जुन्या वर्षाचा दूर
करु फाफट पसारा
स्वागत करु वर्ष
आले दोन हजार
सतरा
मन कप्प्यांची
द्वारे आज खुली
करा
नुसतीच घराची नाही तर
मनाचीही साफसफाई करा दूर
गेलेल्या नात्यांना जवळ आणण्याचा
प्रयत्न करा
कुणालाही न दुखवण्याचा
संकल्प करा
३१ डिसेंबरच्या रात्री जरा
वेगळ्या दंगलीचा विचार करा
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल महान विचारांची
दंगल..दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल कणखर खंबीरतेची
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल जिज्ञासू ज्ञानाची
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल नवनवीन सद्गुणांची
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल मंगल गोष्टींची
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल संकल्पपूर्तीच्या स्वप्नांची
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल तुमच्या आमच्या
गोड नात्याची
दंगल...दंगल...दंगल...
करु मनांत
दंगल आठवणींच्या गुंफणीची
धांगडधिंगा नुसता
धम्माल मस्ती नुसती
वाईट दंगलींना
या दूर दूर
सारा
पसरु द्या आसमंतात
सर्वदूर सकारात्मकतेचा वारा
जिद्द, ज्ञान, समृध्दीचा
न होवो कधीच
कोंडमारा सत्य संकल्प
आणि सिध्दीसाठी सर्व
झटू या जरा
जोडुनि मनामनांना माणुसकीच्या भिंती
उभारा आयुष्यात अज्ञानी
काजळीला नसो थारा
अंतरीच्या माझ्या या
भावभावना
सदिच्छा बनून पसरो
दिगंतरा
सुख, समृध्दी, आरोग्य, आनंदाचा
घडा सर्वांना सापडो
खराखुरा
शुभेच्छारुपी माझी ही
श्रध्दासुमनें
हृदयात आज आपण
भरा
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
३१ डिसेंबर
२०१६.
No comments:
Post a Comment