Saturday, 30 July 2022

रात भी बाकी दिन भी बाकी











रात भी बाकी

दिन भी बाकी

उजाले की ओर है आशा

रात में भी नहीं थी निराशा

मिठास में है अपनापन

जीवन में है नयापन

बाकी में है बात अधुरी

संपूर्णता से है अधुरी यारी

कहानीं यही है जिंदगी की सारी

दिन और रात हर हमेशा से ही

तराशते है जोहरी

रात भी बाकी

दिन भी बाकी


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

  ३१ जुलै २०२२

याद और इंतजार











याद और इंतजार

दोनों तडपाते बहोत है

याद बीते दिनों की

और इंतजार आनेवाले कल का

राही, चलता चल हरपल

कल और आज में पल पल


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

  ३१ जुलै २०२२

मैत्रीचा रेशीम भाव

 











सुखदुःखाचा कसलाही येवो वारा

जिथे मनामनांच्या जुळती तारा

जिथे अमर्याद स्नेहमैत्रीचा गोड ईशारा

तिथेच बंध मैत्रीचा रेशीम भाव खरा


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    ३० जुलै २०२२

Friday, 29 July 2022

अस्तित्वाच्या पाऊलखुणा


 










अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटत जातात

काळाच्या पटलावर रेघोट्या ओढत जातात 

खुणा खुणा खुणावती कुणां कुणां

तरंग लहरींवर नव्या लाटा घुमत राहतात

तुझ्या नि माझ्या जीवनाला अर्थवाही करतात


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

      २९ जुलै २०२२

Thursday, 28 July 2022

गाँव का घर









यादों की दिलेरी में गाँव का घर कहीं ना कहीं

वापसी के लिए मुसाफिर पैर निकलेगा नहीं

चाहे छोटासा घर ही है वहां सही

अपनेपन का एहसास कहीं और मिलेगा नहीं

घर तो आखिर घर ही होता है, खुशी खजाना यहीं

दिल की बात, रुहानीं जज्बा कहीं और नहीं

यादों की दिलेरी में गाँव का घर कहीं ना कहीं


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     २८ जुलै २०२२

तुझ्यामुळे


 










प्रकाशाला चेहरा नसतो

 तुझ्यामुळे तो आहे


 मातीला मुळात आकार नसतो

 तुझ्यामुळे तो आहे


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   २८ जुलै २०२२

Monday, 25 July 2022

माझ्यातलीच मी








माझ्यातलीच मी समोर दिसते

मन खरोखर आनंदून जाते

निवांत क्षणीं त्या नवलाईत फिरते

मन झिम्माड पावसासारखे गाते


   मृदुला मुकुंद पाटखेडकर 

    २५ जुलै २०२२

Sunday, 24 July 2022

मातीत रुजून











मातीत रुजून उमलावे फुलावे असे

थेंबाथेंबांनी हिरवाईत रमावे असे

देठाने पाकळी पाकळीला जोडावे असे

एकमेकां साह्य करत जणू जगावे असे


मृदुला मुकुंद पाटखेडकर 

 २४ जुलै २०२२

Saturday, 23 July 2022

आनंदाची हास्यरेषा


 







आनंदाची गच्ची

 हास्यरेषा माझी सच्ची

 जीवनाशी निखळ माझी मैत्री

 सुखीसमाधानीच मी राहीन

 याचीच तर निव्वळ खात्री

 रे भविष्या! तुझ्याकडेच बघतेय

 विश्वासाने आजचा संदेश

 उद्याला सांगतेय


  मृदुला मुकुंद पाटखेडकर 

   २३ जुलै २०२२

Friday, 22 July 2022

प्रभाती भेटीस दिनकर येई












प्रभाती भेटीस दिनकर येई

प्रतिमारुपी प्रत्यक्ष सृष्टीस उजळी

पहाटगान पक्षीगणांचे जणू भूपाळी गाई

सुरेल अशा रम्यतेला सुगम संगीत देई


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

      २२ जुलै २०२२

तुझ्या माझ्यात गुंतलेलं











टणक कठीण कवचातही जीवन हे भरलेलं

माणुसकीच्या नात्याने तुझ्या माझ्यात गुंतलेलं


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

      २२ जुलै २०२२

Thursday, 21 July 2022

अवखळ पाऊस










अवखळ पाऊस, खट्याळ पाऊस, बालपणींचा....

निरागस मनाला भावतो

खळीने गालाला हसवितो

विविधरंगी आयुष्याचे एकेक पाऊल पुढे टाकतो


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

      २१ जुलै २०२२

गुरु गजानन माऊली












अंतरात्मीं आर्तता माऊली माऊली

शोध जीवनीं प्रसन्नता कृपे माऊली 

जडमूढ ताराया गुरु गजानन माऊली

जीवनवाटांवरचे भक्तिरस मंत्रगान माऊली


    मृदुला मुकुंद पाटखेडकर 

     २१ जुलै २०२२

Wednesday, 20 July 2022

ती आणि पाऊस











ती आणि पाऊस

धारा आणि गारा

नव्या स्वप्नांना ईशारा

नयनीं सुखाचा वारा

  

ती आणि पाऊस

बोचरा शहारा

थेंबाथेंबांचा दरारा

चेहऱ्याला आपसूक भाव हसरा


ती आणि पाऊस

ती आणि पाऊस


 मृदुला मुकुंद पाटखेडकर 

  २० जुलै २०२२