Tuesday, 13 December 2022

अपभ्रंशित महाभारत

(संदर्भ: महाभारत ही एक तोंडोतोंडी चालत आलेली कथा / कविता आहे आणि म्हणून वेद व्यासांनी जसे ते लिहिले तसेच्या तसे आपल्यापर्यंत पोहोचले नाही. त्याची अपभ्रंशित (निकृष्ट - लोवर ग्रेड) प्रत आपल्यापर्यंत पोहोचली. बी. आर. चोप्रा महाभारताने त्यात भर घातली. 

उदाहरणार्थ: 

१. कर्णाला सतत सूतपुत्र म्हणून ज्यानी-त्यानी हिणवणे पण व्यास महाभारतात तसे नाही

२. युधिष्ठिराला निर्णय न घेणारा आणि कमजोर दाखवले पण व्यास महाभारतात तर तो नायक आहे आणि कृष्ण हा महानायक आहे

३. द्रौपदीला खूप तापट स्वभावाची आणि मनात येईल ते ताबडतोब बोलणारी दाखवली आहे पण व्यास महाभारतात तसे नाही

४ एकलव्यावरील चुकीची माहिती

वगैरे वगैरे. 

ह्या सर्व्ह त्रुटींना सुधारत व्यासांनी ही व्यक्तिचित्रे कशी रंगवली होती हे दर्शवणारी खालील कविता)


कवितेतल्या कवितेला, समजायचे आहे

नाही शब्दार्थ, भावार्थ समजायचे आहे || १ ||


वाटली जड गीता, वाचली उथळ वरवर

न येति पाळता, वचने फार बडबड || २ ||


वाचली परत एकचित्त, अर्थगर्भ अथांग

निर्मळ स्थिर पाणी, खोलात खोल || ३ ||


पाहिले महाभारत, सांगितले दुसऱ्यांनी

म्हणावयाचे व्यासांना काय, बघ पडताळूनि || ४ ||


अर्जुन पुत्र अभिमन्यू, अभिमन्यू पुत्र परीक्षित 

परीक्षित पुत्र जन्मेजय, राजयज्ञ करीत  || ५ ||


जन्मेजय यज्ञी, दाखवे उत्सुकता

जाणुनी घेण्या, पूर्वज इतिहासा || ६ ||


वैशम्पायन, वेद व्यास आज्ञा

सांगे यज्ञी, महाभारत कथा || ७ ||


नंतर उग्रश्रवा सौती, आपुल्या शिष्या

सांगती, महाभारत कथा || ८ ||


(संदर्भ: अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यू पुत्र परीक्षित, परीक्षित पुत्र जन्मेजय ह्याच्या एका यज्ञात आपले पूर्वज कसे होते हे जाणून घेण्याची इच्छा जाहीर करतो आणि मग वेद व्यासांच्या आज्ञेवरून, वैशंपायन ऋषी त्या यज्ञात महाभारत कथा सांगतात. तिथे उग्रश्रवा सौती साधू उपस्थित होते आणि नंतर ते ही कथा त्यांच्या शिष्यांना सांगतात. सौती म्हणजे सूत. ते स्वतः सूत होते आणि त्यांनी ही कथा प्रचलित केली. 

त्या काळात सुताला कमी लेखत नसत ह्याचा हा पुरावा. सूत हा युद्धात निपुण शिवाय सारथी पण असायचा म्हणून त्याचा मान होता. स्वतः कृष्ण नंतर अर्जुनाचा सारथी (सूत) बनला. अज्ञातवासात पांडव जिथे राहिले त्या विराट राजाने सूत पुत्रीशी विवाह केला होता आणि किचक हा त्याचा सेनापती सुद्धा सूत होता. हे सर्व पाहता सूतपुत्र म्हणून कर्णाला कोणी हिणवले असे व्यास महाभारतात नाही.)


द्रोण न नकारी, अधिरथपुत्र कर्णास शिष्य

द्रोण न अवमानी, राज्यबांधिल गुरुकर्तव्य || ९ || 


द्रोण न देई, कोणासी ब्रह्मास्त्रविद्या

द्रोण न माने, पात्र ती कोणी घेण्या || १० ||


अश्वत्थामा पाठपुरावा, शिकविले ब्रह्मास्त्र चालवण्या

अपात्र ठरला, परत त्याला घेण्या || ११ || 


ब्राह्मण पिता शुद्र माता, शुद्र पिता क्षत्रिय माता

पुत्र ह्यांचा, निषाद जात || १२ ||


निषाद करिती शिकार, बनविती शस्त्र

सत्यवती होती निषाद, मासेमारी व्यवसाय || १३ ||


द्रोणांनी नाकारला शिष्य एकलव्य, निषादराज पुत्र

जात पात कारण नाही, शिष्य फक्त राजपुत्र || १४ ||


वडील मृत्यूनंतर, एकलव्य झाला निषादराज

उपहार देई युधिष्ठिरा, राजसूय यज्ञ || १५ ||


निषादराज जरासंध संधी, आक्रमण द्वारिकेवरी जरासंध वधानंतरी

कृष्ण वधे एकलव्य, युद्धप्रसंगी || १६ ||


(संदर्भ: द्रोणाचार्य हे राजगुरू होते म्हणजे ते राजपरिवारातील लोकांना शिक्षा देण्यास बांधील होते. शिवाय ते राजाचे सल्लागार देखील होते. ह्या सर्व व्यापात ते व्यस्त होते. त्यांनी कर्णाला सुध्दा शिकविले. तो राजघराण्यातील सार्थ्याचा (अधिरथ पुत्र - अधिरथ हा धृतराष्ट्रासाठी काम करत होता) मुलगा होता. ते त्याला नाकारू शकत नव्हते. परंतु त्यांनी कोणालाच ब्रह्मास्त्र विद्या शिकविली नाही. अश्वथ्थाम्याने खूप पाठपुरावा करून आपल्या वडिलांकडून (द्रोणांकडून) जबरदस्तीने ब्रह्मास्त्र कसे चालवायचे ह्याची विद्या अर्जित केली पण वापस कसे मागवायचे हे शिकूच शकला नाही. म्हणूनच कर्ण नंतर परशुरामांकडे ब्रह्मास्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. परशुरामांनी त्याला शाप वगैरे काही दिला नाही. युद्ध प्रसंगी कर्णावर युद्ध जिंकण्याचा खूप तणाव होता आणि त्या तणावात तो ब्रह्मास्त्र चालवण्याची विद्या विसरला एवढेच. अर्जुनाने नंतर अनेक दिव्यास्त्रे मिळवली. ती द्रोणाचार्यांनी दिली नव्हती. 

एकलव्याला द्रोणाचार्यांनी शिष्य बनवले नाही कारण ते राजघराण्याशी बांधील होते आणि त्यांचा व्याप खूप होता. एकलव्य हा निषाद समुदायाचा होता आणि त्याचे वडील ह्या समुदायाचे राजा होते. म्हणजे तो निषादराजाचा पुत्र होता. शस्त्रास्त बनवण्यात, शिकार कलेत निपुण होता. कुत्र्याच्या तोंडात अनेक बाण सापडले ते ह्याच शिकारी कलेमुळे. वडिलांच्या मृत्यूनंतर तो स्वतः राजा बनला. युधिष्ठिराच्या पहिल्या राजसूय यज्ञात तो उपस्थित होता. त्याची आणि निषाद समुदायाची जरासंधाशी संधी होती. जरासंध वधानंतर जे जरासंध सेनेचे यादव (कृष्ण) सेनेशी युद्ध झाले त्यात तो मारला गेला.)


सुमनस्व तेजस्वी द्रौपदी, न वदे 'सुतं न वरयामी'

न भेदू शकला स्वयंवरलक्ष्य कर्ण, मत्स्य लोचनी || १७ ||


अर्जुन जिंके स्वयंवर, द्रौपदी पांडव येति कुटीस

संभ्रम फार, कोण वरे द्रौपदीस || १८ ||


करू न शके विवाह बंधू, अविवाहित राजा आणि वडीलबंधू

युधिष्ठिर मांडे प्रस्ताव, द्रौपदी वरे पाचही बंधू || १९ ||


आक्षेप न घेई द्रौपदी प्रस्तावास, कुटुंब राहील एकत्र

एकाच माळेचे मणी बनून, राहू एकत्र || २० ||


नायक महाभारताचा धर्मजाणता, युधिष्ठिर

निर्णय घेई, कठीण संगर || २१ ||


न बरळे, 'आंधळ्याचा पुत्र आंधळा' 

रागावर ताबा, गुण हाच तर निराळा || २२ ||


भट्टनारायण वेणीसंभारं दाखवे दृश्य, बांधी भीम द्रौपदीकेश माखले रक्ताने हाथ

द्रौपदी वदली होती फक्त, नाही केशबांधणी दुश्श्यासन वधापर्यंत || २३ ||


(संदर्भ: भट्टनारायण ह्यांनी लिहिलेल्या वेणीसंभारं नाटकामध्ये असे दृश्य दाखवण्यात आले की भीम दुश्श्यासनाला मारून त्याच्या रक्तरंजित हातांनी द्रौपदीचे केश बांधतो. त्यातून लोकांनी असा अर्थ काढला की द्रौपदीनेच तसा प्रण घेतला होता. तिने फक्त दुश्श्यासन वधापर्यंत केश बांधणार नाही एवढेच म्हंटले होते. बाकी अपभ्रंश. 

द्रौपदी स्वयंवरामध्ये माश्याचा डोळा कर्ण भेदू शकला नाही एवढेच. त्यामुळे मी सुताशी विवाह करणार नाही द्रौपदी म्हणणे अशक्य. शिवाय तो द्रुपदाच्या आमंत्रणावरून तिथे आला होता. त्या स्वयंवरात बिन आमंत्रित जनता ही आली होती आणि त्या जनतेचा भाग म्हणून पाच पांडव ब्राह्मण वेशात आले होते. जेंव्हा प्रण आमंत्रित पूर्ण करू शकले नाहीत तेंव्हा द्रुपदाने उपस्थित जनतेत कोणी असेल जो हा प्रण पूर्ण करू शकेल, समोर यावे असे आवाहन केले आणि मगच ब्राह्मण वेशातील अर्जुन पुढे गेला आणि माश्याचा डोळ्याला बाणाने भेदून स्वयंवर प्रण पूर्ण केला. जाती पाती भेद त्या काळात नव्हता हेही ह्यावरून सिद्ध होते.  

त्या काळातल्या प्रथेनुसार, राजाचा सेनापती किंवा सूत राजाच्या वतीने स्वयंवरात भाग घेऊन, स्वयंवरप्रण  जिंकून राजासाठी पत्नी आणू शकत होते. दुर्योधनाच्या पहिल्या पत्नीला स्वयंवरात जिंकून कर्णच घेऊन आला होता. कर्णाचा मान मोठा होता आणि त्यामुळे त्याला सूतपुत्र म्हणून कोणी हिणवू शकत नव्हते. 

युद्ध जिंकल्यावर पांडवांनी अनेक वर्ष राज्य केले. द्रौपदी, युधिष्ठीर प्रस्थापित राज्याची वित्त मंत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होती. ती खूप धोरणात्मक आणि संपूर्ण विचाराअंती निर्णय घेणारी होती, हे युधिष्ठिराला माहिती होते आणि म्हणूनच त्याने तिला त्या पदी नियुक्त केले होते. युधिष्ठीराने किंवा इतर चार पांडवांनी त्यांच्या बाकीच्या पत्नींना, द्रौपदी सोडता, कुठलीच राज्यपदवी दिल्याचा उल्लेख व्यास लिखित महाभारतात नाही. अशी स्त्री "आंधळ्याचा पुत्र आंधळा" असे म्हणेल असे वाटत नाही. व्यास लिखित महाभारतात तसा उल्लेख नाही. 

युधिष्ठीराने प्रत्येक कठीण प्रसंगी निर्णय घेतला आहे. त्या काळात वडीलबंधू चा विवाह जर झाला नसेल तर धाकटा भाऊ लग्न करू शकत नव्हता. त्यामुळे अर्जुन प्रण जिंकून सुद्धा द्रौपदीशी लग्न करू शकत नव्हता. हा बिकट प्रसंग होता कारण युधिष्ठीर आणि भीम दोघेही अविवाहित होते. त्यावर युधिष्ठीर, द्रौपदी आपल्या सगळ्यांची पत्नी होईल असा प्रस्ताव मांडतो - सर्वेषाम भार्या भविष्यसि. द्रौपदी त्यावर आक्षेप घेत नाही हे महत्वाचं. ह्यावरून युधिष्ठीर हा ठाम मतवादी आणि निर्णय घेणारा होता हे सिद्ध होते - तो पुरोगामी विचारांचा होता. सर्वांचे हित मनात ठेवून विचार करणारा होता. तो खऱ्या अर्थी राजा होता.)

