तुझिया
चरणांवरती
सहजचि
झुकला माथा
सुखी
ठेव सर्वांना
ठेव
बाजूला सर्व व्यथा
ऋणानुबंधाची
की जन्म-जन्मांतरीची
ओढतोस
तू रेषा
परतो,
अथवा जावो दिगंती
चिवट
मानवी जिजिविषा
वाटते
तितकी सोपी नसते
भगवंत
भक्तीची माया
सदासर्वदा
लाभो सर्वा
तव
मायेची छाया
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२३
अॉगस्ट २०१९.
No comments:
Post a Comment