"Through
miles may lie between us
we are never far apart, for friendship doesn't count
miles
its measured by
the heart."
आज अॉगस्ट
महिन्यातील पहिला रविवार. सगळीकडे
'Friendship Day' म्हणून साजरा केला जातो.
मैत्रीणी कितीही दूर गेल्या
असल्या तरी मनाच्या
तळाशी त्यांचे विशिष्ट
स्थान असते, ज्याला
मरण नाही. आज
मलाही माझ्या शाळा,
कॉलेजातील मैत्रिणींची तीव्र आठवण
येत आहे. खरी
मैत्री ही जात,
पात, वंशभेद, वर्णभेद,
गरीब, श्रीमंत या
सीमारेषांच्या पलीकडे असते आणि
ती तशीच असावयास
हवी. मित्र-मैत्रिणींचा
एकमेकांविषयीचा जिव्हाळा अनोखा असतो.
प्राथमिक शाळेत असतांना
माझी 'ज्योती कोहर'
नावाची मैत्रीण होती. आम्ही
रोज एकत्र शाळेत
जात असू. मला
अनेक मैत्रीणी होत्या.
माध्यमिक शाळेत असतांना 'ज्योती
चांदेकर' नावाची मैत्रीण होती.
ती व मी;
रस्त्यात कविता(पाठ्यपुस्तकातल्या) म्हणत-म्हणत शाळेत जात
असू. मधल्या सुट्टीत
विविध खेळ खेळत
असू. ५ वी
ते ७ वी
चे माझे शिक्षण
अकोल्यातील 'महाराष्ट्र कन्या शाळा'
येथे झाले. ८
वी ते १०
वी पर्यन्तचे शिक्षण
'Government Girls High School' मधे
झाले. आता त्या
शाळेचे नाव बदलून
'सावित्रीबाई फुले कन्या
शाळा' असे ठेवले
आहे. या शाळेत
तर माझ्या मैत्रीणी
म्हणजे - मराठी, पंजाबी, गुजराती,
तेलुगु आणि मुस्लीम
देखील होत्या. जणू
श्रावणात दिसणाऱ्या इंद्रधनुषी रंगांसारख्याच!
आरती कुळकर्णी,
कविता गढिया, जिग्ना
चौधरी, स्वप्नाली पाटील, राजश्री
सिंह, आणि चाहत
खान. मीनाक्षी नावाची
तेलुगु मैत्रीणही होती. आमची
शाळा स्कूल Captain या
पदासाठी मतदान ठेवीत असे.
मुख्याध्यापकांच्या महत्त्वाच्या सूचना सर्व वर्गांपर्यन्त
पोहोचविणे व विद्यार्थ्यांना
वाचून दाखविणे, शाळेतल्या
विविध उपक्रमांविषयी माहिती
देणे, 'जन गण
मन' हे राष्ट्रगीत
व 'भारत माझा
देश आहे,' ही
प्रतिज्ञा खड्या आवाजात माईक
समोर म्हणणे, शाळेच्या
स्नेहसंमेलनाची आखणी करण्यात
सर्व टीचर्सना मदत
करणे, इ. इ.
........ अनेक कामे शाळेच्या
classes व्यतिरिक्त School
Captain ला करावी लागत. आमच्या
शाळेने 'चाहत खान'
ची School Captain म्हणून बिनविरोध निवड
केली. 'चाहत' माझी खास
मैत्रिण! दाट - कुरळ्या केसांची,
अत्यंत गोरीपान, आरस्पानी सौंदर्याची
खाणच जणू! उप-कप्तान होती - प्रतिक्षा
तंवर.
मी व
चाहत एकमेकींच्या हातात
हात घालूनच शाळेत
फिरत असू. आम्हा
दोघींनाही शाळेची वेळ केंव्हा
होते व दिवसभराच्या
गप्पा केव्हा करायला
मिळतात; याची आतुरतेने
वाट असे. अगदी
छोट्या-छोट्या गोष्टीही एकमेकींजवळ
share करीत असू. दहावीतल्या
मुलींना, नववीतल्या मुलींकडून send off द्यायची
पध्दत शाळेत असते.
आम्ही नववीच्या मुलींनी
छान send off चा कार्यक्रम
आखला होता. 'चाहत'
कर्णधार असल्यामुळे तिनेच सर्व
ठरविले होते. तिच्या अम्मीने
केलेला 'शिरखुर्मा' तिने सर्व
विद्यार्थ्यांसाठी आणला होता.
विविध प्रकारचा सुका
मेवा घालून केलेला
'शिरखुर्मा' सर्वांना खूप आवडला
आणि 'चाहत' मुळे
दहावीतल्या मुलींना छान send off मिळाला.
