य 'अमर' आहे. 'अर्नाळपुराण' खूपच वाचनीय, नावीन्यपूर्ण,
प्रतिभायुक्त व स्वयंभू आहे.
'स्वयंभू'
हा शब्द त्याच्या आयुष्याला
तंतोतंत लागू पडतो. कुणाचेही
त्याने कधीही अनुकरण केले नाही व
कधी कशाची प्रौढीही मिरवली नाही. जितका ज्ञानी तितका नम्र हे त्याने
आचरुन दाखविले.
२०१७ मधील भाऊबीजेच्या
दिवशी त्याच्या बाळ १, बाळ
२ व बाळ ३
या प्रमोदवरील लिखाणाचे व बाळविजयचे वाचन
मी केले. अमोल, मृदुला, विशाल, मी या सर्वांना,
सरिताने फोन करुन जेवायला
बोलावले होते. आम्ही गेलो, जेवणे झाली, त्याआधी भाऊबीजेचे ओवाळणे झाले. मी त्याला सहजच
विचारले की अजून काही
लिहितो आहेस का? त्याने
त्याचे हे सर्व लिखाणच
मला दाखविले. मग मी ते
तिथेच सर्व चार तास
मोठ्याने वाचले. त्याची लिखाणपध्दती वर्णन करण्यापलीकडची आहे. नारद, ब्रह्मा
यांना तो काल्पनिक पात्रे
म्हणतो, पण ती पात्रे
आपल्या मनाची इतकी पकड घेतात
की मला तर ती
वावरतातच आहेत असे वाटते.
प्रमोदवरील त्याचे प्रेम तर त्यात आहेच,
पण एखाद्याचा इतिहास कसा लिहावा याचे
प्रत्यंतर अरुणने दिलेले आहे. त्याचे पुस्तक
तयार करुन ते त्याने
नंतर आम्हाला दिले. प्रमोदचे हे सर्व गुणवर्णन
त्याने इतक्या आत्मीयतेने केले आहे की
त्यातून सर्व मोहरीर घराण्याचा
संस्कार अभिव्यक्त होत राहतो. आईवरील
हे काव्य आहे असे तो
म्हणायचा! पूर्ण ते लिखाण वाचणे
म्हणजे एक अपूर्व अनुभूती
आहे. अभिजात साहित्याचा तो निकष आहे.
इतके निर्मळ, इतके रसास्वादी साहित्य
अरुणच लिहू जाणे.
उच्चतम
पातळीचे साहित्य लिहिण्यात अरुणचा हातखंडा त्याच्या सर्वच लिखाणातून जाणवतो. 'अध्यक्ष महाराज' या बाबांवरील पुस्तकातून
त्याने जी टिप्पणी केली
आहे, तिथपासूनच त्याची प्रतिभा प्रस्फुरित होत राहिली. पुस्तके
बाबांची, त्यांना लिहिते करण्याची प्रेरणा - 'मज्जीवनमणिमाला' लिहिण्याची प्रेरणा अरुणनेच
दिली. बाबांचा वेळ चांगला जाईल
म्हणून मी तसे म्हणालो
पण बाबांनी फारच लवकर सर्व
लिहून काढले असे तो माझ्याजवळ
बोलला होता.
वाचकहो, बाबांची पुस्तके तर वाचनीय, अभ्यसनीय
व प्रेरक आहेतच पण अरुणचे त्या
पुस्तकांसाठी घेतलेले 'परिश्रम' ही खूप नावाजण्याजोगती
बाब आहे.
राम शेवाळकर 'अध्यक्ष
महाराज'च्या प्रकाशनासाठी आले
होते. अरुणचे, ते सर्व पुस्तकांचे
कार्य पाहून ते खूप प्रभावित
झाले होते. अरुणशी बोलून त्यांनी त्याची तारीफ केली होती. 'कल्पनेचा
बादशहा' होता अरुण. नवनिर्माणक्षमता
तर त्याच्यात होतीच पण काय काय
करता येऊ शकेल याबाबतीत
त्याची कल्पनाशक्ती झेप घ्यायची. २०१५
साली बाबांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा 'श्रीगणेशा' त्यानेच केला, आणि एक माहौल
तयार झाला. २०१५ साल प्रत्येकाला
जसे आपण लेखकच आहो
असे वाटायला लागले. लिहिण्यासाठी लहानमोठ्यांचे हात सरसावू लागले.