गंधर्व युद्ध होता, पांडव सोडविती दुर्योधना

शकुनी सल्ला दुर्योधना, देऊन देई इंद्रप्रस्थ त्यांना || २४ ||

(संदर्भ: शकुनी हा वाईटच असेच चित्र आपल्याला दाखवण्यात आले. व्यासांनी एका प्रसंगात असे सांगितले आहे की त्याने दुर्योधनाला, पांडवांना इंद्रप्रस्थ देऊन देण्याचा सल्ला दिला होता. इंद्रप्रस्थ हे हस्तिनापुरापेक्षा खूप छोटे होते आणि ते पांडवांना दिल्याने दुर्योधनाची लोकप्रियता वाढेल असे त्याला वाटत होते. शिवाय शकुनीलाही युद्ध नको होते. पण दुर्दैवाने, दुर्योधनाने त्याचा सल्ला मानला नाही.)

दानवीर पदवीने, भारून गेला

धर्मसंकटाच्या वेळी, स्वतःलाच मान दिला || २५ ||


आला इंद्र मागण्या, दिले कवच इंद्रास्त्र बदल्या

दोष न आपुल्या दानवीर पदवी, मैत्री लाविली पणाला || २६ || 


'गांगेय जिविती न योद्धसे', कर्ण वदला

श्रेय माझ्या सामर्थ्याचे, मिळे भीष्मा || २७ ||


जे पाहिजे स्वतःला, कर्ण तेचि वदे दुर्योधना

तेवत ठेवी युद्ध आशा, मनी दुर्योधना || २८ ||


कर्ण जीवनदान देई नकुल सहदेवा, सतराव्या दिवशी युद्धाच्या

घायाळ स्तिथीत अर्धमेल्या, सोडून देई युधिष्ठिरा || २९ ||


न मारता त्यांना, घात मित्रत्वाचा केला

स्वप्रतिज्ञा पाळण्या, विजय बळी चढवला || ३० ||

(संदर्भ: कर्ण हा शूरवीर आणि दानवीर होता हे जितके खरे तितकेच हेही खरे की त्याने "मी आहे नं अर्जुनाचा द्वंद्वी" असे दुर्योधनाच्या मनावर बिंबवून युद्ध जिंकण्याची आशा तेवत ठेवली. खरे पाहिले तर त्याला जे हवे होते तेच तो दुर्योधनाजवळ बोलून कबूल करवून घेत होता. कौरव युद्ध हारण्याचं एकमेव कारण कर्ण होता. त्याने युध्दाच्या सतराव्या दिवशी, युधिष्ठिराला घायाळ करून अर्धमेल्या परिस्थितीत सोडून दिले. शिवाय त्याने नकुल सहदेवाला असेच सोडून दिले. भीमाला तर त्याने तू माझ्याशी युद्ध करण्याच्या लायकीचा नाही असे म्हणून आपला रथ दुसऱ्या दिशेने वळवला. कारण काहीही असो. त्याने आपल्या दानवीर पदवीला धक्का पोहोचू नये म्हणून नेहमीच आपल्या मित्रत्त्वाला आणि कौरव विजयला पणावर लावले. 

'गांगेय जिविती न योद्धसे' असेही तो म्हणाला होता. माझ्या वीरतेचे श्रेय, भीष्माला मिळेल असे त्याला होऊ द्यायचे नव्हते, म्हणून त्याने भीष्म सेनापती असेसपर्यंत युद्ध केले नाही. हा त्याचा स्वतःचा निर्णय होता. भीष्मांनी त्याला तसे म्हंटले नव्हते.)


कृष्णाद्ये दारूक सारथी, नेई अर्जुन द्वारिका

यादव स्त्रीरक्षण, उद्देश मोठा || ३१ || 


कृष्ण गंतव्याची बातमी, रस आटला जगण्याचा

अर्जुन वदे वसुदेवासी, निकट गंतव्य कृष्णे पांडवा || ३२ ||


एक आत्मा, सात शरीरा

जगणे दुश्वार, कृष्णविना || ३३ ||


(संदर्भ: जेंव्हा यादवी माजली, तेंव्हा कृष्णाने त्याच्या दारूक सारथ्याला अर्जुनाला घेऊन येण्याची आज्ञा दिली जेणेंकडून अर्जुन यादव स्त्रियांचे रक्षण करेल. परंतु जेंव्हा अर्जुन तेथे पोहोचला तेंव्हा कृष्ण हयात नव्हता आणि ती बातमी ऐकताच त्याचा जीवनातला रस आटला आणि त्याने त्यावेळी वसुदेवाला (कृष्णाच्या वडिलांना) सांगितले की आता द्रौपदी (कृष्णे) आणि पांडवांचे जाणे निकट आहे. 

हा उल्लेख फार महत्वाचा आहे. अर्जुनाने फक्त द्रौपदीचेच नाव घेतले बाकी पत्नींचे नाही. ह्यावरून पांडवांच्या मनात द्रौपदीचे काय स्थान होते हे दिसते. शिवाय पांडवांची कृष्णाशी असलेली एकरूपताही सिद्ध होते केवळ अर्जुनाचीच नाही. अस्तु.)


अमोल पाटखेडकर

१४-डिसेंबर-२०२२


Friday, 2 December 2022

विषाद

उलाढाल जिंकण्याची, विषादातच झाली

वीरतेचे निर्मूलन, निर्दयी मार्गी


हुंदके बोडख्या कपाळांचे, अहोरात्री

गुंजतात मनी, मुसमुसती


रंगमहाल रचिला, मृतकांचा पाया 

अंगणी सडा, रक्ताने माखलेला


घाव न भरणारे, अंधःकार मनात

सूर्य ही नडे, देण्या प्रकाश


गिरिधरही आता, गेला दूरवर

विरजण न लावी, मलम गीतोपदेश


अमोल पाटखेडकर

०२-डिसेंबर-२०२२


(संदर्भ: महाभारतातील युद्ध सुरु होण्याआधीचा अर्जुनाचा विषाद आणि त्याला क्षमवण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली हे आपल्याला माहित आहेच पण तो विषाद युध्दानंतरही अर्जुनाच्या मनात कसा घर करून कायम राहिला आणि गीतोपदेशाचा मलम सोबत असूनसुध्दा अर्जुन त्यावर विरजण घालू शकला नाही ह्या अर्थी लिहिलेली वरील छोटीशी रचना. )

Saturday, 26 November 2022

अपनों की यादे

ठहरा था चाँद, कुछ देर खिड़की में मेरे

चढ़ाये चाँदी का वरख, मेरी दूध की प्याली में


चांदनी ने खूब सजाई, रंगोली मेरे बिस्तर पे 

उसपर सुकून की नींद, आ गयी मेरे नैनो में 


सपने में हुई, कुछ तरोताजा यादें

झंजोड़ गई, जो ह्रदय को मेरे


वो बड़ा सा आँगन वो निम् का पेड़

लगता था बड़ा होकर 

छू लूंगा टहनियों को युहीं सहज

आज लौटकर आया हूँ

आँगन थोड़ा छोटा और पेड़ अधिक ऊँचा हैं


वो एक दादी थी, घिसट घिसट के चलती थी

उस पर हम हसते थे, बेतुकी बाते करते थे

कुछ दर्द शायद उसको थे, जो समझ में न आते थे

एक दिन चल बसी, अपनी राह निकल पड़ी 

उसकी याद आती हैं, आँखे नम हो जाती हैं


वो एक चाचा थे, बेखबर बेवक़्त घर आते थे

फिर घंटो पापा से बातें करते थे

कुछ चाहिए था उन्हें?

सिर्फ पापा से मिलने आते थे

उनके रिश्ते पुराने थे

मेरे भी वो चहिते थे, अब वो नहीं दीखते; कहीभी नहीं दीखते

दिलमे दर्द सा होता हैं, जब याद उनकी आती हैं


एक और चाचा थे, उनके घर त्योहारों के रेले थे

रौनक थी उनके घरमे, खानेपे बुलाते थे

कुछ पेच ऐसे नसीब के, दो जवान बच्चे गुजर गए उनके

अचानक जिंदगी का रंग भंग हो गया, दुखी दुखी से रहते थे

फिर एक दिन, अनंत में विलीन हो गए

खानेका स्वाद, तबसे फीका हो गया हैं


वो एक चचेरा भाई था, बहनो से राखी बंधवाता था

न भूले चुके, राखी भाईदूज घर आता था

प्यार ही प्यार था उसके मन में, रिश्तों को संभालना समझता था

एक दिन निर्दयी यमदूत, उठाकर उसको ले गया

नामुमकिन था मेरा उसको वापिस लाना

सिमटी हुई यादें लेकर अब था चलना 


फिर वो काला दिन आया, पापा को जिस दिन काल ने उठाया

दर्द बहुत गहरा हुआ, घाव अधिक गहरा हुआ

एक टुकड़ा मेरे अंदर का, पापा के साथ ही चल बसा


एक और दर्दनाक हादसा हुआ, मामा का देहांत हुआ

अपना अपना सा लगता था, बेझीझक हाथ जिसने थामा था 

कराहे दिल से निकली, दर्द की धधक सी निकली

रौंदती है मेरे सीने को, याद उसकी आती है


अमोल पाटखेड़कर

२६-नोवेम्बर-२०२२

Thursday, 24 November 2022

दृष्टिकोन

(संदर्भ: सर्वच जर सापेक्ष आहे तर माझ्या दृष्टिकोनाशी तुम्ही सहमत व्हावेच असा मी दुराग्रह करू शकत नाही, तुमचा दृष्टोकोन वेगळा असू शकतो हे मी मान्य करतो. ) 


सापेक्ष आहे सर्व, सत्य हि पूर्ण सत्य नाही

संक्षेप सारांश अर्थ, असत्य हि पूर्ण असत्य नाही


(संदर्भ: आइनस्टाइन ने 'थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी'  सांगून सर्वच कसे सापेक्ष आहे हे सिद्ध केले आहे. पूर्ण सत्य आणि पूर्ण असत्य हे प्रत्येकाच्या संदर्भानुसार बदलत असतात हाच अर्थ संक्षेप सारांश म्हणजे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. पूर्ण कविता ह्याच मूलभूत भिंगातून, सूत्रातून वाचावी.)


ओझरले नकळत अश्रू कांचनी, होता ओघळ जागृत स्मृती

ओसरले गालावरी, वाटते हळहळ किती


( संदर्भ: अचानक बसल्याबसल्या डोळ्यात पाणी यायला लागतं, काही जुन्या आठवणी जाग्या होतात. आठवणीत आपण जकडल्या जातो परंतु ते क्षण परत कधीच येणार नसतात. उगाच आपण त्यावेळी किती हतबल होतो आणि परिस्थिती बदलण्यासाठी काहीच कसे करू शकलो नाही असेही विचार डोकावतात. ह्या विचारांवर आपला ताबा राहत नाही. भक्तिभावात तल्लीन झाल्यानंतरही डोळ्यात पाणी येतं. ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही अवस्थांमध्ये असे होते ह्या अर्थी. )

 


दुर्मिळ हा योगायोग, केलेस हाथ पुढे योग्यवेळी

तेंव्हाच तुम्हाला धन्यवाद, गेले द्यायचे राहुनी


( संदर्भ: आपण स्वतः मधे एकटे काहीच नाही ह्या अर्थी. जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला कोणी ना कोणी मदत केली असते दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात पण आपण त्या त्या व्यक्तींचे पाहिजे तितके आभार मानत नाही आणि त्या भावनिक अवस्थेत त्यांची आठवण येऊन खूप हळहळ वाटते. आरती प्रभूंनी तर म्हंटले आहे: 


' गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे

माझ्या पास, आता कळ्या आणि थोडी ओली पाने '  


ह्याचा अर्थ 'हाय मी तुझे देणे कधीच फेडू शकत नाही' असाच मी घेतो. ह्याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की 'मी ह्या जन्माचे चीज करू शकलो नाही'. आरती प्रभूंच्या कविता गूढ असतात आणि त्यांचा अर्थ शोधणे म्हणजे समुद्राचा तळ शोधण्या सारखे आहे. महान कवींविषयी पामरांनी न बोललेलेच बरे. )


सृष्टीचे मिटत नाही देणे, ममतेचे घटत नाही येणे

श्वासात श्वास जोवर आहे, संपत नाही माझे घेणे


( संदर्भ: मनुष्य सतत घेतच असतो आणि सृष्टीला तो घाणीपलीकडे काहीच कसे देऊ शकत नाही आणि असे जरी असले तरी सृष्टीचे देणे संपत नाही ह्या अर्थी.)



