आठवणीँची
रेखून नक्षी
झाड
सोडून गेला पक्षी
पोरकी
झाली इवली झाडे
उदासवाणी
लव्हाळ
मनात
भरले रिक्त आभाळ
पण
मन कवाडी चाहूल हिरवी
पुन्हा
पुन्हा हिरवळेल
विरेल
सारे जुने जीर्ण
नवांकुराची
पालवी फुटेल
विलीन
चैतन्य चैतन्यातच
पुन्हा
पुन्हा नव्याने प्रकटेल
असणे,
नसणे अस्तित्त्वाचे
वर्तुळ
फिरत राहील
.....मृदुला.
No comments:
Post a Comment