माझ्या
मित्र-मैत्रिणींनो,
'भले बुरे जे घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर".... रुंजी घालताहेत मनावर आज ह्या ओळी; कारण आज गुढी पाडवा. आपलं मराठी नववर्ष. नवीन संकल्पना, नवीन इच्छा, आकांक्षा, नवी स्वप्नं घेऊन नववर्षानं आपल्या द्वारी पाऊल ठेवावं आणि आपण त्याच उत्साहानं स्वागत करावं हीच आपली इच्छा असते. सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो. अगदी सहजच मन मागच्या वर्षात कधी निघून जातं कळतच नाही. मागील पूर्ण वर्षभरात आपण काय यश, अपयश मिळवलं, आपली काय प्रगती झाली, आपल्या सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू कोणत्या होत्या; याचा लेखाजोखा अलगद मनावर राज्य करु लागतो. मागील वर्षाचा विचार करतांना येणा-या या पुढच्या नवीन वर्षात आपण काय काय करु, कोणकोणते संकल्प करु याचीही मनांतच मांडणी तयार असते; अगदी आत्ताच्या क्षणापासून!! कारण हा एकच असा दिवस असतो, जो आपल्याला क्षणांत भूतकाळात घेऊन जातो आणि त्याच्याच पुढच्या क्षणांत भविष्यकाळात!! मला खात्री आहे असं प्रत्येक मराठी माणसाचं होतं!! भूतकाळात घडलेल्या कटू आठवणी आणि प्रसंग, यश, अपयश, झालेलं नुकसान, अपमान झाला असेल तर तो....हे सगळं सगळं आपण आठवत राहतो. नववर्षाची सुरुवात करतांना आजच्या ह्या शुभदिनी हा सर्व भूत, भविष्याचा विचार प्रत्येकाच्या मनांत येणं स्वाभाविकच आहे; म्हणून वरील ओळींप्रमाणेच आपण आज या नववर्षाच्या वळणावर जरा क्षणभर विसावा घेणार आहोत, आणि जे घडून गेले त्याला राम-राम करुन या चैत्र महिन्यात वर्तमानात जगण्याची नवी पालवी, नवं बीज मनामनांत संकरित करण्याचा संकल्प करणार आहोत. 'जगा वर्तमानात' असे म्हणूनच मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या व रामाच्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देते.
'काळ' मोठं अजब रसायन आहे. एक क्षण दुस-या क्षणाला ताबडतोब परका करुन टाकतो. असं कोणतंच घड्याळ आजपर्यंत उपलब्ध नाही जो पूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ आपल्याला दाखवेल. घड्याळात बघतांना आत्ताच्या क्षणी किती वाजले? एवढंच आपण सांगू शकतो. 'आला क्षण गेला क्षण' असं जीवनाचं स्वरुप आहे. एक क्षण जर दुस-या क्षणाला ताबडतोब परका करुन टाकतो तर मग आपण गेलेल्या आणि येणा-या क्षणांना 'सखा' समजून वर्तमानकाळात मात्र एखाद्या आंधळ्यासारखे वावरतो. असे का होते? याचे उत्तर खालील कथेतून आपल्याला मिळेल.
शेख
चिल्लीची
गोष्ट
प्रसिध्द
आहे.
तुपाचे
भांडे
डोक्यावर
घेऊन
व्यवस्थित
ठिकाणी
पोचविले
तर
एक
श्रीमंत
माणूस
त्याला
खूप
पैसे
देणार
होता.
शेख
चिल्ली
अगदीच
गरीब!
त्याला
आपण
हे
काम
करु
व
येणाऱ्या
पैशात
काय-काय करु शकू याचा विचार तो करु लागला. बकरी विकत घेऊ, दुधाचा धंदा करु, नंतर होणाऱ्या नफ्यात गाय घेऊ, येणाऱ्या नफ्यात पुष्कळ गायी घेऊ, डेअरीचा धंदा करता-करता वेळ अपुरा पडेल, खूप पैसा मिळवू, घर घेऊ, लग्न करु, मुले होतील, घरी आरामशीर राहू, मुलगा जेवायला बोलवायला येईल आणि मी त्याची गंमत करीन, त्याला नाही म्हणेन! असे म्हणून शेख चिल्लीने डोके हलविले व तुपाचे भांडे खाली पडले. सगळी स्वप्ने धुळीला मिळाली! स्वप्नांचे इमले रचता रचता वर्तमानाचा विसर पडला. मर्ढेकरांचा 'गणपत वाणी' आठवतो. गणपत वाणी बिडी पिताना - चावायाचा नुसतीच काडी; कारण पैसे वाचवून 'माडी' बांधायची त्याची इच्छा!