त्याने 'मोहरीर ग्रूप' तयार करण्याची प्रेरणा
'कविता'ला दिली. सरिता(अरुणची बायको), कविता(सुधीर मोहरीरची बायको) या दोघी सख्ख्या
बहिणी. या सर्वांनी मिळून
हा ग्रूप भरभराटीला आणला. सर्वजण त्यानिमित्ताने खूप जवळ येतील
ही अचाट कल्पना अरुणचीच!
झालेही तसेच! पण त्या 'ग्रूप'वर त्याच्यावरच लिहावे
लागेल हे मात्र माहीत
नव्हते. ते आमचे दुर्दैव!
बाबा
व प्रमोदच्या नावाने रविनगर येथील सी.पी.अँड
बेरार शाखेत दोन खोल्या बांधायच्या,
बाबांच्या नावाने लायब्ररी रुम व प्रमोदच्या
नावाने विज्ञान प्रयोगशाळा असा एक आराखडा
विजयाने मांडला. त्यानुसार अरुण व सुधीरने
त्या शाळेला लाखांच्या गिणतीत अर्थसाहाय्य केले. विजयाने इतरांकडूनही वर्गणी जमा केली पण
मोठा हिस्सा या दोघांचा होता.
त्या खोल्यांच्या उद्घाटनासाठी मी व मृदुला
नागपूरला गेलो होतो. शांता
मावशी त्यावेळी आजारी होती. ती ८० वर्षांची
होती. दवाखान्यात admit होती. गुढीपाडव्याच्या दिवशी मावशीचा जन्म व
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी मृत्यू! ८० वर्षांचा काळ
- त्यात अनेकांचा सहभाग. तिच्या मृत्यूच्या काळातही, दुखण्यात आर्थिक मदतीचा हात अरुण व
सुधीरचाच होता. सर्वांचाच सहकार होता,
पण अरुणशिवाय सर्वांचेच अडत असे. अरुणची
या खोल्यांच्या उद्घाटनादिवशी भेट झाली होती.
भोजन समारंभही आयोजित केला होता. अरुण
खूप तुरतुरीत वाटायचा. आम्ही सर्वजण 'अवजड' होतो.
तत्कालीन पेट्रोलियम मंत्री 'राम नाईक' यांच्या
सल्लागार मंडळात अरुण होता. त्याच्या
व्यावसायिक जबाबदाऱ्यांचाही त्याच्यावर भार होता. ठिकठिकाणी
व्याख्याने, दौरे - देश-परदेशात चालूच
असायचे. 'तुझी Bag तुला नेहमी तयारच
ठेवावी लागत असेल.' असे
मी त्याला म्हणायचे! कामाव्यतिरिक्त कुठे काही बघायला
जायला मला वेळच नसतो
असे तो म्हणायचा!
इतक्या
सर्व व्यस्त जीवनप्रणालीत तो नागपूरलाही 'निरी'मध्ये व्याख्यानांसाठी यायचा. नागपूरात राहणाऱ्या सर्व कुटुंबियांची भेट
घ्यायचा.
सगळ्या
तारीखवार नोंदी करणे मला आवश्यक
वाटत नाही. कारण हा अरुणचा
इतिहास नाही. 'अरुण' काय आयुष्य जगला
याचा हा केवळ धावता
आढावा आहे.
शरयूच्या लग्नाची त्याने मंगलाष्टके केली. मंगलाष्टके करण्यात त्याचा हातखंडा दिसला. अमोलच्याही लग्नाची मंगलाष्टके त्याचीच!
काव्यातील
भावपूर्णता, परिपूर्णता, नावीन्यशीलता व सौंदर्य अभिव्यक्ती
ही अरुणची नेहमीच वैशिष्ट्ये राहिली आहेत.
'मराठीचे
एम.ए.' नसताना इतके
सर्व सुंदर लिखाण त्याने केले. 'खरी प्रतिभा' हे
वरदान त्याला लाभले होते.
मला पुरेसे अभिव्यक्त
होता येत नाही आहे
हे मला पदोपदी जाणवत
आहे. एकतर त्याच्या लिखाणाचे
वर्णन करायचे म्हंटले तर काय काय
अवतरणे देणार हा प्रश्नच पडतो.
सर्वच लिखाण उत्तम - तेंव्हा मंडळी! त्याचे लिखाण प्रत्यक्ष वाचून त्याचा आस्वाद घेण्यात जो आनंद आहे
तो निव्वळ काही अवतरणांतून मिळण्याजोगा
नाही.
