Thursday, 19 January 2023

ताबा

मधुमेह वगैरे काही नाही, गाढवाला गुळाची चव नाही

मामला घृत-शर्करायुक्त साधा नाही, जिभेवर हाड नाही


परंतु दुप्पट खाणे, हळूहळू खिळवी अंथरुणी

अचाट खाणे, नेई मसण मार्गी


खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मानत ऐसे नाही

करावी एकादशी येता चाळीशी, ऐसे जरुरी नाही


आधी पोटोबा, ऐसे तत्वज्ञान नाही

आपल्याच पोळीवर तूप, ओढून घेत नाही


आम्हाला आमचेच देऊ गहू, असला स्वार्थ नाही

कोथळा काढतो देऊन आवळा, ऐसी प्रवृत्ती नाही


लागला गोड ऊस म्हणून, खात मुळासकट नाही

ऊसाच्या उदरी कापूस, ऐसी दैना नाही


त्याची वाजवावी टाळी, ज्याची मिळते पोळी

कर्म हेच मर्म, विश्वास अतूट नव्हे गर्व


आरोग्य हेच ऐश्वर्य, गुरुकिल्ली हीच आमुची

स्वेच्छेनेच खात काहीबाही नाही, सैल लगाम सोडत नाही

स्वत्व ममत्व सोडत नाही, सत्व उन्मत्त होत नाही 


अमोल पाटखेडकर

२०-जानेवारी-२०२३ 

No comments:

Post a Comment