ज्योती
ज्योतींनी अंगण प्रकाशले
मनामनांचे
अंतरंग तेजाने उजळले
तमाचे
भवताल भेदक शहारले
हर्षोल्हासात
सारे आसमंत झळाळले
नात्यांच्या
उत्सवाचे महत्त्व आगळे
फराळ,
फटाके, रांगोळ्या, आकाशदिवे
जणू
शुभ दीपावलीचे डोहाळे
......मृदुला.
२९/१०/२०१९.
No comments:
Post a Comment