वर्णनातीत, कल्पनातीत, अचाट, अतर्क्य, अमोघ, अनाकलनीय असे कर्तृत्व मला
नेहमीच अरुणचे वाटत आले आहे.
त्याच्या
लिखाणावर त्याच्याच इच्छेनुसार मी लिहिले आहे.
त्याने माझे ५ लेख
त्याच्या ब्लॉगवर घेतले आहेत. त्याच्या ब्लॉगच्या लिंकही तो पाठवित असे.
स्वतःला जंतुकवी म्हणवून घेत असे. विनम्र
किती असावे याचा तो नमुना
आहे.
'प्रमोदला शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार भूभौतिकी म्हणजे geophysics मधे मिळाला असे
जे म्हणतात ते फारच फार
तर अर्धसत्य आहे' असे तो
म्हणायचा. हा पुरस्कार त्याला
Earth, Environment, Ocean & Planetary sciences मध्ये देण्यात आला. 'ब्रह्मा, भूगर्भ, वातावरण, समुद्र आणि खगोल सोडले
तर तुझ्या सृष्टीत उरलेच काय रे? स्वर्ग,
पृथ्वी, पाताळ आलेच की!' असे
त्याने प्रमोदच्या संदर्भात, प्रमोदचे ज्ञान किती अगाध होते
- हे सांगण्यासाठी लिहिले आहे.
'Pattern
Recognition Trans
forms' असे
प्रमोदच्या पुस्तकाचे शीर्षक आहे. प्रमोदचेही बरेच
काम अपुरे राहिले. अरुणने प्रमोदविषयी सविस्तर विवेचन करताना; त्याने किती पुरेपूर त्याच्या
ग्रंथांचा अभ्यास केला आहे हे
दाखवून दिले आहे. 'Non - Uniqueness in Geoscientific
Inference' हा प्रमोदचा दुसरा संशोधन ग्रंथ - त्यावरचेही विवेचन अरुणचा सखोल अभ्यास दर्शविते.
प्रमोदच्या ग्रंथाला अरुणची 'विस्तृत' प्रस्तावना असून त्याने इंग्लंडमधून
तो ग्रंथ प्रकाशित व्हावयाचा होता ते काम
पूर्ण करुन घेतले.
अरुणची ती प्रस्तावना जाणकारांना
त्याचा अभ्यास दाखवून देणारी आहे; म्हणून अरुणचे
सर्व लिखाण प्रत्यक्ष वाचणे आवश्यक आहे.
विज्ञान व साहित्यातील अरुणची
भरारी उत्तुंग आहे. वाचकहो! त्याचे
साहित्य मिळवा, वाचा, स्वतःचे ज्ञान वाढवा, आपण असे काही
करु शकतो का याचा
विचार करा. करता येईल
तेवढे करण्याची प्रेरणा घ्या.
अमाप
त्याने लिहून ठेवले. डोके किती चालत
होते. हात टाईप करत
होते. ब्लॉग अपुरे पडत होते. मेंदू
शीणत नव्हता. डोक्यात सर्व खच्चून भरले
होते. जणू हे सर्व
करताना काही त्याला प्रयासच
झाले नाहीत असे वाटावे असे
त्याचे कार्य होते. कसे काय तो
इतके करु शकला? त्याच्यासारखे
आपण लिहू शकत नाही,
याची सतत जाणीव होत
राहते.
अमोलचा मुलगा 'आरव'च्या बारशाची
पार्टी २२ जुलै २०१८
ला मुंबईला ठरविण्यात आली. त्यासाठी अरुण
व सरिता आले होते. ती
त्याची व माझी शेवटचीच
भेट ठरली. 'माझ्या शरीरात खूप उष्णता झाली
आहे. दाह होतो. बोटांची
नखें आपोआप गळून पडतात' असे
तो बोलला होता. पण ही सर्व
कशाची लक्षणें हे मला काहीच
समजले नाही. औषधे त्याला चालू
असणार!
खूप वाईट वाटते.
त्याला अजून आयुष्य लाभले
असते तर त्याच्यासारख्याने किती काय
काय केले असते; पण
आपल्या हातात काहीच नसते याची पदोपदी
जाणीव देणारा मृत्यू अटळच असतो.
