Tuesday, 28 March 2017

गुढी पाडवा


जरीचं वस्त्रं

उंच काठी

साखरेच्या गाठी

आप्तेष्टांच्या भेटीगाठी

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर्वांसाठी...

 

फुलांच्या माळा

कडुलिंबाची पानें

चैत्र फुलला नवचैतन्याने

सजल्या रांगोळ्या....

आंब्याचं तोरण

गुढीपुढती ह्या नवसंकल्पांचं धोरण

स्वादिष्ट रुचकर श्रीखंडी जेवण

शुभारंभ नववर्षाचा, उत्साही वातावरण

 

गुढी उभारु विजय ध्वजाची

एकविसाव्या शतकाच्या तरुण पिढीची

ठिकठिकाणच्या स्वागतयात्रांची...

फुगड्या, लेझीम, ढोल-ताशांची

पर्यावरण, प्रदूषण, वृक्ष संवर्धनाची

प्लास्टिक बंदी, ग्लोबल वॉर्मिंग, पाणी नियोजनाची.....

संकल्प सिध्दीस नेऊनी,

करु या समस्यांचे आज सारे निवारण

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२८//२०१७.

No comments:

Post a Comment