आठवणींचं
काय सांगा, एका
डोळ्यांत आसू
तर दुसऱ्या डोळ्यांत हासू असते.
तर दुसऱ्या डोळ्यांत हासू असते.
आठवणींचं
काय सांगा,
झाडावरचं
प्रसन्न फूल दुसऱ्या
दिवशी कोमेजले असते.
आठवणींचं
काय सांगा, खळखळणारं
पाणी असते
कितीही खडकाळ प्रदेशातून स्वच्छ,
निर्मळ वाहत असते.
आठवणींचं काय सांगा, गुरुत्वाकर्षणाचा नियम कितीही
घोकला तरी माणूस
विसरला असतो,
उंच शिखरावरुन खालीच येणार असतो.
उंच शिखरावरुन खालीच येणार असतो.
आठवणींचं काय सांगा,
भूतकाळातल्या असल्या तरी वर्तमान
आणि भविष्यकाळातील दुवा
असते.
आठवणींचं
काय सांगा, 'गड
आला पण सिंह
गेला' हे सत्य
असते,
'उषःकाल होता होता काळरात्र झाली' याची प्रचिती येते
'अरे! पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' ने स्फुरण येते
आठवणींचा खजिना कधीच संपत नाही,
तो मनाच्या तळघरात सुखरुप असतो.
'उषःकाल होता होता काळरात्र झाली' याची प्रचिती येते
'अरे! पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' ने स्फुरण येते
आठवणींचा खजिना कधीच संपत नाही,
तो मनाच्या तळघरात सुखरुप असतो.
आठवणींचं
काय सांगा, अर्ध्या
रस्त्यावर पाऊस;
अर्धा रस्ता कोरडा असतो.
अर्धा रस्ता कोरडा असतो.
आठवणींचं काय सांगा, टाळ्यांचा गजर ऐकता
ऐकता दुःखाची विराणी
समोर येते;
ती ओसरते आणि पुन्हा यशाचा पडघम चालू होतो
मन कधीच स्वस्थ नसते धुंडाळत असते अनेक आयुष्य आणि सतत पुढेपुढेच जात असते;
सरता सरत नाही आणि पुरता पुरत नाही, किती सरमिसळ या आठवणी!!!.....
म्हणून सतत गोडवे गात असते.

मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१२/८/
२०१६.
No comments:
Post a Comment