"जिंदगी तो बेवफा है
एक दिन ठुकराएगी
मौत मेहबुबा है
अपने साथ लेकर जाएगी
मर के जिने
की अदा जो दुनिया
को सिखलायेगा
वो मुकद्दर का सिकंदर जानेमन
कहलायेगा" - हे गीत उगीचच
आठवत राहते. अरुण तर कार्यकर्तृत्वाने,
साहित्याच्या विपुल व अभिजात निर्मितीने
अमरपदाला पोहचला.
२५ नोव्हेंबर १९५३ सालचा अरुणचा
जन्म म्हणजे मोहरीर घराण्याची धुरा सांभाळणारा जन्माला
आला आहे याचा विश्वासच
जणू त्याने त्याच्या आगमनाने दिला. आईबाबा खूप भाग्यवान की
अशी पुत्ररत्नें त्यांना प्राप्त झाली. त्यांची तपश्चर्या फळाला आली म्हणावयाचे!
आईशी फोनवर बोलणे
होत असते. आई बंगलोरला सुधीरकडे
आहे. ती येत्या १४
जुलैला ९५ वर्षांची पूर्ण
होईल. तिलाही मध्यंतरी 'नागीण' झाली. पायातली ताकद गेली. अरुणचे
दुखणे कुणालाच कळविण्यात न येण्याचे कारण
आईवर परिणाम होऊ नये हे
असण्याची जास्ती शक्यता आहे. आई व
अरुण हे अत्यंत प्रेमाचे
नाते आहे. आईने त्याच्या
जाण्याचा धक्का तर सहन केला,
पण ती त्याला 'मृत्यूंजय'
म्हणते. तिला, तो त्याची Bag घेऊन
उडत वर जाताना दिसला,
मी त्याच्या पाठीमागे धावली, 'येतो' म्हणणारा त्यावेळी 'जातो' म्हणाला व उडून गेला
असे दिसल्याचे ती सांगते. आत्यंतिक
प्रेमाचीच ही लक्षणें असतात.
अरुणवर मी लिहीत आहे
हे तिला कळल्यावर आता
९ व १० फेब्रुवारी
२०२० ला आमचा फोन
झाला, त्यात तिने मला ही
घटना सांगितली.
'उद्या
लग्न आहे', 'मानव चंद्र', 'आईबाबा,'
'वाड्यावरील लिखाण,' 'प्रमोदवरील लिखाण,' 'पुराणग्रंथावरुन काढलेला निष्कर्ष'- असे सर्व लिखाण
करण्यात अरुणने स्वतःला गुंतवून घेतले. त्यात तो रमला. आम्ही
सर्वांनी त्या, त्या वेळी त्याच्या
लिखाणाचे वाचन करुन त्यावरील
अभिप्राय दिलेले आहेत. 'मोहरीर ग्रूप' खूप कार्यरत होता.
ते दिवस आता पुन्हा
येणे नाहीत.
उद्या लग्न आहे, मानवचंद्र,
बालवेद, प्रमोदवरील लिखाण, वाड्यावरील लिखाण या सर्वांवरचे मोठेमोठे
लेख मी वेळोवेळी लिहिले
व त्याला पाठविण्यात आले. त्याने ते
त्याच्या ब्लॉगवर घेतले. माझ्या लिखाणाची समीक्षक तूच आहेस असे
तो म्हणायचा, पण त्याच्या लिखाणातील
सौंदर्यस्थळे इतकी अगणित आहेत
की त्यांचा पूर्णतः परामर्श घेणे कुणालाच शक्य
होत नाही याची मला
परिपूर्ण जाणीव आहे. त्याचे मी
वेळोवेळी अभिनंदन करु शकले याचा
मला आनंद आहे. जेव्हाच्या
तेव्हा वाटले की पावती देऊन
टाकावी, पुढचे कुणी पाहिले?
आज मी त्याच्यावर
लिहीत आहे हे त्याला
थोडीच माहीत? जितकी समर्थपणाने माझी लेखणी चालायला
हवी होती तितकी ती
चालत नाही आहे हे
मला पदोपदी जाणवत आहे. काय करु?
त्याचे लिखाण 'गारुड' करणारे आहे.
त्याचे
'आईबाबा' व एकूणच सुहृदांवरील
प्रेम, त्याचा हासरा चेहरा, त्याची उदार वृत्ती, त्याची
विनोदप्रवणता, त्याची बुध्दीमत्ता, त्याची रसिकता, त्याची व्यायामशीलता, त्याचा कार्य करण्याचा झपाटा, त्याच्या लिखाणातली 'अभिजात'ता - अरुण दशांगुळे
पुरुन उरला आहे.