मुख्याध्यापक 'करंदीकर' सर व
इतर टीचर्सनी आम्हा
सर्वांचे खूप कौतुक
केले.
' चाहत' ने शाळेत
हट्टाने संस्कृत विषय घेतला
होता. अमराठी विद्यार्थ्यांना
हिंदी विषय घेण्याची
मुभा होती तरीही! 'चाहत'
ला अनेक संस्कृत
श्लोक अर्थांसहित पाठ
होते. शाळेत होणाऱ्या
गाणेशोत्सवात तिचा उत्साही
सहभाग असावयाचा. रांगोळ्याही
छान काढत होती.
अस्खलित मराठी बोलत होती.
मी नवव्या
वर्गात असतांना शाळेने 'गांधी
जयंती' निमित्त 'स्वच्छता स्पर्धा'
आयोजित केली होती.
जो वर्ग स्वच्छता
आणि सजावटीच्या बाबतीत
परिपूर्ण असेल; त्या वर्गाला
प्रथम क्रमांकाचे बक्षिस
मिळणार होते. आम्ही सर्वजणी
चाहतसहित जोमाने तयारीस लागलो.
आपलाच पहिला नंबर
यावा या ईर्ष्येने!
Class Room मोठ्ठी होती. वेगवेगळ्या
रंगीबेरंगी फुलांनी आणि फुग्यांनी
वर्ग सजविला. भिंतीवर
मध्यभागी महात्मा गांधींचे स्वहस्ते
काढलेले चित्र लावले. त्याखाली
'वैष्णव जन तो
तेणे कहिए जे'.....
या ओळी लिहिल्या.
गांधीजींचे विचार विविध ठिकाणी
वर्गात लावले. सर्व विद्यार्थीनींच्या
नावाचा चार्ट लावला.
"The
Greatness of this man lies in his simplicity. Let us try and discover 'Gandhi'
in ourselves." - या ओळींसहित गांधींची काठी
व चष्मा असलेली
रांगोळी काढली. या ओळी,
काठी व चष्मा
त्याकाळी 'दूरदर्शन' वर फारच
Famous होते. वारंवार दाखवत होते.
प्रवेशद्वारावर गणेशाचे सुंदर चित्र
लावले. मुख्याध्यापकांनी सर्व वर्ग
पाहिले, सजावट पाहिली. अर्थातच
आमच्या ९(फ)
या वर्गाचा प्रथम
क्रमांक आला. चाहतने
मला मिठीच मारली.
आमच्या सर्व जणींच्या
डोळ्यांत आनंदाश्रु तरळले.
आम्ही सर्वांनी मुख्याध्यापकांना
वंदन केले. 'तुम्ही
सगळ्यांनी सजावट छान केली;
त्याप्रमाणेच गांधीजींचे छान विचार
प्रत्यक्ष आयुष्यातही अंगिकारा' - असा
उपदेश मुख्याध्यापकांनी केला.
या घटनेविषयी आज
लिहिताना मला दाटून
आले.
पुढे कॉलेजात
गेल्यावर Faculty बदलली तसे मार्गही
बदलले. वेगळ्या मैत्रिणी, वेगळे
विषय, वेगळी आव्हाने!
कॉलेजमध्ये सपना पाटील,
स्नेहल मनभेकर, मोनाली काळे
या माझ्या मैत्रिणी
होत्या. सर्वजणी मनमिळाऊ आणि
अभ्यासात हुशार होत्या. 'सपना
पाटील' चा वाढदिवस
१ जानेवारीला असायचा.
तो मोठ्या थाटात
साजरा व्हायचा. आम्ही
सर्वजणी मिळून; तिचे घर
लांबही होते तरी
जायचो. खूप मजा
यायची. 'स्नेहल मनभेकर' एकत्र
कुटुंबात राहत होती.
ती, तिचे आई-वडील, काका-काकू,
बिन लग्नाची आत्या,
मामेभाऊ, अशा सगळ्यांसोबत
राहायची. घर तिच्या
काकांचे होते पण
घराला नाव हिचे
होते - 'स्नेहल.'
पुढे नोकरीच्या
काळातही अनेक मैत्रिणी
आल्या व गेल्या.
माझी तर विद्यार्थ्यांशीही
खूप चांगली मैत्री
आहे. वेळ मिळाला
तर विद्यार्थी माझ्याजवळ
सर्वकाही share करतात. आत्ताच्या काळात
Technology Developed असल्यामुळे
whatsapp, facebook द्वारे अनेकांची मैत्री कायम
राहते. आज असे
वाटते, ते दिवस
फिरुन परत यावेत
आणि सर्वांचे आपण
फोटो काढावेत, सर्वांना
घरी बोलवावे.
