२३
एप्रिल
हा
जागतिक
पुस्तक
दिवस.
हाच
दिवस
निवडण्याचं
एक
महत्वाचं
कारण
म्हणजे
श्रेष्ठ
जागतिक
नाटककार
शेक्सपिअर
यांची
जयंती
आणि
पुण्यतिथी
आजच्याच
दिवशी!!
आज
'world english day' सुध्दा आहे.
या
माणसानं
माणसं
वाचली.
माणसांच्या
जगाचे,
स्वभावाचे,
जाणिवांचे
कंगोरे
आणि
किनारे
शोधले.
एक
प्रकारे
शेक्सपिअरनं
माणसांच्या
स्वभाववैशिष्ट्यांच्या वेगवेगळ्या स्तरांचे मंथनच केले म्हणा ना!! आणि या मंथनातून निघालं शब्दांचं अमृत; जे त्यांनी प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या हाती सोपवलं आणि आजही अजरामर करुन ठेवलं.
आज
आपण
सर्व
भाग्यवान
आहोत.
आपल्या
आवडीच्या
विषयांवरची
पुस्तके
आपण
खरेदी
करु
शकतो.
आजच्या
इंटरनेटच्या
युगात
तर
'Digital Book Apps' उपलब्ध आहेत. जगातील कुठल्याही कानाकोप-यात राहणारी व्यक्ती, कोणत्याही विषयावरील पुस्तक एका click वर खरेदी करु शकते आणि वाचू शकते. पण...फार पूर्वी एकोणिसाव्या शतकात असं नव्हतं. बायकांनी पुस्तक वाचणं म्हणजे 'पाप' अशी स्थिती होती. याचा दाखला आपल्याला रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्रातून मिळतो. केर काढतांना हाती लागलेला कपटा त्या वाचत होत्या; तर घरातील आत्याबाईंनी सुनावलं, 'तुमचं हापिस माडीवर आहे, तिकडं जाऊन वाचा की नाचा. दादांनी पहिलीलापण लिहायला वाचायला शिकवलं होतं पण तिनं कध्धी आमच्यासमोर हाती कागद धरला नाही; असा ती आमचा मान राखी.'
काहीजण
निराशेच्या
सूरात
बोलतात;
'madam, आजकाल
कोण
एवढी
पुस्तकं
वाचतात?
लोकांचे
इंटरेस्ट
बदललेत'!!
या
वाक्याचा
अर्थ
मी
एवढाच
काढते
की,
या
लोकांना
पुस्तक
वाचनाची
आवड
नाही!!
मला
मात्र
असं
वाटत
नाही.
आता
वाचनकलेला
अफाट
महत्त्व
प्राप्त
झालंय.
वाचेल
तो
वाचेल
असं
आपण
सहज
म्हणू
लागलोय.
आता
'किंडल'
वर
वाचणं
अधिक
लोकप्रिय
होऊ
लागलं
आहे.
काहीजण
तर
न
वाचता,
पुस्तकं
नुसती
ऐकताहेत!!
त्यांचंही
ठीक
चाललं
आहे.
'पुस्तकं'
हा
कागदावर
उतरलेला
सुसंघटित
विचार
असतो;
त्यामुळे
ज्याला
काही
अर्थपूर्ण
वाचायचंय,
लिहायचंय
किंवा
ऐकायचंय
तो
अजून
पुस्तकांचा
आधार
घेत
राहणार!!
जो
वाचणार
नाही
तो
दिवसेंदिवस
ज्ञानाच्या
दृष्टीने
खंगत
जाणार!!
खचत
जाणार!!
इतर
शहरांचे
मला
ठाऊक
नाही.
पण
माझे
शहर
'अकोला'
येथील
ग्रंथालयांचे रुप आणि स्वरुप आता पूर्वीसारखे राहिले नाही. कथा, कविता, कादंबरी आणि पौराणिक ग्रंथांमध्ये रमण्याऐवजी आता नविन पिढी वाचनालयांकडे स्पर्धा परीक्षांचे हब - मार्गदर्शन केन्द्र म्हणून पाहते आहे. अकोल्यातील शासकीय जिल्हा ग्रंथालय, बाबूजी देशमुख वाचनालय, सानेगुरुजी वाचनालय, ठोंबरे वाचनालय, सम्यक संबोधी वाचनालयांचे स्वरुप काळानुसार बदलत आहे. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील गरीब कुटुंबातील मुले-मुली अकोल्यातील या ग्रंथालयातून ज्ञानार्जनाचे धडे गिरवत आहेत. अकोल्यातील सर्व वाचनालये विविध विषयांवरच्या उपलब्ध पुस्तकांमुळे समृध्द आहे. अनेक मोठमोठे आणि सुसज्ज हॉल; विद्यार्थ्यांना तासन्तास पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून सर्व सोयीसुविधांसह येथील coaching classes द्वारे उपलब्ध करुन दिली जातात. मला तर वाचन करत बसलेली व्यक्ती दिसायला सुंदर वाटते!! आवडीचे पुस्तक हातात!! निवांत वेळ!! रिडिंग कॉर्नर!! आणि आपण!! याशिवाय दुसरे काय हवे?...
पुस्तके
धुंडाळली
की
लेखकांचे
वाचनवेडाचे
किस्से
वाचायला
मिळतात.
मराठीतले
प्रसिध्द
लेखक
गंगाधर
गाडगीळ
यांना
वाचनाची
लहानपणापासून इतकी जबरदस्त ओढ होती की, त्यांनी रोज पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून शाळेच्या ग्रंथालयात 'ग्रंथपाल' म्हणून नोकरी केली. ते रात्रीही ग्रंथालयात पुस्तकं वाचत आणि तिथेच झोपी जात. 'वाचाल तर वाचाल' हा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तर जगातले सगळ्यात मोठे पुस्तकप्रेमी होते. कितीतरी विषयांचे ज्ञान त्यांनी पुस्तकांतून ग्रहण केले होते.