कवाडे भांडाराची सृष्टीच्या, निर्मोह सदा लयलूट करिती

धुसफूस घेणाऱ्याची वापस देण्या, अपेक्षाच वापसीची देणाऱ्यास नाही


( संदर्भ: सच्च्या देणाऱ्याला, घेणाऱ्याने परत करावे ह्याची अपेक्षा नसते, ह्यालाच निरपेक्ष देणे म्हणतात, ह्या अर्थी)


तुम्ही होता व्यस्त कार्यप्रवाही, मीही द्विधा त्रस्त माझ्यापरी

मार्गदर्शन उत्तम, पायाबांधणी तुम्ही केली


( संदर्भ: मनुष्य जेंव्हा द्विधा मनस्थितीत असतो, ज्या वेळी काय करावे कळत नाही, त्यावेळी जे तुमचा हात धरून तुम्हाला मार्गदर्शन करतात, वाट दाखवतात, तेही स्वतःचा व्याप सांभाळून आणि त्यातूनच तुमची पायाबांधणी होते, अश्यांप्रती कृतन्यता ह्या अर्थी)


चुका केल्या फार, जाणीव होते आत्ता त्याची

कानबजावणी योग्यवेळी, पडद्याआड दरवेळी


(संदर्भ: आपण आधी किती बालिश होतो आणि मोठ्यांनी आपल्या चुका कश्या पद्याआड केल्या मोठ्या मनानी आणि ते आठवून लाजही वाटते ह्या अर्थी.)


नाही केली अपरिपक्वतेची हेटाळणी, परिपक्व तुम्ही होता

मार्ग परिपक्वतेचा, तुम्ही दाखवला


वार्धक्य आले, वर्दळ क्षमली

स्फुरण विचारांचे, लेखणी आतुरली


(संदर्भ: म्हातारपणी मनुष्य कसा आध्यात्मिक होतो ह्या अर्थी खालील सर्व कडवे)


घेऊन साचलेल्या कर्माचा उकिरडा, आला जन्मा घेऊन मतीची मर्यादा

बुध्धीपलीकडील बुध्धीमत्तेला, शोधशील कधी रे वेड्या


बुध्धीची मर्यादा, न मिळू देई जीवा शिवा

फेऱ्यात सर्वदा , कालचक्राच्या वाहिला


भवसागरी भोवऱ्याला, स्मशानज्ञान न रिझवी

भोवऱ्यात अडकला, निसटण्या मार्ग न सापडी


(संदर्भ: बुध्धी मनुष्याला मर्यादित करते. ह्या बुध्धीच्या मर्यादेला लांघून वैश्विक बुध्धीचा पाठपुरावा करणे, हे मनुष्य जन्माचे लक्ष्य असायला पाहिजे, 'टू बिकम वन विथ द युनिव्हर्स'  ह्या अर्थी. जोपर्यंत ही बुद्धीची मर्यादा आहे, तोपर्यंत जन्म मृत्यू चक्र सुरु राहणार ह्याही अर्थी.)


दुर्मिळ दुराग्रही शुचिर्भूत चित्ताचा, पाठलाग कर निग्रही

ह्या जन्मी ना त्या जन्मी, हाती लागते; ठेव निश्चिती


(आत्म शुध्धीसाठी ह्या अवस्थांमधून जावे लागते - जागृती, स्वप्न, सुषुप्ती, चित्त किंवा स्थुर्य. ह्यातही शुचिर्भूत (प्युअर) चित्ताचा जे लवकर प्राप्त होत नाही त्याच्या ध्यास केला पाहिजे. ते कधी ना कधी मिळतेच असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी दाखवला आहे.)


अमोल पाटखेडकर

२४-नोव्हेंबर-२०२२

Wednesday, 23 November 2022

विरोधाभास

चित्त नाही स्थिर, भटके दिशोदिशी फार

परिसाची ओढ, म्हणे मी साधू सात्विक || १ || 


म्हणे मी मुल्ला, जाणतो मी अल्ला

करी फार कल्ला, स्त्रीलंपट तामसिक || २ ||


(संदर्भ: जे लोक स्वतःला गॉडमेन म्हणवून घेतात आणि समाजाला उपदेश करतात, ते स्वतः किती विषयाधीन असतात, ह्यावर कसलेले ताशेरे पहिल्या दोन कडव्यात आहेत. म्हणून अशा कुठल्याही स्वघोषित साधूच्या मागे कधीही लागू नये. संत गजानन महाराजांनंतर, सच्चा संतांचा अकाल पडला हे दुर्दैव.)


युध्दात दाखवून पाठ, पळून गेला

नियुक्त आम्ही ज्याला, सरदार केला होता || ३ || 


(संदर्भ:  ह्या कडव्यात जे ढोंगी आणि दांभिक खोटा आव आणणारे असतात ते खरी वेळ आली की कशे पळून जातात हे दर्शवले आहे.)


मिटेस्तोवर तेवत होती, वात माझ्या ज्योतीतली

स्वाभिमानी म्हणूनच वाटली, पर्वा अस्तित्व्याची नाही केली  || ४ ||


(संदर्भ: कडवे ३ आणि  कडवे ४ मध्ये विरोधाभास आहे. जे लोक ध्येयनिष्ठ असतात ते उच्च उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्वतः ची देखील पर्वा करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ स्वतःची पर्वा न करता जीव देणारे अनेक लोक होते.)


बेकार सुकलेल्या, गवताच्या पातींना

चिमण्यांनी वापरल्या, घरटे बनविण्या || ५ ||


व्यर्थ जंगलेल्या, तुकड्यांनी तारेंच्या 

सहारा घरट्याला, एकाक्षच्या  || ६ ||


निरर्थक त्या, खंडहराला

संसार कबुतरांनी, थाटला || ७ ||


(संदर्भ: कडवे ५, ६, ७ ह्याचा कडवे १, २, ३ शी विरोधाभास दर्शविलेला आहे की प्राणी कुठलाही ढोंगीपणा किंवा आढेवेढे न घेता कसा आपला संसार थाटतात लहान सहान गोष्टींचा वापर करून. मनुष्याला अजून जास्त ची हाव मात्र फार.)


बेकार, व्यर्थ, निरर्थक; वाटे जे आपल्या

वापर सजीव निर्जीवांचा, होत असे कल्पेनेवेगळा || ८ ||


(संदर्भ: सृष्टीमधील काहीच कसे वाया जात नाही ह्या अर्थी.)


आपल्या हिश्श्याची भाकरी, वाटली ज्याने भुकेल्यांना 

अवतारच परी, त्यांना तो वाटला || ९ ||


(संदर्भ: तहानलेल्याला पाणी पाजणे आणि भुकेल्याला अन्न देणे, ह्यापेक्षा श्रेष्ठ दान नाही)


अचानक सुदामा, आला जेंव्हा

सोनेरी दिवस, झाला कृष्णाचा || १० || 


(संदर्भ: जेंव्हा जेंव्हा आपले मित्र, आप्तेष्ट आपल्याला भेटायला येतात, त्याच दिवशी दिवाळी दसरा मानावा कारण ते अमूल्य असतात)


भाग्य पालटले, सुदाम्याचे

परमोच्य आनंद, परमेश्वर भेटल्याचे || ११ ||


(संदर्भ: अतिथी ने देखील तितकाच मान आतीथ्येयाला द्यावा ह्या अर्थी )


खूप श्रीमंत आमिषयांची ,होती तुझी दुनिया

प्रलोभनांचा आम्ही त्या, अस्वीकार केला होता || १२ || 


(संदर्भ: आजकाल श्रीमंती चे मोजमाप ऐहिक मालमत्ता किती आहे ह्यावरून केल्या जातं, परंतु खरी श्रीमंती ह्या प्रलोभनांना लांघून जाण्यात आहे ह्या अर्थी )


अमोल पाटखेडकर

२४-नोव्हेंबर-२०२२

बंड प्रगतीचे

घाबरतात बोलायला इतर, तू तेच लिही

नव्हती कधीच इतकी काळी रात्र, लिही


खोटी स्तुतीवचने होती लिहिली, फेकून दे ती हुकुमी लेखणी

जुटवून हिम्मत सत्यवचनी, होऊ दे ती वाहती लेखणी 


ज्या कारनाम्यांना काळ्या, मिळत नाही वृत्तपत्रात जागा

होऊ दे त्याची उजळणी, लेखणीतून तुझ्या


बरे वाईट होऊन गेले जे, त्याचा कदाचित उल्लेख कुठेतरी

व्हायला पाहिजे पण जे , तू तेच लिही


हाती नाही तुझ्या जन्म, घाणीत उगवतो अंबुज

नाही तरी घाणीचा परिपोस, देऊळी पडतो जाऊन


उगाच जन्मास कोसी, नशिबावर खापर फोडी

प्रयत्नात गती कमी, प्रगतीस खीळ ठोकी


पाश रूढी-प्रथांचे, दे तोडून सर्व

नवीन उद्याच्या कांतीचे, स्वागत करतो निसर्ग


स्वप्नांना उद्याच्या आज, घाल खत पाणी 

टवटवेल बाग मग, प्रयत्नांना बोथट येईल धार भारी


अर्थ:

अंबुज: कमल

परिपोस: लवलेश: किंचितही



अमोल पाटखेडकर

२३-नोव्हेंबर-२०२२


अमोल, 

तुझी 'बंड प्रगतीचे' ही कविता अत्यंत समर्पक, मार्मिक व आपणा सर्वांच्याच मनात अत्यंत उत्कटपणे नेहमी येणारी प्रतिक्रिया आहे. समाजात वावरताना अनेक 'काळ्या' गोष्टी दिसत असतात पण त्यांना वाचा फोडण्याचे धैर्य समाज - मानवात नसते. सगळे बोक्कामुच्चू होऊन जातात. खरे वास्तव वेगळेच असते व दर्शनी रुप वेगळेच भासवले जाते. अनेकानेक घटनांचा आकार एकतर विद्रूप केला जातो किंवा अवास्तव दर्शनीय!! प्रत्येकाने समाजात व व्यक्तीच्याही जीवनात घडणाऱ्या घटनांचा विचार केला तर 'मुखवटे' धारण केलेल्या घटना व व्यक्तीच आढळतात हे अत्यंत 'सत्य' आहे. 


  तुझ्या मनात येणारे विचार अत्यंत परिपक्व असतात. खूप अभ्यासाने तू जाणकार, विचारवंत झाला आहेस. ठाम मतांचा, उदार विचारसरणीचा, जग पाहिलेला साक्षेपी माणूस तू तुझ्या कवितांतून अभिव्यक्त होतोस याचे मला अत्यंत कौतुक आहे. 


  जे मला जमले नाही, ते तू करतो आहेस. अभिव्यक्ती ही नेहमी सच्ची असावी. ती तुझी आहे. सच्चा माणूस त्याला विरोधक खूप असतात. आपण आपला दृष्टिकोन बदलू नये हेच इष्ट!! 


  तुझी 'विरोधाभास' ही कविताही विचारपरिपक्वतेने नटलेली व विचारांची अभिव्यक्ती तर उत्तमच!! वेगळेच विचार, वेगळ्याच धाटणीने लिहून तू तुझे वेगळेपण सिध्द करतो आहेस. अशाच अनेक विचारांचा आस्वाद आम्हाला दे. 


                संगीता पाटखेडकर 

                 २४/११/२०२२

Thursday, 17 November 2022

मृत्यू

तूच माझा सोबती, अनादी अनंत माझा

कंठ तुझ्या येण्याने, आकंठ हा भरला


ऐसे नाही, मी नाही कधीच अनुभवले तुला

वेळ आली वाटले जरी, काळ आला नव्हता


तू पालनकर्ता आज्ञेचा, मी स्वच्छंदी जीवनवेडा

यायचे तेंव्हा येशीलच, प्रकार नाही न्यारा


तू येणार निश्चित, पूर्वकल्पना होती मजला

तरी कानी कपाळी ओरडून, कोलाहल नाही केला


जेंव्हा जेंव्हा आलास तू, होतो मी सज्ज समर्पित तुला

परिपाक माझ्या फलश्रुतीचा, तुझ्यातच अंतर्धान पावला


आभार मानू तुझे किती रे, आपणहूनच तू आला

माझ्या गंतव्याच्या प्रार्थना, आधी आप्तांनी करावयाच्या


धन्यवाद अनेकानेक तुजला, मी क्षीण होण्यापूर्वीच आला

आवभगत करण्याचा, वेळ पुरता दिला


माहित आहे निश्चित मजला, नाशिवंत प्रेत माझे तुजला

शाश्वत कैवल्याचा, तूच एक पुरस्कर्ता


सुसज्य मार्ग तुझ्या येण्याने, नवीन जीवनचक्राचा

एक संपला, नवीन अंकुर उभा दुसरा राहिला


आसक्ती ने माझ्या वळून मागे पाहिले, जवळीक काही आप्त पाणावलेले डोळे होते

वाटले सांगावे त्यांना मी तर इथेच आहे, यमदूताने पण मला ओढतच नेले


राख माझ्या अशाश्वताची, गात्रांनीच पाहिली

माझे अस्तित्व तुझ्यासवे, सुरक्षित प्रवास करी


घाबरलो नाही किंचितही मी तुला, नेतेवेळी तू जिंकला

परंतु दरवेळी हरवून तुला, पुनर्जन मी घेतला


अमोल पाटखेडकर

१७-नोव्हेंबर- २०२२


मराठी साहित्यामध्ये मृत्यूवरील उत्कृष्ट काव्य भा. रा. तांबे ह्यांचं मानलं जातं.

