यश दोन पावलांवर उभा
होता
पण
यशने अचानक एक पाऊल मागे
घेतलं आणि सगळे अंदाज
चुकले. सगळे निर्णय बदलले.
हुलकावणी देण्यात तर त्याचा हातखंडाच
असतो. दोन दिवसांपूर्वीच आई
म्हणाली, सेमी फायनल आणि
फायनल,...यश दोन पावलांवर
आहे. तिचंही बरोबरच होतं ना! टीम
इंडियाच्या आत्तापर्यन्तच्या विजयी वाटचालीवरुन वाटलं तिला,..यश दोन पावलांवर!!
पण मला वाटतं यश
हसला असेल फिदीफिदी! मला
मिळवणं सोपं नाही, माझी
दोन पावलं म्हणजे मोठा पहाड! इथेच
तर आहे क्षितिज!,...म्हणून
जाणारा तिथपर्यन्त जाईल आणि पुन्हा
त्याला मृगजळाचा भास होईल. आलं
दृष्टीपथात यश असं वाटत
असतानाच अपेक्षा येईल भंग करायला,
विश्वामित्राच्या तपश्चर्येत! बघितलेलं यशाचं स्वप्नं हरवून जाईल स्वप्नांच्याच दुनियेत!
इतकी अवघड असतात ही
दोन पावलं!! यश दोन पावलांवर
आहे, वाक्य उच्चारायला किती सोप्पं ना!!
पण प्रत्यक्षात किती किती पण
आहेत, जे जिंकावेच लागतात,
यश मिळवायचे असेल तर!! कारण
संधी एकदाच दार ठोठावते!
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
१०
जुलै २०१९.
No comments:
Post a Comment