स्वप्नांच्या मनोराज्यात माणूस इतका गुंग होतो की परिस्थितीचे, वर्तमानाचे भान विसरतो व जे मिळवायचे तेही मिळत नाही. आपल्याजवळ काय उपलब्ध आहे यावर आधी लक्ष केंद्रित करावयास हवे! हवेत तीर मारण्यात काय अर्थ? एकाग्रता जर असेल तर मध्येच ध्येय विस्कळीत होणार नाही. कोळी जाळे विणतो. तो किती एकाग्र असतो! त्याच्यापासून Concentration शिकायला हवे.
आपलं
मन
चंचल
असतं.
फुलपाखरु
जसं
अलगद
एका
फुलावरुन
दुस-या फुलावर बागडतं तसंच आपलं मनही आयुष्यात घडून गेलेल्या एका प्रसंगावरुन दुस-या प्रसंगावर अलगद झेपावतं. वर्तमानात जगायचं असेल तर मनावर ताबा मिळविणे आवश्यक!! शरीर आणि मनाचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर घडून गेलेल्या गोष्टींना उगाळत बसणे आणि भविष्याची विनाकारण चिंता करणे, उगीचच भविष्यात संकटंच येतील असे मनांत गृहित धरणे, या सर्व गोष्टी आपल्याला वर्तमानात जगण्यासाठी परावृत्त करणाऱ्या आहेत. असं म्हणतात. 'Yesterday is history,
Tomorrow is mystery. Today is a gift, That is why it is called 'The Present'.
इंग्रजीमधे
वर्तमानकाळाला 'Present' म्हणतातः- म्हणजेच काळानेच आपल्याला दिलेलं हे gift किंवा present आहे. या present चा उपयोग कसा करुन घ्यायचा, प्रत्येक क्षण नितांतसुंदर कसा घालवायचा याचा निर्णय ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून आहे.
बुध्दीमत्ता,
कार्यशैली,
उत्तम
आरोग्य
व
उत्तम
मन
याद्वारे
कार्यकुशलता
वाढते.
वर्तमानात
जगणे,
त्यासाठी
परिश्रम
करणे,
निष्ठापूर्वक प्रत्येक अडथळा पार करण्याची हिंमत ठेवणे - या गोष्टी भविष्य आपोआपच घडवितात. 'पेराल तेच उगवेल' तेव्हा 'पेर्ते व्हा' हे ब्रीदवाक्य महत्त्वाचे!
इतिहास
घडून
गेलेला
असतो.
इतिहासातील
व्यक्तींनी
इतिहास
सिध्द
केलेला
असतो;
त्यातील
प्रेरणादायी
घटनांपासून
निश्चितच
खूप
काही
शिकायचे
असते,
पण
त्यातच
अडकून
पडायचे
नसते.
आपल्याही
हातून
'इतिहास'
घडावा
असे
काहीतरी
निष्ठेने
करण्याला
महत्त्व
आहे.
इतिहासाला
पालांडत,
वर्तमानाला
ओलांडत
जो
भविष्यात
शिरतो
तोच
माणूस
चिरस्थायी
होऊ
शकतो.
पायवा
महत्त्वाचा,
इमारत
उभी
होणेही
महत्वाचे!
'कळस'
लोकांचे
लक्ष
वेधून
घेणारच!
'आधी
कळस
आणि
मग
पाया'
असतो
काय?
पायवा
आणि
कळस
यात
जो
वर्तमान
आहे
तो
उजळून
टाकण्याची
हिम्मत
प्रत्येकाने
दाखविली
तर
एक
सुखी
समाज
आपोआपच
अंकुरेल;
आणि
या
अंकुरण्याचा
वटवृक्ष
होईल!