आज माझ्या
मैत्रिणी कुठे असतील?
माहीत नाही; पण
मनाच्या खोल अशा
कोपऱ्यात त्या नेहमीसाठीच
विसावल्या आहेत. मन लेखणीच्या
रुपातून त्यांना साद घालीत
आहे. आठवणी पिंगा
घालीत आहेत.
"कालचक्र कितना भी
आगे जाये
तेरी चाहत
दिलसे कभी भी
न होगी कम, ऐ
दोस्त! जब तक
है जान, जब
तक है जान,
ओ.... चाहत खान,
ओ... चाहत खान."
वरील सर्व
वर्णन शाळाकॉलेजातल्या सख्यांचे
होते. अनेक वर्षांपूर्वीच्या
त्या सख्या. सध्या
मात्र मला एक
सख्खी सखी आहेः-
माझी आई; जी
सतत माझ्यासोबत असते.
वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण विषयांवर आमच्या चर्चा
आणि गप्पागोष्टी होतात.
आयुष्याच्या विशिष्ट वळणावर मुलगी
आईची मैत्रिण व्हावयास
हवी; पण आई-मुलीतील मैत्रीचे नाते
दुर्मिळ असू शकते.
आम्हा दोघींचे तसे
नाही. अशी कोणतीही
गोष्ट नसेल; जी
आम्ही एकमेकींजवळ सांगितली
नसेल! आमची मैत्री
अशीच राहो कायम!!.....
माझी भावजय
'कृपा' सुध्दा माझी चांगली
मैत्रिण आहे.
प्राणीसुध्दा आपले चांगले
मित्र असतात. आमच्याकडे
बाबांनी एक कुत्र्याचे
पिल्लू आणले होते.
आम्ही शाळकरी होतो
तेव्हा! त्याच्या सर्वांगावर ठिपके
होते म्हणून त्याचे
नाव 'स्पॉटी' ठेवले
होते. आमची घरी
येण्याची वेळ त्याला
माहीत होती. बरोब्बर
त्यावेळी तो अंगणात
येऊन उभा राहायचा!
आमच्या पावलांना गुदगुल्या करायचा.
कुत्रा फारच लोभस
होता. अचानक आजार
होऊन तो मरण
पावला. पुढे कित्येक
दिवस आमच्या मनाला
दुःखद हुरहूर लावून
गेला. आमचे चेहरे
सुतकी झाले, त्यावेळी!
आपण वापरत
असलेल्या वस्तूही आपल्या सख्या
असतात. शाळाकॉलेजात जातांना चालवलेली
सायकल आपली जीवाभावाची
असते. निर्जीव असली
तरी! या सख्यांची
यादी मोठी होत
जाते. पेन, पेन्सिल,
वह्या, पुस्तके सर्व आपले
सखे असतात. स्वयंपाकघरात
लागणाऱ्या वस्तू, आपले घरः-
जगात कुठेही फिरुन
आलो तरी घराची
ओढ काही औरच!
आजच्या Technology च्या युगात
अनेक whatsapp groupशी मी
संबंधित आहे. सर्वच
सखेसांगाती आहेत; पण त्यापैकी
'Moharirs' group ची शान काही
वेगळीच आहे. तो
आईच्या माहेरच्यांचा group आहे. अत्यंत
जिव्हाळ्याच्या आणि आदर
करावा अशा व्यक्ती
या group वर वास्तव्याला
असतात. त्यांच्या post वाचल्याशिवाय करमत नाही.
माझे मामा, मामी,
मावश्या, या सर्वांशी
या group मुळे सलोख्याचे
संबंध आहेत. माझे
भाऊ, माझे सुहृद
आहेत. माझे वडील,
माझे 'बापडू' होते.
मैत्रीचे नाते हे
फार व्यापक असते.
वैश्विक मैत्रीचे नाते तर
संत ज्ञानेश्वरांनी जोपासले!
विश्वालाच आपले 'घर' मानले!
'भूता परस्परे जडो
मैत्र जीवांचे' असे
'पसायदान' मागितले; स्वतःसाठी नाही
तर संपूर्ण विश्वाच्या
कल्याणासाठी!
वृंदावनातील 'तुळस' जीवाभावाची सखी
वाटते. छान फुललेली
तुळस मन प्रसन्न
करते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे
वनचरें, पक्षिणी सुस्वरें आळविती'-
असे म्हणणारे संत
तुकाराम; निसर्ग आपला मित्र
आहे व राहील
असे सुचवून जातात.
सर्वोच्च जिव्हाळ्याची भावना
ही मैत्रीची असते!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
७/८/२०१६.
No comments:
Post a Comment