संदर्भ - ' जन पळभर म्हणतील हाय हाय '


भाऊसाहेब पाटणकर ह्यांनी मराठी शायरी प्रकारात मृत्यूवर विनोदी अंदाजाने लिहिले आहे.

संदर्भ - ' कफन माझे दूर करुनि पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला '


गीतेमध्ये तर कृष्णाने मृत्यूला नगण्य मानले आहे. आत्म्याला मरण नाही ह्यावरच भर आहे आणि त्याहीवर जे काही होते ते मीच करतो म्हणून जन्म मृत्यचा भार दोष फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे असे म्हंटले आहे. निमित्त मात्राला मात्र आपणच दोषी आहो असे उगाच वाटत राहते, अशी अर्जुनाची समजूतही काढली आहे.


असे जरी असले तरी, माझ्या मृत्यूनंतर काहीच कसे बदलत नाही ह्यावरच जास्त भर आहे. प्रत्यक्ष्य मृत्युवरती काहीच नाही. 


Due to cyclical nature of the universe, we go through birth, death, and re-birth cycles again and again. Creation, preservation, and destruction is the constant phenomena in the universe. The universe we are part of is the smallest in the entire multiverse. The expanse of multiverse is beyond our imagination and is very complex.


असे जर आहे तर आपण मृत्याला आधी कित्येकदा अनुभवलेले आहे. मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी, त्याच्याही मागच्या जन्मी वगैरे वगैरे.  मग ह्याच वेळी त्याचे इतके नवल काय? तो आला कि मी पूर्णत्वाला जातो, म्हणून तो माझा सखा सोबती आहे - आजचा नाही अनंत काळापासूनचा. त्याचे येणे म्हणजे निसर्ग नियम कायम आहे ह्याचा प्रत्यय येतो. उगवणी नंतर कापणी होणे साहजिकच आहे. ती झाली नाही तर नासाडी होते. ह्या जन्मात जे केले, त्याचे परिमार्जन मृत्यूतच होते आणि परत नवनिर्मितीची सुरवात होते.


* कृष्णाचा एक छान उल्लेख आहे, ज्यातून हे विश्व किती मोठे आहे हे कळते.*


एकदा ब्रह्मा कृष्णाला भेटायला द्वारकेला येतो आणि द्वारपालाच्या सांगतो, जा कृष्णाला सांग ब्रह्मा आला आहे. द्वारपाल कृष्णाला सांगतो. कृष्ण द्वारपालाच्या सांगतो, जा विचार त्याला, कोणता ब्रह्मा आला आहे ते. ब्रह्मा म्हणतो, जा सांग कृष्णाला तो चार तोंडाचा, चार पुत्रांचा पिता ब्रह्मा आला आहे. ब्रह्मा आतमध्ये जातो. कृष्णाला विचारतो, तू असे का विचारलेस, माझ्याशिवाय अजून कोणी ब्रह्मा आहे का? तेंव्हा कृष्ण आपल्या योगसिध्धीने, इतर ब्रह्मांना बोलावतो - शंभर तोंडी, दहा हजार तोंडी, १० लाख तोंडी, १ करोड तोंडी आणि चार तोंडी ब्रह्माला सांगतो कि तू बनवलेले विश्व सर्वात लहान आहे. ह्या बाकीच्यांनी बनवलेली विश्वे कितीतरी मोठी आहेत आणि त्या प्रत्येकाचा एक ब्रह्मा, एक विष्णू, एक महेश आहे. तुला मी तू जितके पाहू शकतो तितकेच ब्रह्मा दाखवले. असे अगणित ब्रह्मा आहेत.


अमोल पाटखेडकर

१८-नोव्हेंबर- २०२२


अमोल


  तुझी 'मृत्यू' ही कविता वाचल्यानंतर 'आयुष्याचा' पूर्ण विचार करणारा आणि अनंत अनुभवांना सामोरा जाणारा आणि निरंतर जीवनाचाच पुरस्कार करणारा एक भावुक व्यक्ती म्हणून तू माझ्यासमोर उभा राहिलास!!


   तू किती हळवा आहेस हे मला माहित आहे. आप्तस्वकीयांचे 'मृत्यू' तू बघितलेस आणि खूप हवालदिल झालास. प्रमोद, तुझे वडील, अरुण, आजोबा, मावशीआजी व तुझ्या मित्रपरिवारातील जवळच्यांच्या मृत्यूने तू हेलकावून गेलास. 


  आजारपणाच्या बातम्या तुला त्या त्या आजाराचे सखोल  संशोधन करण्यास प्रवृत्त करतात व तू पूर्ण सजग होऊन त्याचा अभ्यास करतोस आणि 'शरीर व त्याचा मृत्यू' या गोष्टी तुझ्या अंतर्मनाला व्यापून टाकतात. तू अभ्यासू , विचारी आणि तरीही जीवनाला सामोरा जाणारा आहेस. प्रत्येक व्यक्तीची ही अटळता आहे. 


  'नचिकेता' हा मृत्यूचा शोध घेण्यासाठी यमद्वारी गेला होता. कठोपनिषदातील ती कथा तुला माहित आहे. पण मृत्यूची भीती बाळगून काहीच निष्पन्न होत नाही. ती अपर्यायी व्यवस्था आहे. जीवनाचे ते अटळ रहस्य सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडचे आहे. 

   'आपुले मरण पाहिले म्यां डोळा

    तो सुखसोहळा अनुपम्य' - असे तुकाराम महाराजच म्हणू शकतात. 


  'रोजचे मरण रोज,' माणूस तरीही जगतच असतो. ही शाश्वतता महत्वाची आणि ती तुझ्या कवितेत उत्तमरीतीने अधोरेखित केली आहे. 'गीतेचे तत्वज्ञान' छान शब्दात सांगितले. तुझ्या विचारप्रवणतेचे, अभ्यासांचे व आशयाच्या मांडणीचे कौतुक वाटले. 


  'मृत्यू' या संकल्पनेने ग्रासलेला नाही असा विचारी माणूस नाहीच आहे; तरी त्या विचाराला शब्दबध्द करणे हे अवघड काम तू केले आहेस, - हे तुझे यश!!


   या संदर्भात मला मृदुलाची 'सदासर्वकाळ' ही तिनेही १५ नोव्हेंबर २०२२ ला लिहिलेली कविता समर्पक वाटली. 'काळ' म्हणजे मृत्यू म्हणजे 'यम' असे आपण समजतो, पण हा काळ त्याच्या गतीने चालत राहतो व कुणासाठीही थांबत नाही. गतवर्तभविष्याचा 'उंबरठा' नेहमीच ओलांडणारा तो, 'काळ' तो!! जन्ममृत्यूच्या 'पल्याड तो' - या ओळी मला खूप समर्पक व सुंदर वाटल्या. 


   तुम्हा दोघांच्याही कविता वाचल्यानंतर इतकी विचारप्रवणता तुम्ही अभिव्यक्त करु शकता याचे खूपच कौतुक वाटले. विचारांची काव्यात्म अभिव्यक्ती ही खूप कठीण गोष्ट तुम्ही दोघांनीही साध्य केली आहे. हे मेंदूच्या सशक्ततेचे लक्षण आहे. मेंदूला नेहमीच असे सशक्त, सजग ठेवा म्हणजे तो मेंदूही खूप कार्यप्रवृत्त होतो आणि विस्मरणाच्या विळख्यात सापडत नाही. मेंदूला नेहमीच चालना दिली तर इतरांच्या मेंदूलाही चालना देण्याचे काम होते; हे तुमच्या कवितांवर लिहिण्याची मला बुध्दी झाली, यावरुन समजून येईलच!!


             संगीता पाटखेडकर 

              १८/११/२०२२

Thursday, 3 November 2022

दुखी मन

मरहूम इस दिल में

कोई शमा; जला अब उमंग नहीं सकती

तूने ठुकराया हैं

किसी दूसरीको; जगा अब मिल नहीं सकती


तसव्वुर में

ही अब तुम्हारी जुस्तजू कर सकते हैं

और इसी तराह से इस फ़िराक-ए-मजरूह दिल में

तुम्हे पाबन्द कर सकते हैं


इस फुवाद में 

तुमसे गुफ्तगू करने के सारे रास्ते बंद हैं

और एक हम हैं

जो फिर भी तब्दील की आस लगाए बैठे हैं


इस कदर तासीर हुआ हैं

कहर तुम्हारी मोहब्बत का इस दिल में

ना जी सकते हैं

ना मर सकते हैं


खुश नसीब हैं

वो लोग जिनकी बंदगी रंग लायी

और एक हम बेकार हैं

जिसकी परस्तिश कभी काम ना आयी


खुश नसीब हैं 

वो लोग जिनकी मोहब्बत बुज़ुर्ग हुई

और एक हम बद नसीब हैं 

जिसकी कभी जवां नहीं हुई


हसरत पे हमारी ज़माने को भी रोना आया

काफिला साथ फिर भी हमने खुदको तनहा पाया 

ये मोहब्बत का नशा इस कदर हमें दूर लाया 

की सामने हमने मज़ार पाया 

की सामने हमने मज़ार पाया


अमोल पाटखेडकर

०३-नोव्हेंबर-२०२२ 

आलीस तू

आलीस तू जीवनात बहार बनुनी 

बघुनी तुझ्यात स्वतःला मनोमनी 

हरवतो ग साजणी 


तू आलीस जीवनात अशी 

जणू पावसाची सरी 

पाहतो तुझ्याकडे मी 

वाटते मला तू इंद्रधनू सारखी 


तू आशा माझ्या स्वप्नातली

तूच भावना माझ्या चित्तातली

तूच ओळख मला आठवणीत नेणारी 

तुझेच नाव सदैव ओठावरी 


तू उन्हाळ्यातही 

राहणारी माझ्या सवे बनुनी सावली

तू संकटातही

डगमगू मला न देण्याऱ्या पेपर Weight सारखी


तू मन मोहिनी

तू रास रागिनी

तू अंधारी तिरिक प्रकाशाची

तू हळुवार झुळूक हवेची


तू येशी जेंव्हा जवळी 

विविध भाव अंतरी

उमलती एकाएकी 

तरंगती शरीरातूनी


समजले मला आज हे सर्वतोपरी

तूच आहेस माझी सखी साजणी

चंद्र जर असेल नभीचा मी

तर तूच आहेस माझी चांदणी

तर तूच आहेस माझी चांदणी 


अमोल पाटखेडकर

०३-नोव्हेंबर-२०२२ 

Monday, 31 October 2022

पहिला आनंद

सुर्योदयावेळी पहिले सूर्य किरण. प्रथम तुला वंदना. पहिले गणेश पूजन. शाळेत पहिल्या वर्गात मिळालेला प्रवेश. शाळेचा पहिला दिवस. पहिले दप्तर. पहिली पाटी. नवी कोरी शालेय पुस्तके! दरवर्षीची; इयत्तेनुसार, नवलाईचा सुगंध देणारी नवी पुस्तकें! तीही दरवर्षीचा नव्याने पहिला आनंद देणारी! वाणीतून निघालेला पहिला शब्द 'आई' आणि 'बाबा.' हार होवो की जीत! प्रयत्न तर करुन पाहिला याचा पहिला आनंद! भावांना बांधलेली पहिली राखी! भाऊबीजेची पहिली ओवाळणी! सर्व सणांचा घेतलेला पहिला आनंद! सर्व वाडवडिलांचे मिळालेले पहिले आशिर्वाद. आई वडिलांचे पहिले अपत्य; त्यांना आई वडील होण्याचा आनंद देणारे! आजी आजोबांना पहिली नात किंवा नातू होण्याचा आनंद! पहिलं प्रेम! सजल्या नटल्या सवाष्णीने सासरी प्रथम माप ओलांडून टाकलेले जबाबदारीचे, कर्तव्याचे पहिले पाऊल! पहिला परदेश प्रवास!


जवानांचा शत्रूसैन्यावरील पहिला विजय! पहिले बक्षीस, वक्त्यांनी दिलेले पहिले भाषण, पहिली स्पर्धा, बालपणांतला पहिला खास मित्र, पहिल्यांदाच खेळलेले पारंपरिक खेळ, नोकरीतला पहिला पगार; त्यासाठी महिन्याच्या पहिल्या तारखेची वाट पाहणे! ह्या संकल्पनेवर आधारित किशोर कुमार यांचे सुंदर क्लासिक गाणे आहे; 'खुष है जमाना आज पहली तारीख है'


   कलाकाराने अभिनित केलेली पहिली कलाकृती! चित्रकाराने काढलेले पहिले चित्र! एखाद्या लेखक, कवीने लिहिलेला पहिला लेख, पहिले काव्य, स्वनिर्मितीचा पहिला आनंद देऊन जातात. 