मी त्याचे वर्णन करण्याला असमर्थ आहे. 'साहित्याचा सूर्योदय' त्याने केला. आता त्याचे मौलिक
विचार, त्याचे 'नारद-ब्रह्मा' आपल्याला
पुन्हा वाटणीला येणार नाहीत याचे निरंतर दुःख
आहे.
अनंत आठवणींचे भांडार
मला खुणावते आहे. त्या आठवणी
माझा पिच्छा पुरवित आहेत. गोंदिया, अकोला, त्याआधी तुमसर या सर्व ठिकाणी
तो अधूनमधून येऊन गेला. अकोल्याला
एकदा आला असताना मृदुलाला
त्याने विचारले, 'तुला काय घेऊन
देऊ?' त्यावर मृदुलाने 'फुगा' म्हंटले होते. तो खूप हसला
होता व 'फुगा' घेण्यासाठी
आम्ही सर्वच बाहेर पडलो होतो.
महालक्ष्म्यांचा नैवेद्य घेऊन तो गोंदियाला
आला होता. तुम्हाला लवकर नैवेद्य मिळावा
म्हणून आईने लवकरच सर्व
स्वयंपाक केला व मी
गोंदियाची ट्रेन गाठली असे बोलला. आम्ही
अकोल्याला घर घेतले तेव्हा
आई, विजया, अरुण व सुधीर
चौघेजण घर पाहण्यासाठी आले
होते. तेव्हा विश्राम अमरावतीला होता. त्याच्याकडून माझ्याकडे आले होते.
तू सर्व कामें
करतेस म्हणूनच तुझी तब्येत चांगली
राहते, असे म्हणावयाचा! गेल्या
सात-आठ वर्षात त्याचे
अकोल्याला येणे जमले नाही.
एकतर विमान प्रवासाची त्यांना सवय! अकोल्याला विमानतळ
नाही हा त्यांना त्यांच्या
कार्यसंपृक्ततेत अडथळा वाटायचा. पण आम्हा सर्वांचे
वैशिष्ट्य हे होते की,
फोन नसला, पत्रव्यवहार नसला, गाठीभेटीही झाल्या नाहीत तरी आमचे सर्वांचे
एकमेकांवर अतूट प्रेम होते.
त्यात कधीच खंड पडला
नाही. जेव्हा एकत्र येत असू त्यावेळी
दिवाळी असावयाची.
२० डिसेंबर २०१२ ला मुकुंदराव
पाटखेडकर अनंतात विलीन झाले. त्याआधीचे त्यांचे दवाखान्यातील(मुंबईतील)वास्तव्य! अरुण, सरिता, शरयू ,मंजिरी, शरयूचा तेव्हा होणारा भावी नवरा 'अतीत,'
मंदा, कौस्तुभ या सर्वांची दवाखान्याला
भेट असावयाची. अमोलचे लग्न २७ डिसेंबर
२०१९ ला ठरले होते.
सात दिवस आधीच ही
घटना घडली. सर्वजण उपस्थित होते. शरयूचे साक्षगंध ठरले होते. त्यांना
अहमदाबादला जायचे होते. पुढे २९ जानेवारी
२०१३ ला अमोलचे लग्न
झाले. तेव्हाही हे सर्वजण उपस्थित
होते. अरुणने माझी पाठ थोपटली
होती. अनेकानेक प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर येत
आहेत.
बाबा, प्रमोद, अरुण या सर्वांची
पत्रें हा एक चलतचित्रपट
माझ्यासमोर आहेच. त्याने M.T.P.L. कंपनी काढली त्यावेळी मी अभिनंदनाचे पत्र पाठविले
होते. 'पत्र लिहिण्यात तुझा
हात कुणी धरु शकणार
नाही' असे त्याने उत्तरात
लिहिले. या सर्व आयुष्याचा
अविभाज्य भाग असणाऱ्या व्यक्ती
निघून गेल्यात पण त्यांच्या आठवणी
पाठपुरावा करतच आहेत व
करतच राहणार आहेत.
'आईबाबांनी खूप मोठे कार्य
करुन ठेवले आहे' असे अरुण
नेहमी म्हणायचा. विक्रम पत्तरकिने अमेरिकेत असल्यामुळे त्याने पत्तरकिने व मोहरीर घराण्यासाठी
खूप काही करावे अशी
अरुणची अपेक्षा होती, पण तो काहीच
करत नाही याची त्याला
खंतही होती.
