चित्त नाही स्थिर, भटके दिशोदिशी फार
परिसाची ओढ, म्हणे मी साधू सात्विक || १ ||
म्हणे मी मुल्ला, जाणतो मी अल्ला
करी फार कल्ला, स्त्रीलंपट तामसिक || २ ||
(संदर्भ: जे लोक स्वतःला गॉडमेन म्हणवून घेतात आणि समाजाला उपदेश करतात, ते स्वतः किती विषयाधीन असतात, ह्यावर कसलेले ताशेरे पहिल्या दोन कडव्यात आहेत. म्हणून अशा कुठल्याही स्वघोषित साधूच्या मागे कधीही लागू नये. संत गजानन महाराजांनंतर, सच्चा संतांचा अकाल पडला हे दुर्दैव.)
युध्दात दाखवून पाठ, पळून गेला
नियुक्त आम्ही ज्याला, सरदार केला होता || ३ ||
(संदर्भ: ह्या कडव्यात जे ढोंगी आणि दांभिक खोटा आव आणणारे असतात ते खरी वेळ आली की कशे पळून जातात हे दर्शवले आहे.)
मिटेस्तोवर तेवत होती, वात माझ्या ज्योतीतली
स्वाभिमानी म्हणूनच वाटली, पर्वा अस्तित्व्याची नाही केली || ४ ||
(संदर्भ: कडवे ३ आणि कडवे ४ मध्ये विरोधाभास आहे. जे लोक ध्येयनिष्ठ असतात ते उच्च उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्वतः ची देखील पर्वा करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ स्वतःची पर्वा न करता जीव देणारे अनेक लोक होते.)
बेकार सुकलेल्या, गवताच्या पातींना
चिमण्यांनी वापरल्या, घरटे बनविण्या || ५ ||
व्यर्थ जंगलेल्या, तुकड्यांनी तारेंच्या
सहारा घरट्याला, एकाक्षच्या || ६ ||
निरर्थक त्या, खंडहराला
संसार कबुतरांनी, थाटला || ७ ||
(संदर्भ: कडवे ५, ६, ७ ह्याचा कडवे १, २, ३ शी विरोधाभास दर्शविलेला आहे की प्राणी कुठलाही ढोंगीपणा किंवा आढेवेढे न घेता कसा आपला संसार थाटतात लहान सहान गोष्टींचा वापर करून. मनुष्याला अजून जास्त ची हाव मात्र फार.)
बेकार, व्यर्थ, निरर्थक; वाटे जे आपल्या
वापर सजीव निर्जीवांचा, होत असे कल्पेनेवेगळा || ८ ||
(संदर्भ: सृष्टीमधील काहीच कसे वाया जात नाही ह्या अर्थी.)
आपल्या हिश्श्याची भाकरी, वाटली ज्याने भुकेल्यांना
अवतारच परी, त्यांना तो वाटला || ९ ||
(संदर्भ: तहानलेल्याला पाणी पाजणे आणि भुकेल्याला अन्न देणे, ह्यापेक्षा श्रेष्ठ दान नाही)
अचानक सुदामा, आला जेंव्हा
सोनेरी दिवस, झाला कृष्णाचा || १० ||
(संदर्भ: जेंव्हा जेंव्हा आपले मित्र, आप्तेष्ट आपल्याला भेटायला येतात, त्याच दिवशी दिवाळी दसरा मानावा कारण ते अमूल्य असतात)
भाग्य पालटले, सुदाम्याचे
परमोच्य आनंद, परमेश्वर भेटल्याचे || ११ ||
(संदर्भ: अतिथी ने देखील तितकाच मान आतीथ्येयाला द्यावा ह्या अर्थी )
खूप श्रीमंत आमिषयांची ,होती तुझी दुनिया
प्रलोभनांचा आम्ही त्या, अस्वीकार केला होता || १२ ||
(संदर्भ: आजकाल श्रीमंती चे मोजमाप ऐहिक मालमत्ता किती आहे ह्यावरून केल्या जातं, परंतु खरी श्रीमंती ह्या प्रलोभनांना लांघून जाण्यात आहे ह्या अर्थी )
अमोल पाटखेडकर
२४-नोव्हेंबर-२०२२
No comments:
Post a Comment