जिथे जिथे
जात होतो
तिथे तिथे
'ती' उभी
कधी मी
अडखळलो,
कधी मी
ठेचकाळलो,
कधी मी
बावचळलो,
कधी मी
गांगरलो,
कधी मी
बावरलो,
बघायची ती मला
दूर अंतरावर उभी राहून
हसायची 'ती' मला
काय मजा
यायची तिला कुणास
ठाऊक??
फजिती माझी झाली
तर 'ती' व्हायची
नाही भावुक सत्त्वपरीक्षा
माझी सतत 'ती'
बघायची आसवे डोळ्यांत
माझ्या 'ती' मात्र
हसायची
आयुष्यातल्या
सुखक्षणी ती हजर
नसायची
सुखाच्या
क्षणांसोबत तिची कट्टी
असायची
दिसायची नाही तेंव्हा
'ती',
हसायची नाही तेंव्हा
'ती'
कुणी म्हणतं
असतेच 'ती'
कुणी म्हणतं
नसतेच 'ती'
अघोरी वेळेला येणारी
'ती'
अचानक धक्का देऊन
आयुष्याला
जणू वाटे सुखाला
धुक्यात घेऊन जाणारी
'ती'
स्वर्गीय सुखाचा आनंद
घेता घेता
अलगद भानावर
आणणारी 'ती'
दुःखाची वाट तयार
करणारी 'ती'
माहित नाही; खरंच असते
'ती'??....की नसते
'ती'??....
ललाटरेषेवर
रेघोट्या ओढत बसणारी
असावीच बहुधा नियती 'ती'.....!!!!!
नियती 'ती'.... नियती 'ती'.....!!!!!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२/१/२०१७.
No comments:
Post a Comment