आरवच्या डोक्यावरून त्याने त्याचा हात प्रेमाने फिरवला
होता. त्याला 'प्रिन्स' म्हणाला होता. त्याच्या मोठ्या डोक्याचे कौतुक केले होते. 'सर्वप्रहरणायुध'
असे त्याचे नाव ठेवायला हवे
होते असे हसत म्हणाला
होता. अमोलने जी 'शेरवानी' घातली
होती; त्याची बटने तिरपी होती,
त्याच्यावरही त्याने पूर्वीचे शिंपी किती सरळ बटने
लावायचे, आता किती कपडा
वाया घालवतात असे विनोदाने म्हंटले
होते. हॉलमधून जाण्यापूर्वी वळून वळून माझ्याकडे
पाहत होता. जणू काय आता
पुन्हा भेट होणे नाही
हे त्याला माहीतच होते. तसेच झाले.
मृत्यूला तो खूप धीराने
सामोरा गेला. 'आपुले
मरण पाहिले म्या डोळा, तो
सुख सोहळा अनुपम्य' - ही तुकारामाची उक्तीच
जणू काय त्याने आचरुन
दाखवली. सांगा मंडळी; कसे काय विसरणार
हे सर्व? तरीही आपण येणाऱ्या काळाला
सामोरे जातच आहोत. कारण
आपलाही पंथ तोच आहे.
प्रत्येक मरण तुम्हाला कणाकणाने
मारतच असते.
लेखक,
कवी, संपादक, प्रकाशक, व्याख्याता या सर्वच अरुणच्या
व्यक्तित्वातील छटा! त्याने बाबांच्या
पुस्तकांचे संपादन करुन, त्यावर भाष्य करुन, त्याद्वारे सर्वांना आपल्याबरोबर घेऊन चालण्याची खुबी
त्याने नेहमीच दाखविली.
'उत्तम नियोजक,' संयोजक, किती रुपे सांगावी?
त्याची 'अनंत रुपे, अनंत
भाषारुपे तो नटला' हेच
खरे! त्याचे सर्वच साहित्य; डोळ्यांना आज पाण्याने भरुन
टाकते कारण त्यातील आत्मीयता!
त्याच्या लिखाणाला, काव्य प्रतिभेला शतशः प्रणाम करावासा
वाटतो. त्याने आम्हा सर्वांना इतके विविध प्रकारचे
लेखन करुन उपकृत करुन
ठेवले आहे. त्याने जो
आनंद आम्हाला दिलेला आहे त्याची परतफेड
कोणत्याच जन्मी शक्य नाही. आम्ही
सर्वजण त्याच्या कर्तृत्वाने अक्षरशः निःशब्द होऊन जातो. मोहरीर
कुळातील हा दैदिप्यमान 'अरुण'
अक्षरशः आम्हाला झपाटून टाकतो व त्याच्या आठवणींनी
आम्ही व्याकूळ होतो, त्याच्या लिखाणाने भारावून जातो.
त्याची वेळोवेळी मी अभिनंदनाची थाप देऊन
पावती देऊ शकली; एवढाच
मला आज आनंद वाटतो.
मंडळी, फुरसत काढून 'अरुण' वाचा. 'एक तरी ओवी
अनुभवावी' असे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत
म्हंटले जाते. तेच मला अरुणच्या
सर्व आयुष्याच्या बाबतीत म्हणावेसे वाटते. मी त्याच्या लिखाणातील
एकही अवतरण दिलेले नाही, कारण - तुम्ही ते मिळवा, वाचा,
प्रगल्भ व्हा, लिहिते व्हा, ही माझी इच्छा
आहे. अरुणचे पूर्ण आयुष्य अभ्यसनीय आहे. कसे वागावे,
बोलावे, लिहावे, चालावे, चालवावे याचा 'अरुण' म्हणजे अखंड 'परिपाठ' मला वाटतो.
'नारद' ही व्यक्तीरेखा त्याला
खूप प्रिय होती. उगाच नाही त्याने
'नारद-ब्रह्मा' या प्रतिमा त्याच्या
साहित्यात आणल्या. तो त्यांना काल्पनिक
म्हणतो, पण त्या अक्षरशः
जिवंत केल्या की त्याने! नारद
ब्रह्माच्या द्वारे त्याने आपल्याला अक्षरशः ज्ञानामृत पाजले. त्या अमृताने त्याचे
साहित्य तर अमर झालेच
पण त्या रसास्वादात रसिक
न्हाऊन निघणार हे तर 'त्रिकालाबाधित
सत्य' आहे.
