Friday, 25 November 2016

गंधाली

   अगणित झाडे आणि वृक्षवेली
  असंख्य रंगीबेरंगी फुले खुलली
 दवबिंदूंच्या थराने न्हाऊन निघाली
कोवळी कोवळी ऊन किरणे पसरली
 सुगंधी दरवळाची ही सृष्टी गंधाली
 सृष्टी सौंदर्य बघता नयनें सुखावली

  जमती चिमण्या, जमती कावळे
जमती राघू, जमती मैना, जमती बगळे
 पक्ष्यांच्या थव्यांनी आसमंता बहर आली
विविधरंगी आकारांनी, विविधरंगी छटांनी
  आकाशावर पसरली लाली

   निसर्गरमणीय दृश्यांनी.....
     धरणी सुखावली
  प्राजक्त बहरला, आमराई मोहरली
  जाई, जुई, चमेली, शेवंती फुलली
  सुगंधी श्वासात रजनी गंधाळली
  चन्द्र, चांदण्यांनी रात तेजाळली
 दिवस दिव्य आणि रात्र स्वर्गीय वाटली
  निसर्गाची किमया सर्वदूर दाटली

  निसर्गाची विविधता ऋतूंनी जपली
  रात्रींनी प्रभातींना आलिंगनं दिली
 फुलाफुलांवर फुलपाखरे हळूवार बागडली
  घोड्यांच्या घोडदौडीने गतिमान झाली
  हरणांच्या कळपांनी रानें आनंदली
  सर्व प्राणी, पक्ष्यांनी परिपूर्णता आली
  भरलेपणाने भरलेल्या या निसर्गाने
    धरणीला समृध्दी आणली

 निसर्गाने मानवाला सुंदर सृष्टी भेट दिली
  सृष्टिसौंदर्याने नटलेली, बहरलेली
   जणू अप्सराच अवतरली
शान राखण्या माझी शपथ का हो तुम्ही घेतली???...
विनवणी करुन कळकळीची सृष्टी देवता बोलली
    निसर्ग आहे तर मानव आहे
    निसर्ग आहे तर सौंदर्य आहे
अस्तित्वाचे महत्त्व आपुले ती पटवून गेली.

     मृदुला मुकुंद पाटखेडकर.

          २५/११/२०१६.

No comments:

Post a Comment