Wednesday, 28 December 2016

जखम

    जखमेला नसतो काळ वेळ
       कधीही येते
    लवकर मात्र जात नाही
   
    काळ तिचा ठरलेला असतो
   भरुन यायला वेळ लागतो

   जखम शरीराची वेदना देणारी,
भळभळणारी, टोचणारी, त्रास देणारी
 भरुन येईपर्यन्त व्रण कायम ठेवणारी

 जखम मनाची; बोचणारी, जिव्हारी लागणारी, घाव घालणारी, शल्य वाटणारी 'जाऊ दे नं'!! म्हणून जाणारी जख्खं म्हातारी होऊन मनांत जम बसविते ती जखम!!!!!
मनाच्या तळाशी तळ ठोकून बसते ती जखम!!!!!

या जखमेला नसतो लेप आणि मलमांचा थर
जखम मनाची अंगावर आणते शहारं
आठवण येता तिची चित्तं होतं कावरं बावरं
बोलाविताही ती बोलाविते आपल्याला ये रं ये रं
  ती येताच माजतं चित्तात काहूर

  जखम मनाची मनांत करते दंगल
जखमेवर मीठ चोळलं की ती घडविते अमंगल
 कुठूनही येते, कुणाकडूनही येते
    ती असते चंचल
आयुष्य संपेपर्यन्त आयुष्यात जखमांचं असंच येत राहतं वादळ

भरुन काढता काढता तिला जीवाची
   उडत राहते धांदल
जखमाच जखमांच्या करीत राहतात अदलाबदल
तीव्र अतितीव्र होऊनी ती वाढविते मनातला सल येता जखमा मनाला राहावे लागते स्थिर, निश्चल जखमांचे घाव घेराव घालूनि कोमेजून टाकतात; नाजूक मन सुकोमल

आयुष्य आहे तर जखम आहे; किंबहुना
जखमा आहेत मनामनांत जमा
दिल्या असतील आपण इतरांना अशा मनस्वी जखमा; तर... तेंव्हाच्या तेंव्हाच मागून टाकावी क्षमा

जखमांना या औषधं पुरवित पुरवितच आयुष्यात तू चल, पुढे पुढे चल तूपुढे पुढे चल, मित्रा, चल, चल, चल, चल!!
  जखमा तर तुला बनवितीलच विकल
मनाला उभारी देऊन तुलाच लढवायची आहे शक्कल

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        २८/१२/२०१६.

No comments:

Post a Comment