आपण पाहिलेले पहिले निसर्गरम्य स्थळ! सकाळी उठे उठे करावयाची पहिली प्रार्थना; 'कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम्, प्रभाते करदर्शनम्!' नवीन वर्षातला पहिला महिना, पहिली तारीख! एखाद्या मुलीने बनविलेला पहिला पदार्थ!


 स्वहस्ते लावलेल्या रोपट्याचे झाड होऊन त्याला लागलेली पहिली फुले, फळे आपल्याला प्रथमच नवनिर्मितीचा पहिला आनंद देतात. आणि शेवटी...पहिला पाऊस....! माझ्या खालील ओळींप्रमाणेः -


    पहिला थेंब

    पहिल्या धारा

    पहिला वारा

    पहिला गंध

    मातीचा सुगंध

    पहिलं भिजणं

    ओलंचिंब होणं

    पहिलं बरसणं

    न मागता सुख मिळणं

    पावसाचं येणं


   असा हा सर्वार्थाने पहिला आनंद आयुष्य समृध्द करण्याचे पहिले द्वार दाखवितो. 


       मृदुला मुकुंद पाटखेडकर 

         १ नोव्हेंबर २०२२

जीवन सुंदर आहे


 










पहाटेला सतेज आभेचा गाभा आहे

  जीवन सुंदर आहे


 अंतरीच्या गाभाऱ्यात 

 आत्मोन्नतीची संज्योत आहे

  जीवन सुंदर आहे


 निखळ झरझर निर्झरांची

 प्रवाही खळखळ आहे

  जीवन सुंदर आहे


 कळी फुल पाकळ्यांना

 पुन्हा उमलण्याची ओढ आहे

  जीवन सुंदर आहे


 समुद्री तुफानी आव्हानांना

 पुन्हा शांततेचा ध्यास आहे

  जीवन सुंदर आहे


 प्रदेश नि प्रदेश, प्रांत नि प्रांत

 सुपीक बनविण्याचा नदीचा प्रयत्न आहे

   जीवन सुंदर आहे


 सद् वर्तनी कर्मगतीला जिथे जिथे

 प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, तिथे तिथे रसिका!!

  जीवन सुंदर आहे


 हरित पर्णांना हिरवाईचा थाट आहे

 पानगळीलाही पुन्हा बहरण्याची आस आहे

  जीवन सुंदर आहे


  एका वाटेवरुन दुसऱ्या वाटांवर

  निरंतर चालणे हाच प्रवास आहे

   जीवन सुंदर आहे


  अपूर्णतेलाही पूर्णतेचा अनंत प्रेमपाश आहे

   जीवन सुंदर आहे


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     १ नोव्हेंबर २०२२

Sunday, 30 October 2022

चित्र कथा: आजी, नातू आणि तो फुगेवाला












बाबा, गावाकडची जत्रा बघायची आहे मला, आत्तापर्यन्त आजीला पत्रातूनच भेटत आलोय, प्रत्यक्षात तिला बघितलेच नाही अजून!! लहानपणी तिला मी बघितले असेल पण आता आठवत नाही. राजस बाबांना हट्ट करु लागला. राजसचा बाबा तयारही झाला. 


  राजस खूप श्रीमंतीत वाढलेला मुलगा. जन्मापासूनच चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेला!! त्यामुळे राजसच्या बाबांना वेगळीच चिंता वाटू लागली. राजसला आजीच्या गावी करमेल की नाही!! 


  अखेर दिवस उजाडला. बाबा आणि राजस दोघेही विमानाने शहरापर्यन्त निघाले आणि तिथून बसने आजीच्या गावी ते जाणार होते. आजी म्हणजे राजसच्या वडिलांची आई!! 


  खूप तास प्रवास करुन उशिरा रात्री दोघेही आजीच्या गावी पोहचले. राजस तर झोपी गेला होता. सकाळी उठल्यावर त्याला दिसली ती आजी; चुलीवर चहाचं आधण ठेवणारी!! राजस घराकडे बघतच राहिला. आजीचं छोटंसं घर, घरात चूल मांडलेली!! ७० वर्षांची, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली आजी!! 


  राजसचे वडील दोन तीन दिवस राहिले आणि नंतर त्याला आजीकडे सोडून निघून गेले. राजसने गावाकडची जत्रा बघितली. तेथल्या आकाशपाळण्याची त्याने वडिलांसोबत मजा घेतली. जत्रेत त्याची ओळख एका फुगेवाल्या मुलासोबत झाली. 'रवी' त्या मुलाचं नाव. रवी परिस्थितीने खूप गरीब होता, पण मनाने चांगला होता. त्याची आणि राजसची चांगली गट्टी जमली.


 राजसला मात्र आजीच्या घरात करमेना. प्रत्यक्षात तो आजीशी जास्त बोलायचा नाही. तिथे त्याच्या मोबाईलला नेटवर्क मिळायचं नाही, त्यामुळे तो खट्टू व्हायचा!! 


  आजीची गावाकडे शेती होती. तिथली सगळी देखरेख आजी बघायची!! दिवसभर काम करायची आणि रात्री राजसला छान छान गोष्टी सांगायची. दिवस जाऊ लागले. आजीचं गोष्टी सांगणं राजसला आता आवडू लागलं. त्याला हळूहळू आजीचा लळा लागला. एक दिवस आजीकडे रवी आला. त्याच्या हातात खूप सारे फुगे होते. 


  अधूनमधून 'रवी' फुगेवाला आजीकडे यायचा. तिला काही मदत हवी असेल तर करायचा!! परिस्थितीमुळे रवी शिकू शकला नव्हता. एक दिवस आजी खूप आजारी पडली. तिचा ताप काही केल्या उतरेना. राजस घराबाहेर आला. काही अंतर चालल्यावर त्याला रवी दिसला. आजीचे घर गावाबाहेर. मदतीला एकदम कुणी येणे शक्य नव्हते. त्याने धापा टाकतच रवीला सगळी हकीकत सांगितली. रवीने राजसला आजीजवळच थांबायला सांगितले आणि काही वेळाने तो डॉक्टरला घरी घेऊन आला. आजीला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. तिला आरामाची गरज आहे, असे डॉक्टरने सांगितले. रवी आणि राजसने आजीची चांगली सेवा केली. आता आजी बरी झाली होती.


 काही दिवसांनी राजसचे बाबा त्याला न्यायला आले. आता मात्र राजसला, रवी आणि आजीला सोडून जावेसे वाटेना, पण आजीने त्याला समजावले. राजसने मधल्या दिवसांमधली सगळी गोष्ट बाबांना सांगितली. रवीच्या बाबतीत मात्र त्याने आता एक निर्णय घेतला होता. आजीही उत्सुकतेने ऐकत होती. रवीचे शिक्षण आपण करु असे तो बाबांना म्हणाला. बाबा आणि आजीला राजसचे कौतुक वाटले आणि रवीलाही आनंद झाला. ही निरोपाची वेळ आनंदाची होती. 


       मृदुला मुकुंद पाटखेडकर 

          ३१/१०/२०२२

Saturday, 29 October 2022

नाकामियाबी

दर्द की रेशाये सिमट जाये, तरकीब कोई ऐसी नहीं होती

चमक उठे किस्मत, साजिश कोई ऐसी नहीं होती


नवजवान पढ़ालिखा, हाथ लगी बेरोजगारी

संवेदना; वेदना, उम्रभर नसीहते साथ रही


मंदिरों की सीढिया घिसाई, नंगे पैर चलके

ग्रहों के स्थान मगर नहीं सुधरे , कुंडली में मेरे


कुछ कर गुजरने की चाह मे, कुछ सिक्के हाथ लगे

मरने तो नहीं दिया मगर, ख्वाहिशों के ढेर लगे


कभी रखे कदम फूँक फूँक कर, पैर फिर भी छील गए

मन्नते बोहोत मांगी मगर, असर उसके नाकाम हुए


कामयाबी, नाकामयाबी एक ही सिक्के के दो पहलु हैं

नामाकूल, नाकामियाब होना; बेगैरियत तो नहीं है


कभी नाकमियाबी को सहारा देकर, कामियाबी की तरफ ढ़केलकर देखो

जहाँ में जन्नत का एहसास, यही तो हैं


अमोल पाटखेड़कर

२९-अक्टूबर-२०२२

Friday, 28 October 2022

शोध

 शोध सा-या जाणिवांचा अजूनही संपला नाही

 तळ देखावे इथे तिथे अंतरी मनांमनांतले

 आरसा अजून सगळीकडे खोल पोहचला नाही


 वयागणिक सा-या भावना, अवस्था

 क्षणाक्षणांनी काबीज केलेल्या.....

 जाणिवांना समृध्दीचा मार्ग अजून दिसला नाही


  अपूर्णतेला पूर्णतेचा ध्यास जरी नेटका

 पावलागणिक अधुरेपणाचा मार्ग मोकळा झाला नाही


  जीवजीवाची तगमग तगमग नेहमीच ध्येयवेडाकडे

  यशापयशी हिंदोळ्यांना क्षितिज अजून भेटला नाही


  उणेपुरे नेहमीच; बाकीच बाकी सगळीकडे

  शोध नेहमी इथे तिथे; मनांचा ठाव घेतलाच नाही


  बाकी तर बाकी, अधुरे तर अधुरे, अपूर्ण तर अपूर्ण

  शोध चालूच राहील रे, मीही अजून थकले नाही


   शोध सा-या जाणिवांचा अजूनही संपला नाही


       मृदुला मुकुंद पाटखेडकर 

        २९/१०/२०२२

Wednesday, 26 October 2022

उद्या पहाटे

 नवा गडी नवं राज्य थाटा

  उद्या पहाटे दुसऱ्या वाटा

 

  आज समुद्री फेसाळ लाटा

  उद्या पहाटे दुसऱ्या वाटा


  गत क्षणांच्या भावुक छटा

  उद्या पहाटे दुसऱ्या वाटा


  नवतेजे दिनकर नभीं

  पुन्हा त्याच सायंवाटा

  उद्या पहाटे दुसऱ्या वाटा


  आला क्षण गेला क्षण 'सुख' वाटा

   उद्या पहाटे दुसऱ्या वाटा


   तुझ्या नि माझ्या आयुष्याच्या

   रंगीबेरंगी जीवनछटा

  उद्या पहाटे दुसऱ्या वाटा


   वाटा वाटा वाटा वाटा

   मिळून चालू सा-या वाटा

   आभाळागत 'प्रेम' देऊ घेऊ

   आयुष्यमार्ग पडेल मग थिटा

   उद्या पहाटे दुसऱ्या वाटा


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

       २७/१०/२०२२

Sunday, 23 October 2022

पणती

 


एक पणती आरोग्याची

  एक पणती सौख्याची

  एक पणती आनंदाची

  एक पणती संपन्नतेची

  एक पणती प्रसन्नतेची

   एक पणती उमेद उत्साहाची

  एक पणती ज्ञानाची

  एक पणती समाधानाची

  एक पणती देशप्रेमाची

  एक पणती न बाह्य देखाव्याची

 एक पणती आंतरिक प्रकाश उजळण्याची

  एक पणती वर्तमानाची

एक पणती तुझ्या नि माझ्या आजच्या जगाची

 एक पणती अंतर्मनांतला नरक जाळण्याची

  एक पणती निर्मळ निर्मळ स्वच्छ भावनांची

 एक पणती एकेक पणती नि पणती अशी दिवाळी


        मृदुला मुकुंद पाटखेडकर 

           २४/१०/२०२२


दिवाळी




 डोळ्यांत भरावी अशी दिवाळी

 आकाशदिव्यांची नव नव्हाळी

 अवसेला आशा निराशेला जाळी

 अंगणी सजली ठिपक्यांची रांगोळी

  पणती पणती अंधार उजळी

 कपाळी कपाळी औक्षणाची झळाळी

 घरोघरी गांवशहरी किल्ल्यांची मृदगंधाळी

 चकली लाडू करंजी अनरसे चिवडा कडबोळी

 दिवाळी दिवाळी फराळी फराळी

 बालगोपाळांची मजामस्ती खेळी

 दिवाळी दिवाळी आनंद कुळी कुळी

 दिवाळी दिवाळी फटाक्यांची सुतळी

 दिवाळी दिवाळी आनंदाची दिवाळी


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    २४/१०/२०२२



Thursday, 29 September 2022

पर्णकुशी



 








पर्णकुशीत फुलांची 

     सुरेख रंगावली

     कुठे ऊन कोवळे दिसे

     कुठे दिसे कोमल सावली

     ऊन सावली जणू तयांच्या

      स्वागतासि सज्ज झाली 


      मृदुला मुकुंद पाटखेडकर

        ३० सप्टेंबर २०२२

Wednesday, 28 September 2022

लघुकथा: पाऊस

यंदा पाऊस चांगला होणार असं दिसतंय. असं जर झालं ना तर डोक्यावरचं सारं कर्ज फिटल आणि गाठीशी चार दोन पैकं बी जमा व्हतील मग माझ्या लेकीला, लतीला कुठला तो कोर्रीस बरं..? हां आठीवलं ड्रेस डिझाईन का काय तो करायला नक्की पुण्याला पाठवीन. पोरीच्या हातात कला हाये त्याचा उपीयोग तिला झाला पाहिजे. कोवळ्या वयात लगीन लावलं अन् वरिसभर बी संसार सूख मिळालं न्हाई बिचारीला, नवरा गेल्या पासून पार सुकून गेलं लेकरु माझं. परमिस्वरा माझ्याकडं न्हाय तर न्हाय पण या लेकरा कडं बघून तरी पाऊस पाड बाबा , हात जोडतो साकडं घालीतो.


