धांगडधिंगा,
लीला करणारा बाळकृष्ण?
चोरुन
लोणी खाणारा खट्याळ नंदलाल?
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
मंत्रमुग्ध
बासरी वादन करणारा राधेकृष्ण?
नंदाघरच्या
गाई हाकणारा गोपालकृष्ण?
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
मित्रांचाही
परम मित्र
पतितांचा
स्वामी
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
कंसाचा
प्राणारी
राधेचा
मुरारी
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
कालियाचा
कर्दनकाळ
दुष्टांचा
विनाशकाल
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
राधेचा
जिवलग सखा
मीरेचा
ध्यास अनोखा
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
भोगविलासी
भोगी की
निष्काम
कर्मयोगी?
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
गीता
सांगणारा तत्त्वज्ञानी?
मुकुंद
नावाचा मोक्षदानी?
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
देवकीचा
नारायण
यशोदेचा
नंदलाल
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
हजारो
स्रियांचा तारणहार
कैक
जनांचा केला उध्दार
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
मनामनांत
प्रेम, समर्पण, त्याग, विश्वास
वसवू
पाहणारा अंतरीचा कृष्ण?
बासरीआडून
अवखळ मंद हास्य
ओठी
ल्यालेला मौन कृष्ण?
मौन
आहेस तू?
कृष्णा,
सांग ना? कोण आहेस
तू?
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२३
अॉगस्ट २०१९.
No comments:
Post a Comment