सारं
काही
तुझ्याजवळ
झाडं,
पानं,
वेली
नि
फुलं
फुलाफुलांनी
गंधित
होणं
सारं
काही
तुझ्याजवळ
आकाशीच्या
रंगछटा
धरित्रीचा
हिरवा
बगिचा
सारं
काही
तुझ्याजवळ
प्रकाशकिरणांचं फाकणं
चन्द्र,
तारकांचं
चांदणं
सारं
काही
तुझ्याजवळ
झाडातले
खोपे
पक्ष्यांचे
रानातले
नाच
मयुरांचे
वनातले
कळप
हरणांचे
सारं
काही
तुझ्याजवळ
वाघांची
डरकाळी
पाखरांची
किलबिल
हत्तींचा
डामाडौल
सारं
काही
तुझ्याजवळ
नदीचं
खळखळणं
समुद्राचं
खवळणं
पावसाचं
बरसणं
सारं
काही
तुझ्याजवळ
मातीचा
सुगंध
ओला
सौदामिनीचा
कडाड
चपल
सारं
काही
तुझ्याजवळ
कुठे
प्रदेश
राकट
खडकाळ
प्रमाणवेळेत
चाले
रात्रंदिनीचा खेळ
सारं
काही
तुझ्याजवळ
पानांची
सळसळ
वा-याची झुळझुळ
किड्यांची
वळवळ
नादही
तुजला
लयही
तुजला
सूरही
तुजला
तालही
तुजला
सारं
काही
तुझ्याजवळ
रे
निसर्गा,......
सारं
काही
तुझ्याजवळ.
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२७/८/२०१७.
No comments:
Post a Comment