एवढं बोलून रामा बसल्या बसल्या अचानक ढसढसा रडू लागला. आभाळ परत गच्च दाटून आलं.


 लेखकाने लिहून दिलेली वरील वाक्ये; नव्यानेच अभिनय क्षेत्रात उतरलेल्या अभिनेता 'संगम' याने जशीच्या तशी म्हंटली खरी, पण दिग्दर्शकाचे काही केल्या समाधान होईना. 'शेतकरी रामा तुझ्यात भिनव', त्याची भावना आणि मनःस्थिती तुझ्या मनाला जाणवू दे, म्हणजे आपोआपच तुझ्या अभिनयातल्या हावभावातही ती आर्त बापाची सदिच्छा तुला जाणवेल', दिग्दर्शक संगमला जीव तोडून सांगत होता. अनेक रिटेक घेऊनही दिग्दर्शक थोडा वेळ थांबला. संगमलाही चांगले वाटत नव्हते. तो पुन्हा पुन्हा हावभावांसहित सराव करु लागला. 

 

  आता त्या गावात पूर्वीचा तो कर्जबाजारी शेतकरी 'रामा' राहत नव्हता. गावक-यांना मात्र पुढे काय झालं रामाचं आणि त्याच्या लतीचं ठाऊक होतं. सर्वांना लतीचं कौतुक वाटत होतं आणि रामाच्या जिद्दीचंही!! निर्माता, लेखक, दिग्दर्शक ह्यांना ती प्रेरणादायी गोष्ट खूपच आवडली होती आणि म्हणूनच त्यांनी ह्या विषयावर चित्रपट काढायचं ठरविलं होतं. 'रामा' आता पुण्यात असतो लतीकडे!! तिने ड्रेस डिझाईनिंगचा कोर्स मोठ्या प्रयत्नांती पूर्ण केला असतो आणि तिला मोठ्या मनाने स्वीकारणारा जोडीदारही मिळाला असतो. संपूर्ण चित्रपटाच्या टीमने रामाला आणि लतीला भेटायचं ठरविलं. त्यावर एक दोन दिवस गेले. संगम मात्र त्याच संवादांच्या सरावात गुंतला होता; आणि अचानक तिथे काही लोकांबरोबर रामा आणि लति आले. सर्वांना नवल वाटले. रामा आणि लतिलाही तिथे काय चालू आहे कळेना. शेवटी शूटिंग बघायला आलेल्या गावक-यांनी सगळी हकिकत त्या दोघांना सांगितली. दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघू लागले. 


रामा म्हणाला, "त्यायेळेला आभाळानं आन् आभाळागत माया करणा-या ईस्वरानं माह्यी हाक ऐकली, लई मस्त पाऊस झाला त्या वक्ताला, मला बरकत आली आणि म्यां बोललेलं अन् पाह्यलेलं सपान माह्या लेकीनं पुरं केलं. आता आम्ही समदे सुखात हाओत, पन दरवर्षी मी अशा आभाळ भरुन यायच्या दिसात हिथं येतो आणि त्यायेळेची आठवण काढतो. माझं गाव, ह्यो शिवार, हिथली माती मला प्यारी हाय, हिथल्या जिमिनीला मी वंदन कराया येतो. शेवटी या मातीनंच तर मला सोनं दिलं."


  रामाचं बोलून झालं होतं आभाळ आताही गच्च दाटून आलं होतं. ह्यावेळी ते फक्त रामाच्या डोळ्यांत नाही तर सर्वांच्या डोळ्यांत दाटून आलं होतं. रामाला प्रत्यक्षात बघून त्याची भूमिका वठविणा-या संगमला अचानक उत्साह आला आणि त्या उत्साहाच्या भरातच त्याचा शॉटही ओके झाला. आता सगळीकडे आनंदाचा पाऊस पडत होता. 


           मृदुला मुकुंद पाटखेडकर

              २१/९/२०२२

Friday, 23 September 2022

ध्येयवेड

 










जमिनीवर चालता चालता नजर वरती चढे

 खुणावतंय आकाश जा पुढे पुढे

 निरभ्र निळाईवर आशेची कमान चढे

ध्येयवेड्या ध्यासाचे गतिमान पाऊल पुढे


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   २४/९/२०२२

Monday, 19 September 2022

भान











वाटेवरती ह्या फिरावे

वेळेचे भान अलगद विसरावे

कधी निरभ्र चमकदार ऊन 

तर कधी पावसाला बघावे

हिरवाईत ह्या मनही हिरवे व्हावे


 मृदुला मुकुंद पाटखेडकर 

  २०/९/२०२२

Sunday, 18 September 2022

लघुकथा: ओळख

राजाला पूर्वजन्मातलं सगळं आठवण्याचं वरदान परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलं होतं. पूर्वजन्मात तो मुंबई शहरातला एक अत्याचारी माणूस होता, देशद्रोही होता.

 तो परलोकी परतला. तिथे दुरुनच त्याला स्वर्ग दिसायचा. इथे तर किती सज्जन लोक राहतात असे मनोमन तो म्हणायचा आणि अस्वस्थ व्हायचा. नरकयातना भोगत असतांनाही एक दिवस तो विष्णुद्वारी आला आणि याचना करु लागला, मला पुढील जन्मात माझी 'माणूस' म्हणून चांगली ओळख बनवायची आहे. दानशूर व्हायचं आहे. देव 'तथास्तु' म्हणाला आणि पुढील जन्मीं तो 'मिलनसार' नगरीचा राजा बनला. अनेक प्रकारचे दानधर्म त्याने केले. मागील जन्मींचा महाविद्यालयीन कवी या जन्मात त्याच्या नगरीचा राजकवी होता. त्याचीच कविता राजा गुणगुणू लागला आणि पुढील मनातील संवाद पुन्हा आळवू लागला...


माझीच हाक मजला 

येते कधी कधी

गर्दीत शोध माझा 

घेते कधी कधी


महाविद्यालयातील स्नेह संमेलनात एकाने ही कविता प्रस्तूत केली होती, त्यावेळी किती हसलो होतो आपण त्याला! आज जेंव्हा आपण सुद्धा या गर्दीचाच एक भाग होऊन चालत आहोत त्यावेळी वाटतं आपणच आपल्याला शोधतोय कुठेतरी. 


आपलं अस्तित्व म्हणजे फक्त मुंबईतल्या गर्दीतला 'गर्दी' वाढवणारा एक चेहरा! एवढीच ओळख उरली आहे आपली? नाही म्हणता आपल्याला ओळखणारं एक कुटुंब या महानगरात आहे. ज्याच्या आजुबाजूचे  दोन चार चेहरे नाही म्हणता ओळखतही असतील आपल्याला.  पण जी ओळख निर्माण करण्यासाठी आपण जीवाचं रान करून, सगळ्यांना भांडून इथवर आलो होतो ती ओळख कुठे हरवली? 


          मृदुला मुकुंद पाटखेडकर 

            १९/९/२०२२

Wednesday, 14 September 2022

सूर्य





 


तू एक झलक उजेडाची देऊन जा

अंधारवाटेतल्या 'मी' ला उजळून जा

काहूर इथे तिथे कातर कातर वेळेचे

तू उद्याच्या उगवतीचे 'स्वप्नं' बघून जा


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   १५/९/२०२२

Monday, 12 September 2022

अंगारक संकष्ट चतुर्थी

 

मंदिरी दरवळला धूप

 दुर्वांकुरेति शांती स्वरुप

 मोदभरे मंगल ओंकार रुप

 आत्मानंद अनुभूती दर्शनें खूप


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   १३ सप्टेंबर २०२२ 


खयाल


 खयालों में खयाल किसका

  नजर में अंदाज किसका

  दिल में चेहरा किसका

  हल्की सी मुस्कान में 

   नूर सा हुनर किसका

   हसीन पलों में 

  बेजुबानी साथ किसका


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     १३/९/२०२२

Saturday, 10 September 2022

आठवणीं

 पल्याडच्या आठवणीं 

  अल्याड उभ्या राहतात

  क्षण वेग वावर

  आवेग भरुन घेतात


  स्नेह आठवितो भूतकाळीचा

  निसटतो नजरेतून वर्तमान

  भूत आवर्त वर्तमानातले

   दूर दूर धुसर भविष्यमान


   सारे सारे मर्मबंधी

  नजरेसमोर दृश्य ठेविती

  गत क्षणांचे नरम तरल

  भावस्पर्श उमटविती


  रमता रमता रमवितो

  रम्य अलगद भूतकाळ

  अनावर आतुर ओढीस त्या

  कातर भेटतो संधिकाळ


  गुपित सारे गुजगोष्टींचे 

  बोलक्या करतो भावना

  सहज खाणाखुणा मन करते

  भूतकाळी दिशांना


  गेला गेला तरीही

  भूतकाळ असतोच आपल्यासोबत

  कडूगोड भल्याबु-यांना

  रम्यतेचे बिरुद लावत


  क्षण गेला म्हणजे जणू तो रम्य झाला

  भविष्य वर्तमानाच्या अहंकाराचा बिमोड झाला

  काळच काळाला काळाचे रुप दाखवी

 अस्तित्वाची लढाई जणू न हारता जिंकून घेई


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

       ११ सप्टेंबर २०२२

Tuesday, 6 September 2022

श्रीगणेशा



 अंतरीचा गाभा

  भक्तिरस प्रभा

  याचि देही

  याचि डोळा

 मनमंदिरी श्रीगणेशा


 आत्मोन्नतीची मनिषा

 नयनसुखे दर्शन आशा

 उजळी काजळी दिशा

 हृदयमंदिरी श्रीगणेशा


भक्तीला आकळे भावभाषा

 जाणिविनेणिवी मंगल ठसा

 तनमनांसी पूरक श्वास जसा

 आत्ममंदिरी वसा श्रीगणेशा 


 मनाचिये गुंती गुंता होई

  इकडे तिकडे ठाव घेई

 शोधन स्पंदनांची जागृत होई सुप्त ईच्छा

  देवाधिदेवा श्रीगणेशा


  रुप गोजिरे साजिरे

  मूर्ती तव महन्मंगल

 जास्वंद दुर्वा फुलपत्री सुमनहार सकल

 आरती गर्जवी दिशा दिशा, देवा श्रीगणेशा


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

       ७/९/२०२२

Thursday, 1 September 2022

श्री गणेशोत्सव सूर्यषष्ठी


 










नित्यनेमां ताम्रप्राची सूर्य आवर्तनं 

अरुणोदयीं नित्यनवी पहाट संपन्न

नभतेजासह सतेज होई सृष्टी प्रसन्न

आयुष्यकर्मी जीव जीवांचे उजळो जीवन

आशिष द्या हो नारायण, आशिष द्या हो नारायण


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     २ सप्टेंबर २०२२

  फोटोः माझ्या मोबाईल कैमेरातून...

Wednesday, 31 August 2022

ऋषीपंचमी











महाराजाधिराज योगीराज सत् चित् आनंद श्री गजानन स्वामीं

चिरंतन निरंतर संजीवन प्रेरणा श्री गजानन नामीं

अध्याय एकेक जीवनींचा जणू अर्थबोधाची कहाणीं

पारायणें घडावे स्मरण आज अवघ्या ऋषीपंचमीं दिनीं


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     १ सप्टेंबर २०२२

    श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिवस

     ऋषीपंचमी. जय गजानन श्री गजानन

Tuesday, 30 August 2022

श्री गणेश चतुर्थी











मनाचा निरागस निर्मळ गाभारा 

   तुझ्यासाठी

  

 अस्तित्वाचा रोज नवा श्रीगणेशा

   तुझ्यासाठी


 मंगलाचरण मंगलपूजन मंगलारती

 भावभक्तिचे गंधमादन

  तुझ्यासाठी


 श्रीगणेशाचे मनन चिंतन

 मन्मनींचा सचेतन स्पर्श आनंदघन

 उषःकाली सोनेरी मनवाट

  तुझ्यासाठी 


  शेंदूर लाल बुक्का गुलाल

  सात्विकतेचा गंध खुशाल

  रांगत येई ठाव घेई

  मन ओढाळ वाट तुझी

  माझ्यासाठी 


  तुझ्यासाठी माझ्यासाठी

  तुझ्यासाठी माझ्यासाठी

  बाप्पा माझा सर्वांसाठी

  बाप्पा माझा सर्वांसाठी


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   ३१/८/२०२२

  श्री गणेश चतुर्थी

Wednesday, 24 August 2022

गुरुपुष्यामृत सिध्दीयोग












गण गण गणांत बोते मंत्र जप करु

 गुरुपुष्यामृत योगसिध्दीचा लाभ घेऊ

  गुरुज्ञान भक्तिशक्तीला जीवनीं विस्तारु

 दुर्धर भवसागर पार करण्याचे बळ येथूनी घेऊ


     मृदुला मुकुंद पाटखेडकर

      २५/८/२०२२

   शुभ गुरुवार. गुरुपुष्यामृत सिध्दीयोग.

