ये गं अंबे मजला
तारुनी ने गं
पैंजणादि
रुणझुण नाचत ये गं
माहुरगडची
रेणुका तू कुलस्वामिनी
आदिमाया
आदिशक्ती जगतजननी
मायारुपी
चराचरी, शक्तिरुपी चराचरी
शक्तीरुपा
ये गं....शक्तीरुपा ये गं....
ये
गं अंबे मजला तारुनी
ने गं
पैंजणादि
रुणझुण नाचत ये गं
तुळजाई
तुळजापूरची तू भवानी
शिवराय
शौर्याची साक्ष जय भवानी
उदोउदो
जयघोष चैतन्य अवनी
पराक्रम
चराचरी, शौर्यरुप चराचरी
शौर्यरुपा
ये गं...शौर्यरुपा ये
गं
ये
गं अंबे मजला तारुनी
ने गं
पैंजणादि
रुणझुण नाचत ये गं
महालक्ष्मी
अंबा माय कोल्हापूरची
अलंकार
शृंगारिक मूर्ती दिव्यतेची
धनधान्य
समृध्दी देवी संपन्नतेची
समृध्दी
सर्वा प्रसन्नतेची दे गं
ये
गं अंबे मजला तारुनी
ने गं
पैंजणादि
रुणझुण नाचत ये गं
सप्तश्रुंग
गडाची वाट अवघड घाटाची
जणू
आयुष्याची वाट कठीण वळणाची
सप्तश्रुंगी
देवीची मूर्ती अठरा हातांची
दैवी
सौंदर्य लावण्य तेजाळ मुखड्याची
विश्वमार्ग
विश्वाचा तेजाळित ये गं
ये
गं अंबे मजला तारुनी
ने गं
पैंजणादि
रुणझुण नाचत ये गं
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२
अॉक्टोबर २०१९.
No comments:
Post a Comment