झाडे,
वेली बोलके
पान
अन् पान हले
कळीकळीची
कळकळ संपली
फुल
कळींतून उमले
दूर
रानीं एकटे पक्षी
सूर
कानीं पडे
पाऊस
आला पाऊस आला
भीती
अवकाळी सरे
गंध
ओल्या मातीचा
श्वासात
भरे
सरींवर
सरींचा
वर्षाव
करे
मनचिंब
पावसात भिजे
वावटळ
मनातली अघोरी
पावसाला
दिसे
ये
रे पावसा ये रे येरे
म्हणता
म्हणता आला हो
तुझ्यासाठी
आला
माझ्यासाठी
आला
सर्वांसाठी
आला
तापलेल्या
मातीसाठी आला
सरीसरींनी
कोसळत
नाचत
नाचत आला
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२५
जुलै २०१९.
No comments:
Post a Comment