तो
'भाऊ' असल्याचा मला खूप अभिमान
आहे.त्याच्याद्वारे सारे कुळ उजळून
निघाले. 'दिगंत कीर्ती,' यश त्याने अनुभवले
याचा आनंद आहे. 'मरणावरचा
त्याचा विजय' हा तर खूपच
शिकवून जाणारा आहे. मोठमोठया व्यक्तित्वांची
आपल्या देशात कमतरता नाही. 'अरुण' मला त्यांच्याच मालिकेतला
एक लखलखता सितारा वाटतो. अनेक विद्यार्थ्यांना त्याने
पीएचडीचे गायडन्स दिले. दुर्बल आर्थिक परिस्थितीतील हुशार मुलांना कोर्सची फी न घेता
पुढे आणले, असे ऐकलेले आहे.
तो प्रसिध्दीच्या मागे कधी लागला
नाही. स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ त्याने कधी केली नाही.
जुनी गोष्ट आहे.
अष्टविनायकाची यात्रा करत असता आम्ही
दोघे अरुणकडे मुंबईला रात्री पोहोचलो. त्याने दुसऱ्या दिवशी त्याचा नागपूरातील रविनगरचा फ्लॅट तुला देतो, तू
तेथील सर्वांची काळजी घेऊ शकशील असे
म्हंटले होते. आम्ही ते टाळले होते.
त्याची कारही देण्याचे त्याने बोलून दाखविले, तो मुद्दाही आम्ही
बारगळवला. उदारपणाचे जणू व्रतच घेतले
होते त्याने! 'इतका देवधर्म नको
करु!' असे तो म्हणायचा.
त्यापेक्षा लिखाणाचे काम मी करावे
अशी त्याची इच्छा होती.
त्याला 'बाळविजय' पूर्ण पाठ होते. कारने
येता-जाता तो सारखे
त्याचेच रेकॉर्डिंग ऐकायचा. प्रमोदविषयीचा आदर, प्रेम व
अभिमान त्याच्या नसानसांत भरला होता. प्रमोदला
तो 'चार्वाक' म्हणायचा. मीही 'चार्वाका'वर लिहीले होते.
मला म्हणायचा तू चार्वाकावर लिहू
नको. मी लिहितो. त्याने
तसा एक मोठा लेखही
लिहिलेला आहे. कौस्तुभच्या लग्नप्रसंगी
मी, विश्राम, अरुण, मृदुला यांची एक 'मैफलच' या
संदर्भात जमली होती. लिखाणावरची
चर्चा प्रामुख्याने त्यात सामील होती. आम्ही अकोल्यावरुन व अमोल हैद्राबादवरुन
त्या लग्नासाठी नागपूरला आलो होतो. अमोलच्या
कारने कार्यालयात पोहचत असताना; अमोलच्या कारची मागच्या कारला ठोकर बसली, त्यामुळे,
त्या सर्व भानगडीत आम्हाला
कार्यालयात पोहचायला उशीर झाला. अरुण
आतुरतेने आमची वाट पाहत
होता. 'खुर्च्या तुमची वाट पाहत आहेत'
असा त्याचा मेसेजही आला होता. माझ्या
लेखांचे टाईपिंग मृदुला करीत असे. अमोलने
आमच्या लिखाणाचा ब्लॉग काढला होता. त्याने या दोघांचे खूप
कौतुक केले होते. ते
सर्व प्रसंग आजही डोळ्यांसमोर जसेच्या
तसे दिसतात.
"मरावे परि कीर्तीरुपे उरावे"
- रामदास. हेच खरे! व्यक्ती
कधीच संपत नसते, त्याच्या
कीर्तीचा सुगंध शतकानुशतके दरवळतच राहतो. आपल्या संस्कृतीत तर आत्मा अमर
आहे, देह जातो पण
आत्मा दुसरा देह धारण करतो
असेच आहे ना!
"वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृण्हाति नरोs पराणि
तथा शरीराणि विहाय
जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही"
गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील २२ वा श्लोक
आपल्याला आठवणारच!
संगीता पाटखेडकर.
१ मार्च २०२०