माझी
एक
मैत्रिण
होती.
तिच्या
भावाला
वाचनाची
खूप
आवड!!
ते
दोघेही
खेड्यांतून
अकोल्यात
शिकायला
आले
होते.
बरेचदा
तर
तिचा
भाऊ
केवळ
लायब्ररीत
वाचन
करता
यावे
म्हणून
कितीतरी
मैलांवरुन
सायकलिंग
करत
कॉलेजमध्ये
येई.
वाचनाची
अवीट
गोडी
लागण्यासारखा तर दुसरा छंद नाही!! ज्ञानाचे खुले भांडार पुस्तकांतूनच मिळणार!!
अनेक
विचारवंतांनी जास्तीतजास्त quotes पुस्तकांवर लिहिली आहेतः-
१)
"तुम्ही
पुस्तके
वाचत
असता,
तेव्हा
तुम्ही
एकटे
नसता."
- सुझन
वेग्स.
२)
ज्या
व्यक्तीकडे
ग्रंथालय
नसेल
त्याच्याकडे
भूतकाळ
आणि
भविष्यकाळही
नसतो.
- रे
बर्डबेरी.
३)
एक
पुस्तक,
एक
पेन,
एक
मूल
आणि
एक
शिक्षक
हे
जग
बदलू
शकतात.
- मलाला
युसुफजाई.
४)
पुस्तकांशिवाय घर हे आत्म्याशिवाय शरीरासारखे असते. - मार्क्स ट्युलिस सिसेरो.
५)
वाचनासाठी
आतुरलेला
ताजातवाना
माणूस
आणि
दिवसभर
थकून
वाचनासाठी
आतुरलेला
माणूस
यांच्यात
बराच
मोठा
फरक
असतो.
- गिल्बर्ट
खिसेंटोन.
६)
आयुष्यात
वाचलेले
पहिले
पुस्तक
आणि
आयुष्यातील
पहिले
प्रेम
यात
सारखाच
गोडवा
असतो.
- रॉबर्ट
अरिस
विलमोट.
वाचनप्रेमींच्या घरात एक असा खास कोपरा असतो; जिथे बसून केवळ ते त्यांच्या विश्वात मग्न राहतात. असे वाचनप्रेमी घरातील रिडिंग कॉर्नर इतर खोल्यांपेक्षा एकदम उठून दिसेल यासाठी प्रयत्न करतात. या खोलीत स्वतःची creativity वापरुन जुन्या टाकाऊ वस्तूंपासून टेबल, टायरपासून खुर्च्या, शेल्फ अशा विविध वस्तूंचा वापर करतात. कारण वाचनावरचं प्रेम आणि पुस्तकांची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. विविध पुस्तकांबरोबर अत्यंत आवडीने घेतली जाणारी वस्तू म्हणजे बुकमार्क. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक, बदलत्या Trends चे Bookmark मिळतात. वाचनप्रेमींना तेही खरेदी करण्याची हौस असते; कारण आवड असली की सवड मिळतेच!!
महाबळेश्वर,
पाचगणी
या
शहरांच्या
मध्यात
वसलेले
'भिलार'
गाव
strawberry च्या
विक्रमी
उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. आता हे गाव आणखी एका गोष्टीमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' हा उपक्रम याठिकाणी राबविला जात आहे. या गावातील मंदिराच्या शेजारी असणाऱ्या एका हॉलमध्ये वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील विविध विषयांवरची पुस्तके ठेवली जाणार आहेत. त्यामुळे वाचनवेड्यांना आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या ठिकाणी, हवा तेवढा वेळ वाचनाचा आनंद घेता येणार आहे. या सगळ्यातून सहजपणे वाचनकट्टे, कविकट्टे तयार होतील. 'पुस्तकांचे गाव' म्हणून नाव घोषित केल्यापासून 'भिलार' गावातील गावकरी वेगवेगळ्या स्तरावर आपापला कामाचा व्याप सांभाळून या उपक्रमाच्या तयारीला लागले आहेत. हे गाव नोंदणीकृत पाच हजार लोकसंख्येचे असले तरी, निवासी शिक्षणामुळे आणि प्रसिध्द पर्यटन व्यवसायामुळे नेहमीच गजबजलेले असते. प्रतापगड, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी फिरायला येणारे पर्यटक भिलारमध्ये राहण्याला प्राधान्य देतात. यामुळे strawberry ची शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच लॉजिंगचा व्यवसायही विकसित होत आहे. साहजिकच आता या उपक्रमाचा गावाला दुहेरी फायदा होणार असून पर्यटकांच्या माध्यमातूनही वाचन चळवळ विकसित होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे या गावाला एक वेगळा नावलौकिक मिळण्यास नक्कीच मदत होईल. अशीच अनेक गावं पुस्तकांची झाली तर....?? ज्ञानाची बहार येईल आणि मन उलगडायला शिकविणारी, आत्मविश्वास वाढविणारी, आयुष्यभर पुरुन उरेल अशा पुस्तकांच्या मैत्रीची दुनिया वाचनसंस्कृती निर्माण करील यात शंकाच नाही!!
आज
पुस्तक
दिनानिमित्त
अमिताभ
बच्चनने
ट्विटरवर
ट्विट
केलंयः-
"सिर्फ आज के ही दिन किताबें पढें, खरिदें ऐसा क्यों?? हम़ तो रोज़ किताबें पढते हैं?? ये किताब दिन क्या?? रोज़ ही किताब दिन होना चाहिए".....!!!
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२३/४/२०१७.
जागतिक
पुस्तक
दिन.
No comments:
Post a Comment