तूच
असशी मनांत
तूच
वसशी ओठांवरी
ऐल
तीरावरुन तुला
पैलतीरी
मी
हाक
देतसे काठावरी
तूच
असशी भाव माझा
तूच
असशी भावना
तुझीच
मन सदा करी आराधना
आदि
न लागे
अंत
न लागे
ठाव
तुझा शोधू कुठवरी
कधी
देशील मला तू साद
साद
मी दिली तरी
देशील
का प्रतिसाद??
उत्त्तराची
वाट पाहण्या मी आतुर
भेट
तू मला लवकरी
विश्वाची
माया तू
कृपेची
छाया तू
भक्तांची
माय तू
नांदसी
मम अंतरी
कुष्मांडा
तूच
कात्यायनी
तूच
महाकाली
तूच
स्कंदमाता
तूच
दुर्गा,
सरस्वती तूच
तूच
निलांबरी
रुपे
तुझी किती त्रिपुरसुंदरी
तूच
द्यावी शक्ती
तूच
द्यावी बुध्दी
तूच
द्यावी स्फूर्ती
ताराया
भवसागरी
दूर
होवो अंधःकार
प्रकाश
पडो सर्वदूर
दुःख,
दारिद्रय, दैन्य दूर
तव
कृपा राहो निरंतरी
संहारुनी
दुष्टांना
बळ
देई सुष्टांना
असत्याचा
होई चकनाचूर
सत्याचा
विजय होतसे तुझ्या दरबारी
सहस्त्र
नामें तुझी
सहस्त्र
रुपे तुझी
घननीळाची
लक्ष्मी तू गोजिरी
घरोघरीच्या
स्त्री शक्तीतूनी
प्रगटतेस
तू साजिरी
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
No comments:
Post a Comment