Friday, 2 June 2017

आला आला 'जून'


शुष्क, कोरड्या धरणीवर

जलधारांचे सडा शिंपण

आला आला जून

आला आला जून

 

वाट पाहण्या पावसाची

आसुसले होते मन

तप्त झळांची झळाळी

तहानले होते तनमन

 

आला आला जून

आला आला जून

होता त्याचे आगमन

ज्याला म्हणती 'मान्सून'

बहरेल भूमी, बहरेल शेती

फुलेल शेतकरी राजा

करुनी बीजांकुरांचे रोपण

हिरवाई येईल नटून थटून

 

आला आला जून

आला आला जून

 

हाती बांधूनी कष्टाचे कंकण

राबतील सारे पिकवून मोती

सुजल सुफल सजेल धरित्री

दिसामाजी अजून अजून

 

आला आला जून

आला आला जून

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

जून २०१७.

No comments:

Post a Comment