क्षण
अन्
क्षण
असा
यावा
नवनिर्मितीचा आनंद घ्यावा
भूतकाळातील
आठवणींचा
ठेवा
आजही
डोळ्यांत
भरुन
राहावा
ज्या
ज्या
क्षणांनी
भरभरुन
दिले
आपुलकी,
जिव्हाळा,
मायेचे
सुखद
वरदान
दिले
त्या
त्या
क्षणांनी
माझा
नमस्कार
स्वीकारावा
आयुष्याचे
खेळ
वेगळे
काळवेळाचे
ढंग
वेगळे
अपरिचित
आयुष्याचे
गूढ
आजवर
न
आकळे
भूतकाळातील
अनुभवांनी
वर्तमानाचा
वेध
घ्यावा
भविष्यातला
मार्ग
दाखवावा
इवल्याशा
आज
रोपट्याचा
पुढे
मोठा
वृक्ष
व्हावा
आजच्या
जिद्द,
प्रयत्नांना
आजच्या
चांगल्या
आकांक्षांना
स्वप्नपूर्तीचा आनंद मिळावा
अनंत
ज्ञानप्रेरणेने, बळ, निष्ठेने
आयुष्याचा
पेला
भरत
राहावा
अनाथांना
नाथ
मिळावा
गरीबांना
न्याय
मिळावा
अपंगांना
सन्मान
मिळावा
अंधाराला
प्रकाश
मिळावा
निराशेने
झाकोळल्यांना
आशेचा
किरण
दिसावा
हरवलेल्यांना मार्ग गवसावा
प्रेमाचा
प्रेमळ
साथीदार
मिळावा
अक्षय
प्रकाश
सुख
चांदण्यांचा
या
भारतभूवर
पडत
राहावा
सोन्याचा
धूर
पूर्वीचा
हरवलेला
फिरुन
परत
इथे
पसरावा
अन्याय,
अत्याचार,
कुनीतीचा
इरादा
कायम
नष्ट
व्हावा
सुविचारांचे
मळे
फुलूनी
चारित्र्यसंपन्न वसंत यावा
प्रत्येकाच्याच व्यक्तित्त्वाला
प्रतिभेचा
सुगंध
यावा
कर्तबगार
व्यक्तीव्यक्तींनी
देशाला
सन्मान
मिळावा
अशा
आलेल्या,
येणा-या क्षणाक्षणाला
सोन्याचांदीचा वर्ख चढावा
सोनेरी
क्षणांच्या
सोबतीत...
जीव
न्
जीव
बहरुन
यावा
जीव
न्
जीव
आनंदित
व्हावा
जीव
न्
जीव
फुलून
यावा....!!!
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.