Sunday, 26 March 2017

फिरुनी मन पुन्हा...


फिरुनी मन पुन्हा मागे वळून पाहू लागले

गेल्या दिवसांच्या वाटेत पाय पुन्हा ठेवू लागले

 

, , , , , , , शिकविणारी आई

बोट धरुन चालतांना मार्ग बाबा दाखवू लागले

इवल्याशा हातात माझ्या स्वप्न उद्याचे बघू लागले

 

फिरुनी मन पुन्हा मागे वळून पाहू लागले

गेल्या दिवसांच्या वाटेत पाय पुन्हा ठेवू लागले

 

शाळा, कॉलेजचे ते दिवस; मित्र-मैत्रिणी जमू लागले

प्रगती आणि यशाची नवी द्वारे शोधू लागले

प्रकाश तो ज्ञानाचा; इतका पुरुन उरणारा

तिमिरातून तेजाकडे नेले ज्यांनी ज्यांनी, .... ते शिक्षक सारे आठवू लागले

 

फिरुनी मन पुन्हा मागे वळून पाहू लागले

गेल्या दिवसांच्या वाटेत पाय पुन्हा ठेवू लागले

 

गेले ते दिन, गेला तो काळ; गेल्या त्या मैत्रिणी..... तरीही....आठवणींत आज सारे ताजेतवाने दिसू लागले

कोलाहल, गोंगाटात आजच्या आर्त साद त्यांना देऊ लागले

 

फिरुनी मन पुन्हा मागे वळून पाहू लागले

गेल्या दिवसांच्या वाटेत पाय पुन्हा ठेवू लागले.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२६//२०१७.

No comments:

Post a Comment