राजाला पूर्वजन्मातलं सगळं आठवण्याचं वरदान परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलं होतं. पूर्वजन्मात तो मुंबई शहरातला एक अत्याचारी माणूस होता, देशद्रोही होता.
तो परलोकी परतला. तिथे दुरुनच त्याला स्वर्ग दिसायचा. इथे तर किती सज्जन लोक राहतात असे मनोमन तो म्हणायचा आणि अस्वस्थ व्हायचा. नरकयातना भोगत असतांनाही एक दिवस तो विष्णुद्वारी आला आणि याचना करु लागला, मला पुढील जन्मात माझी 'माणूस' म्हणून चांगली ओळख बनवायची आहे. दानशूर व्हायचं आहे. देव 'तथास्तु' म्हणाला आणि पुढील जन्मीं तो 'मिलनसार' नगरीचा राजा बनला. अनेक प्रकारचे दानधर्म त्याने केले. मागील जन्मींचा महाविद्यालयीन कवी या जन्मात त्याच्या नगरीचा राजकवी होता. त्याचीच कविता राजा गुणगुणू लागला आणि पुढील मनातील संवाद पुन्हा आळवू लागला...
माझीच हाक मजला
येते कधी कधी
गर्दीत शोध माझा
घेते कधी कधी
महाविद्यालयातील स्नेह संमेलनात एकाने ही कविता प्रस्तूत केली होती, त्यावेळी किती हसलो होतो आपण त्याला! आज जेंव्हा आपण सुद्धा या गर्दीचाच एक भाग होऊन चालत आहोत त्यावेळी वाटतं आपणच आपल्याला शोधतोय कुठेतरी.
आपलं अस्तित्व म्हणजे फक्त मुंबईतल्या गर्दीतला 'गर्दी' वाढवणारा एक चेहरा! एवढीच ओळख उरली आहे आपली? नाही म्हणता आपल्याला ओळखणारं एक कुटुंब या महानगरात आहे. ज्याच्या आजुबाजूचे दोन चार चेहरे नाही म्हणता ओळखतही असतील आपल्याला. पण जी ओळख निर्माण करण्यासाठी आपण जीवाचं रान करून, सगळ्यांना भांडून इथवर आलो होतो ती ओळख कुठे हरवली?
मृदुला मुकुंद पाटखेडकर
१९/९/२०२२
No comments:
Post a Comment