Tuesday, 23 August 2022

तुझी नि माझी जोडी


 











तुझी नि माझी जोडी नंबर एक अशी असावी

उडत्या झेपेला निवांत विसाव्याची ऊब असावी

संध्यासमयी दोघांनाही घराच्या ओढीने साद द्यावी

चांदणस्पर्शाआधी कातरवेळेलाही सोबत तुझी मिळावी


       मृदुला मुकुंद पाटखेडकर 

          २४/८/२०२२

Sunday, 21 August 2022

श्रावण


 










सरी श्रावण

सर श्रावण

नदी श्रावण

झरा श्रावण

धुके श्रावण

ऊन पाऊस खेळ श्रावण

सखा श्रावण

शिवमय श्रावण

अंतर्नादी श्रावण

तन श्रावण

मन श्रावण


 मृदुला मुकुंद पाटखेडकर 

  २२/८/२०२२

पाकळी











हरित पर्णी शुभ्रा मोहरत

पाकळी पाकळी 'अनंत' फुलत

स्वमग्नभाव प्रसन्न चित्त

क्षणभंगूर आयुष्यी आनंदे हासत


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    २२/८/२०२२

Saturday, 20 August 2022

हाडाचा शिक्षक: मोहरीर मास्तर

गोखले ,कागभट ,लूले ,मुरकुटे यांनी सुरु केलेल्या शाळेत  बाबा जवळपास सुरवातिपासूनच शिक्षक  होते.

खरेतर तो " छड़ी लागे छम छम " चा जमाना होता .

पण बाबांनी कधी छड़ी हातात घेतली नाही.

कधी विद्यार्थ्यांना मारल नाही. 

स्पर्श देखील केला नाही .

सोवळ्याच्या कल्पनेत ते बसत नव्हते त्यांच्या .

साधे रागवले नाहीत की ओरडले नाहीत.


घोक्या पिढ्या taadhya वर विश्वास नसलेला शिक्षक. 

जीवाच्या आकांताने शिकवणारा मास्तर.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी धडपडणारा गुरु. 


दिवसभर बोलून बोलून घशातून रक्त येत असे. पण कधी फारशी पर्वा केली  नाही त्यांनी. 


कधी गाइड किंवा की वापरण्याचा सल्ला दिला नाही.

कधी शिकवण्या केल्या नाही. 


बाबा जन्मभर शिकवतच राहिले.

शाळा आणि विद्यार्थी अजूनही त्यांची आठवण काढतात.

आवर्जून कृतद्न्यतेने.        


मीही

विश्राम  मोहरीर

Thursday, 18 August 2022

मंजिल












पल पल बीत रहा मंजिल की ओर

न जानें किस पार उसे जाना़ है

आरंभ से युगों के अंत तक या फिर उससे भी आगे़

सोच ले समझ ले जाऩ ले राही

जी़ ले जी़ ले अपनीं जिंदगी


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

       १९/८/२०२२

Wednesday, 17 August 2022

सावळा श्रीहरी

 











सावळे रुप सावळा श्रीहरी

सप्तस्वरांची घुमें बासरी

भक्तीभाव मन्मनीं ठाव अंतरी

कर्म धर्म संयोगाची दुनिया तव न्यारी


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   १८/८/२०२२

   श्रीकृष्ण जन्माष्टमी.

गजानन कीर्ती

 











सत् चित् आनंद घन प्रसन्न श्री मूर्ती 

 जीवन अवघे सत्यम् शिवाची प्रचिती

मंत्रघोष जयघोष त्रिकाळ नाम स्फूर्ती 

श्री गजानन भक्तीधारा त्रिखंडी गर्जे कीर्ती


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     १८/८/२०२२

Sunday, 14 August 2022

मेरा देश

 कहीं भी जाऊँ इस जहान

  दिल से दिल तक हिन्दुस्तान


  मेरा देश दिलेरी की दास्तान

   तू ही फ़क्र तू ही जान


  वक्त कितना भी ले कडा़ इम्प्तिहान 

 जिगरवाला वीर तेरा हर सिपाही महान


  प्राचीनता श्रेष्ठ, भूषण ज्ञान विज्ञान 

   संस्कृती का अभिमान

  अनेकता में एकता का सम्मान


  सरलता ही पुंजी इसकी, हरे भरे खे़त ख़लिहान

 नारा अमर रहे 'लाल' का 'जय जवा़न जय किसा़न'


 सफलता की हरियाली,  नई ऊर्जा की किरण 

 नई उम्मीद से झूमे हर नए संकल्प की उडा़न


तीन रंगों की गुब्बारों से चमकेगा ये नीला आसमान

 गण गण में गुँज उठे जनगणमन राष्ट्रगान

प्रगती के विजय पथ पर दमकती रहे इसकी शान


  कहीं भी जाऊँ इस जहान

  दिल से दिल तक हिन्दुस्तान


     मृदुला मुकुंद पाटखेडकर

Saturday, 13 August 2022

सबकुछ चाहिए मुझे


 










सबकुछ चाहिए मुझे

धूप भी छांव भी

बादल भी बरसात भी

समंदर की तैरती लहरें भी

सुरज का उजाला भी

मन के आसमान में 

उंची उडान भरनेवाला पंछी भी

सबकुछ चाहिए मुझे


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    १४/८/२०२२

Sunday, 7 August 2022

मैत्र

"Through miles may lie between us

we are never far apart, for friendship doesn't count miles

its measured by the heart." 


   आज अॉगस्ट महिन्यातील पहिला रविवार. सगळीकडे 'Friendship Day' म्हणून साजरा केला जातो. मैत्रीणी कितीही दूर गेल्या असल्या तरी मनाच्या तळाशी त्यांचे विशिष्ट स्थान असते, ज्याला मरण नाही. आज मलाही माझ्या शाळा, कॉलेजातील मैत्रिणींची तीव्र आठवण येत आहे. खरी मैत्री ही जात, पात, वंशभेद, वर्णभेद, गरीब, श्रीमंत या सीमारेषांच्या पलीकडे असते आणि ती तशीच असावयास हवी. मित्र-मैत्रिणींचा एकमेकांविषयीचा जिव्हाळा अनोखा असतो. 

   प्राथमिक शाळेत असतांना माझी 'ज्योती कोहर' नावाची मैत्रीण होती. आम्ही रोज एकत्र शाळेत जात असू. मला अनेक मैत्रीणी होत्या. माध्यमिक शाळेत असतांना 'ज्योती चांदेकर' नावाची मैत्रीण होती. ती व मी; रस्त्यात कविता(पाठ्यपुस्तकातल्या) म्हणत-म्हणत शाळेत जात असू. मधल्या सुट्टीत विविध खेळ खेळत असू. ५ वी ते ७ वी चे माझे शिक्षण अकोल्यातील 'महाराष्ट्र कन्या शाळा' येथे झाले. ८ वी ते १० वी पर्यन्तचे शिक्षण 'Government Girls High School' मधे झाले. आता त्या शाळेचे नाव बदलून 'सावित्रीबाई फुले कन्या शाळा' असे ठेवले आहे. या शाळेत तर माझ्या मैत्रीणी म्हणजे - मराठी, पंजाबी, गुजराती, तेलुगु आणि मुस्लीम देखील होत्या. जणू श्रावणात दिसणाऱ्या इंद्रधनुषी रंगांसारख्याच! 

    आरती कुळकर्णी, कविता गढिया, जिग्ना चौधरी, स्वप्नाली पाटील, राजश्री सिंह, आणि चाहत खान. मीनाक्षी नावाची तेलुगु मैत्रीणही होती. आमची शाळा स्कूल Captain या पदासाठी मतदान ठेवीत असे. मुख्याध्यापकांच्या महत्त्वाच्या सूचना सर्व वर्गांपर्यन्त पोहोचविणे व विद्यार्थ्यांना वाचून दाखविणे, शाळेतल्या विविध उपक्रमांविषयी माहिती देणे, 'जन गण मन' हे राष्ट्रगीत व 'भारत माझा देश आहे,' ही प्रतिज्ञा खड्या आवाजात माईक समोर म्हणणे, शाळेच्या स्नेहसंमेलनाची आखणी करण्यात सर्व टीचर्सना मदत करणे, इ. इ. ........ अनेक कामे शाळेच्या classes व्यतिरिक्त School Captain ला करावी लागत. आमच्या शाळेने 'चाहत खान' ची School Captain म्हणून बिनविरोध निवड केली. 'चाहत' माझी खास मैत्रिण! दाट - कुरळ्या केसांची, अत्यंत गोरीपान, आरस्पानी सौंदर्याची खाणच जणू! उप-कप्तान होती - प्रतिक्षा तंवर. 

  मी व चाहत एकमेकींच्या हातात हात घालूनच शाळेत फिरत असू. आम्हा दोघींनाही शाळेची वेळ केंव्हा होते व दिवसभराच्या गप्पा केव्हा करायला मिळतात; याची आतुरतेने वाट असे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही एकमेकींजवळ share करीत असू. दहावीतल्या मुलींना, नववीतल्या मुलींकडून send off द्यायची पध्दत शाळेत असते. आम्ही नववीच्या मुलींनी छान send off चा कार्यक्रम आखला होता. 'चाहत' कर्णधार असल्यामुळे तिनेच सर्व ठरविले होते. तिच्या अम्मीने केलेला 'शिरखुर्मा' तिने सर्व विद्यार्थ्यांसाठी आणला होता. विविध प्रकारचा सुका मेवा घालून केलेला 'शिरखुर्मा' सर्वांना खूप आवडला आणि 'चाहत' मुळे दहावीतल्या मुलींना छान send off मिळाला. मुख्याध्यापक 'करंदीकर' सर व इतर टीचर्सनी आम्हा सर्वांचे खूप कौतुक केले. 

 ' चाहत' ने शाळेत हट्टाने संस्कृत विषय घेतला होता. अमराठी विद्यार्थ्यांना हिंदी विषय घेण्याची मुभा होती तरीही!  'चाहत' ला अनेक संस्कृत श्लोक अर्थांसहित पाठ होते. शाळेत होणाऱ्या गणेशोत्सवात तिचा उत्साही सहभाग असावयाचा. रांगोळ्याही छान काढत होती. अस्खलित मराठी बोलत होती. 

   मी नवव्या वर्गात असतांना शाळेने 'गांधी जयंती' निमित्त 'स्वच्छता स्पर्धा' आयोजित केली होती. जो वर्ग स्वच्छता आणि सजावटीच्या बाबतीत परिपूर्ण असेल; त्या वर्गाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळणार होते. आम्ही सर्वजणी चाहतसहित जोमाने तयारीस लागलो. आपलाच पहिला नंबर यावा या ईर्ष्येने! 

   Class Room मोठ्ठी होती. वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांनी आणि फुग्यांनी वर्ग सजविला. भिंतीवर मध्यभागी महात्मा गांधींचे स्वहस्ते काढलेले चित्र लावले. त्याखाली 'वैष्णव जन तो तेणे कहिए जे'..... या ओळी लिहिल्या. गांधीजींचे विचार विविध ठिकाणी वर्गात लावले. सर्व विद्यार्थीनींच्या नावाचा चार्ट लावला. 

   "The Greatness of this man lies in his simplicity. Let us try and discover 'Gandhi' in ourselves." - या ओळींसहित गांधींची काठी व चष्मा असलेली रांगोळी काढली. या ओळी, काठी व चष्मा त्याकाळी 'दूरदर्शन' वर फारच Famous होते. वारंवार दाखवत होते. प्रवेशद्वारावर गणेशाचे सुंदर चित्र लावले. मुख्याध्यापकांनी सर्व वर्ग पाहिले, सजावट पाहिली. अर्थातच आमच्या ९(फ) या वर्गाचा प्रथम क्रमांक आला. चाहतने मला मिठीच मारली. आमच्या सर्व जणींच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळले. 