हा
वटवृक्ष
अनेकांना
सावली
देईल
आणि
दीर्घकाळ
प्रेरणा
देईल!
वर्तमानात
जगण्यासाठीच्या आवश्यक बाबीः-
१)
जग
बदलत
आहे.
आमच्याच
Computer institute चं उदाहरण देते. आदल्या वर्षी MSCIT चा कोर्स केलेला विद्यार्थी जेंव्हा certificate घ्यायला आमच्या केन्द्रावर येतो आणि practical Lab मध्ये जाऊन बघतो, तेंव्हा त्याला MSCIT कोर्स बदललेला दिसतो. त्याला मोठं आश्चर्य वाटतं!! कारण आजची वेगवान Technology!! ती इतकी develop झालेली आहे की, मागच्या वर्षीचं नामोनिशाण न ठेवता काळासोबत बदलत जाणारं तंत्रज्ञान विकसित करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. मागील अनेक वर्षांपासून कितीतरी Softwares मध्ये नवनवीन updations आले.नवीन तंत्र, नवीन ज्ञान शिकून घेण्याची जिद्द आणि ओढ आपल्याला निश्चितच भूतकाळात रमण्यापासून अटकाव करेल आणि वर्तमानातील या बदललेल्या वेगवान आणि विकसनशील जीवनप्रणालीला सामोरे जातांना भविष्यकाळ आपोआपच समृध्द होईल. आपण वर्तमानकाळ सुदृढ केला तर भविष्यकाळ सुदृढ होईल आणि पुढच्या नवनवीन वाटा दृष्टिपथात येऊ लागतील.
२)
आनंदाने
आणि
हसतमुखाने
आजच्या
वर्तमानातील
आव्हानांना
तोंड
देणे
आवश्यक
आहे.
सकाळची
सुरुवात
हसून
साजरी
केली
तर
आजच्या
या
क्षणापासून
संपूर्ण
दिवसभराच्या
क्षणांत
आपण
हसून
आणि
आनंदाने
विहार
करु
हे
निश्चित!!
३)
आपल्या
मनावर
अनेक
गोष्टी
आणि
समस्यांचं
ओझं
असतं.
घरची
आणि
बाहेरची
Tensions वेगळी
असतात.
त्यात
मध्येच
घडून
गेलेल्या
घटना
आणि
भविष्यात
येऊ
शकणारी
संकटे
यांचा
विचार
करण्यातच
आयुष्यातला
जास्तीत
जास्त
वेळ
आपण
वाया
घालवतो
आणि
त्यातून
आपल्या
फायद्याचे
संपूर्ण
गणित
चुकते.
४)
स्वतःचं
मन
कामात
गुंतविणे
आवश्यक!!
एखादा
चांगला
छंद
आपल्याला
वर्तमानात
जगण्यास
मदतीचा
ठरतो;
त्यात
आपण
रमून
जातो.
आपण
जिथे
नोकरी/व्यवसाय करतो, तिथल्या कार्यात स्वतःला झोकून देणे, एकटं न राहता अधूनमधून जनसंपर्कात राहणे, विचारांचे एकमेकांशी आदान-प्रदान करणे, सकारात्मक बाबींचा अवलंब करणे, स्वतःचं शरीर आणि मन आनंदी ठेवणे या सर्व बाबी आपल्याला वर्तमानात जिवंत ठेवतील.
'जुने जाऊ द्या मरणालागूनि, जाळा अथवा पुरुन टाका' - असं एका कवीनं म्हंटलंच आहे. आशा भोसलेंनी गायलेलं 'वक्त' सिनेमातलं एक प्रसिध्द गाणं आज ओठांवर येत आहे. 'आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है'......
जीवन
क्षणभंगुर
आहे.
आजचा,
आत्ताचा
क्षण
रसरसून
आणि
भरभरून
जगू
या
आणि
जीवनाचा
खरा
आनंद
घेत
नववर्षाची
वाटचाल
करु
या.
......
समाप्त.
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२५/३/२०१७.