Monday, 12 June 2017

श्रीगणेशाय नमः


गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया

 

प्रथम वंदन तुला करु या

गजवदना तू विनायका

 

विघ्न, तापहर तू गणनायका

मंगलमूर्ती तू सुखदायका

 

दुर्वांकुर, जास्वंद, मोदक तुला प्रिय

दर्शन तुझे घेता चित्त माझे प्रसन्न होय

 

लंबोदरा, एकदंता, वक्रतुण्डा, गणाधीशा

सुबुध्दी सदा देऊनी तू

आयुष्याला मिळो दिशा

 

विद्या मिळो नवनवी सदा

सुखसंपन्न राहो आम्ही सदा

 

कलावंत, गुणवंत बनव....

आम्हाला तू गिरिजात्मका

 

मम हृदयी निज राहो...

तव नाम ठायी ठायी

श्रीगणेशा, तव नाम घेता....

दिनरात होवो मंगलमयी, तेजोमयी

मंगल सारे व्हाया कारण...

शरण आली तुझे पायी

 

भालचंद्रा, गजानना, शिव-पार्वती नंदना

काया, वाचा, मनें, नित्य करावी तुझी वंदना

महिमा तव नामाचा अल्पमती मी; वर्णू शकेना

 

उजळून निघो जीवन अमुचे....

तव भक्तीत, हे गजवदना....

नामजपाचे, भक्तीरसाचे तव...

अखंड फळ मिळो चाखाया

 

हाचि वर आम्हा देई तू वरदायका

रिध्दी-सिध्दीच्या वरा तू

सिध्दीविनायका रे, अष्टविनायका.....

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१२ जून २०१७.

*अंगारक संकष्ट चतुर्थी.*

No comments:

Post a Comment