   आम्ही सर्वांनी मुख्याध्यापकांना वंदन केले. 'तुम्ही सगळ्यांनी सजावट छान केली; त्याप्रमाणेच गांधीजींचे छान विचार प्रत्यक्ष आयुष्यातही अंगिकारा' - असा उपदेश मुख्याध्यापकांनी केला. या घटनेविषयी आज लिहिताना मला दाटून आले. 

    पुढे कॉलेजात गेल्यावर Faculty बदलली तसे मार्गही बदलले. वेगळ्या मैत्रिणी, वेगळे विषय, वेगळी आव्हाने! कॉलेजमध्ये सपना पाटील, स्नेहल मनभेकर, मोनाली काळे या माझ्या मैत्रिणी होत्या. सर्वजणी मनमिळाऊ आणि अभ्यासात हुशार होत्या. 'सपना पाटील' चा वाढदिवस १ जानेवारीला असायचा. तो मोठ्या थाटात साजरा व्हायचा. आम्ही सर्वजणी मिळून; तिचे घर लांबही होते तरी जायचो. खूप मजा यायची. 'स्नेहल मनभेकर' एकत्र कुटुंबात राहत होती. ती, तिचे आई-वडील, काका-काकू, बिन लग्नाची आत्या, मामेभाऊ, अशा सगळ्यांसोबत राहायची. घर तिच्या काकांचे होते पण घराला नाव हिचे होते - 'स्नेहल.' 

      पुढे नोकरीच्या काळातही अनेक मैत्रिणी आल्या व गेल्या. माझी तर विद्यार्थ्यांशीही खूप चांगली मैत्री आहे. वेळ मिळाला तर विद्यार्थी माझ्याजवळ सर्वकाही share करतात. आत्ताच्या काळात Technology Developed असल्यामुळे whatsapp, facebook द्वारे अनेकांची मैत्री कायम राहते. आज असे वाटते, ते दिवस फिरुन परत यावेत आणि सर्वांचे आपण फोटो काढावेत, सर्वांना घरी बोलवावे. 

  आज माझ्या मैत्रिणी कुठे असतील? माहीत नाही; पण मनाच्या खोल अशा कोपऱ्यात त्या नेहमीसाठीच विसावल्या आहेत. मन लेखणीच्या रुपातून त्यांना साद घालीत आहे. आठवणी पिंगा घालीत आहेत. 

  "कालचक्र कितना भी आगे जाये

   तेरी चाहत दिलसे कभी भी न होगी कम ऐ दोस्त! जब तक है जान, जब तक है जान, ओ.... चाहत खान, ओ... चाहत खान."

    वरील सर्व वर्णन शाळाकॉलेजातल्या सख्यांचे होते. अनेक वर्षांपूर्वीच्या त्या सख्या. सध्या मात्र मला एक सख्खी सखी आहेः- माझी आई; जी सतत माझ्यासोबत असते. वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर आमच्या चर्चा आणि गप्पागोष्टी होतात. आयुष्याच्या विशिष्ट वळणावर मुलगी आईची मैत्रिण व्हावयास हवी; पण आई-मुलीतील मैत्रीचे नाते दुर्मिळ असू शकते. आम्हा दोघींचे तसे नाही. अशी कोणतीही गोष्ट नसेल; जी आम्ही एकमेकींजवळ सांगितली नसेल! आमची मैत्री अशीच राहो कायम!!.....

   प्राणीसुध्दा आपले चांगले मित्र असतात. आमच्याकडे बाबांनी एक कुत्र्याचे पिल्लू आणले होते. आम्ही शाळकरी होतो तेव्हा! त्याच्या सर्वांगावर ठिपके होते म्हणून त्याचे नाव 'स्पॉटी' ठेवले होते. आमची घरी येण्याची वेळ त्याला माहीत होती. बरोब्बर त्यावेळी तो अंगणात येऊन उभा राहायचा! आमच्या पावलांना गुदगुल्या करायचा. कुत्रा फारच लोभस होता. अचानक आजार होऊन तो मरण पावला. पुढे कित्येक दिवस आमच्या मनाला दुःखद हुरहूर लावून गेला. आमचे चेहरे सुतकी झाले, त्यावेळी! 

   आपण वापरत असलेल्या वस्तूही आपल्या सख्या असतात. शाळाकॉलेजात जातांना चालवलेली सायकल आपली जीवाभावाची असते. निर्जीव असली तरी! या सख्यांची यादी मोठी होत जाते. पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तके सर्व आपले सखे असतात. स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, आपले घरः- जगात कुठेही फिरुन आलो तरी घराची ओढ काही औरच! 

    मैत्रीचे नाते हे फार व्यापक असते. वैश्विक मैत्रीचे नाते तर संत ज्ञानेश्वरांनी जोपासले! विश्वालाच आपले 'घर' मानले! 'भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे' असे 'पसायदान' मागितले; स्वतःसाठी नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी! 

    वृंदावनातील 'तुळस' जीवाभावाची सखी वाटते. छान फुललेली तुळस मन प्रसन्न करते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरें, पक्षिणी सुस्वरें आळविती'- असे म्हणणारे संत तुकाराम; निसर्ग आपला मित्र आहे व राहील असे सुचवून जातात. 

   सर्वोच्च जिव्हाळ्याची भावना ही मैत्रीची असते! 


       मृदुला मुकुंद पाटखेडकर.

         ८/८/२०२२

पुत्रदा एकादशी

 श्रावण मासातील पुत्रदा एकादशी म्हंटले की ती. बाबांची आठवण येणे अपरिहार्य आहे. पुत्रदा एकादशीचा जन्म असला तरी दुसऱ्या दिवशी बाबा वाढदिवस साजरा करीत. नागपूरला त्यावेळी जे कोणी उपस्थित असतील व मुद्दाम त्यानिमित्ताने आलेही असतील त्या सर्वांसोबत अत्यंत मनःपूर्वक हा वाढदिवसाचा समारंभ होत असे. सर्वांना भेटीगाठीची ती एक पर्वणीच असे. प्रमोद, मी, विश्राम, अरुण, राजू  प्रत्येकजण आपापल्या 'करीयर' मध्ये मग्न असल्यामुळे व परगावी असल्यामुळे आम्हा सर्वांना त्याप्रसंगी आवर्जून बोलावले जायचे व आम्हीही सर्वजण तो समारंभ साधण्याचा प्रयत्न करीत असू. 


  जसजसे आपले वय वाढत जाते व आपणही आपापल्या आयुष्याला तोंड देताना जे काही शिकत असतो त्यातून आपल्याला आपल्या आईवडिलांची, नातेवाईकांची एक समृध्द करणारी ओळख मिळत गेलेली असते. ती. आई व बाबांनी आम्हा सर्वांना आयुष्यात खूप समृध्दतेचा, सुसंस्कृततेचा, विचारांच्या परिपक्वतेचा व एकंदरीतच जीवनाला निरलसपणे, निर्भीडपणे सामोरे जाण्याचा जो सर्वांगीण अनुभव दिला आहे त्याला तोड नाही. 


  अनेक गुण वारसाहक्काने मिळत असतात. आईबाबांमध्ये जीवनाला शिस्त कशी लावायची याचे उदाहरणाद्वारे दाखविण्याचे जे कसब आणि कौशल्य असते ते भरपूर प्रमाणात होते. 


  'अभ्यासोनि प्रकट व्हावे' हे संस्कार तर त्यांनी दिलेच ; पण 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' याचाही संस्कार आपोआपच मिळाला. 


  निःसंग होऊन बाबा जीवनाला सामोरे गेले. आपण थोडे जरी त्यांच्यापासून शिकू शकलो तरी फार झाले.  


   8 august ला ही पुत्रदा एकादशी आलेली आहे. बाबांच्या स्मरणाने व्याकुळ होऊन हे चार शब्द लिहिले आहेत. अनेकांना प्रेरणा देणारे, अनेकांच्या जीवनाला हातभार लावणारे 'बाबा' तुम्हाला विनम्र अभिवादन व श्रदांजली. 🙏🌹


            संगीता पाटखेडकर 

              ८/८/२०२२

Saturday, 6 August 2022

स्वयं प्रकाशकोशी












तो स्वयं प्रकाशकोशी सखा सजीवांचा

मित्र अवघ्या जीवन सारथ्याचा

दिवाकर शुभंकर ऊर्जाप्राणाचा

दिसणारा देव सूर्य नित्य कर्माचा


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    ७/८/२०२२

Friday, 5 August 2022

माणूस

 नावीन्याच्या शोधात

  जुन्यातच गुरफटतो माणूस


  नव्या मनसुब्यांच्या राज्यात

  वास्तवातच अडकतो माणूस


  मोकळे मोकळे श्वास निसर्गाचे

  गुंत्यातच त्याच्या त्याच्या गुंततो माणूस


  विवंचना घेते जन्म हवा तसा नवा नवा

  जगतांनाच कितीदातरी मरतो माणूस


  सावरलो म्हणत उभा राहतो कसाबसा

  पुन्हा ठेच लागून कितीदातरी पडतो माणूस


 जित्याची खोड इथे मात्र जगल्याशिवाय जात नाही

  सुखदुःखांशिवाय असा किती उरतो माणूस


 ऋणानुबंधी पसारा जीवास लावून जगतो माणूस

 सोडून सारे बंध रेशमी एकटाच कसा जातो माणूस


 माणूस तरीही माणूसच शेवटी अवघा जीवन मित्र

 राखेतूनही फिनिक्स भरारी, जगण्याचे आभाळ माणूस


        मृदुला मुकुंद पाटखेडकर 

           ६/८/२०२२

Thursday, 4 August 2022

पाऊस


 







काय पडतं?

काय साचतं?

काय साठतं?

काय खोलवर जातं?

काय नकळत वाहून जातं?

पावसा!! तुला ठाऊक तरी असतं?

  

   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     ५/८/२०२२

कमलाक्षी











हातांनी चांगले कर्म घडू दे

पायांना चांगल्या वाटा मिळू दे

बुध्दीत विवेकी ज्ञानराशि पडू दे

डोळ्यांना तुझी रुपे साठवू दे

कानांत नादब्रह्म घुमू दे

कमलासमान कोमलता आयुषी दे

हे कमलाक्षी, समृध्दीची देवी तू

अस्तित्वांस ही सारी समृध्दी दे


     मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        ५/८/२०२२

Wednesday, 3 August 2022

मेरी रचना



   








वल्ला जवाब तुम्हारा नहीं


   किसी भी मौसम में सुनूँ 

   तो बहार है

   तेरी गायकी का जुनून

   सारे जहाँ पे सवार है

   नजा़कत भी है

   शरारत भी है

   बचपना भी है

   सागर जैसी गहराई है

   रात में गूँजती तनहाई भी है

   जादूभरी मदहोशी भी है

  दिल की धडकनों में ठहरती जैसे

   आवाज मस्तानी तेरी 

   अलग हरकतें तेरी

   दुनिया के दिलों का कत़रा कत़रा 

   छूती हो जैसे

  हर लम्हा़ नई पेशकश लगती हो जैसे

   सूरमयी साज़ में सजी़

   सुंदर गायकी तेरी किशोरदा!!!!

   सात सूरों को अमर बनाती हो जैसे

    

       मृदुला मुकुंद पाटखेडकर. 

          ४/८/२०२२

     महान गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त.

Tuesday, 2 August 2022

उधळण सौख्याची

 उधळण सौख्याची

  मोजदाद कशाला?


 काटे आयुष्यातले 

 फुलांना दोष कशाला?


 स्वप्नें नवतारुण्यातली

 वास्तवाचे भान कशाला?


 सहवासातले प्रेम अतोनात

  विरहाचे डंख कशाला?


  रवितेजाची पहाट दूर दूर

  मावळतीचे विचार कशाला?


  साथसंगती नात्यांचे ऋणानुबंध

  साथ आणि संगतीत दुरावा कशाला?


 ऋतू बहराचा श्रावण रंग निसर्गी सुंदर

 रसिका! मनीं कुरुपता, रंगाचा बेरंग कशाला?


  हसावे मनभरुन बिनधास्त आयुष्यी

  मध्येच अवघे रडगाणे कशाला?


  खेळ तुझा नि माझा चौकटीतला सर्वव्यापी

सर्वव्यापी ईश्वरास नशिबाची तुझ्या दूषणें कशाला?


      मृदुला मुकुंद पाटखेडकर 

           ३/८/२०२२

कोई तो यहाँ से गुजरे

 कोई तो यहाँ से गुजरे

  प्रेम का पथ बरसाये





 







कोई तो यहाँ से गुजरे

इंतजार में तरसाये


 कोई तो यहाँ से गुजरे

 जो दिल से याद आये


 कोई तो यहाँ से गुजरे

 सावन का रंग चढाये


 कोई तो यहाँ से गुजरे

 झूम के झुलों के गीत गाये


 कोई तो यहाँ से गुजरे

 सावन की कहानी कहलाए


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    ३/८/२०२२