झाडे,
वेली निःशब्द
पान
एकही हलेना
कळीकळीला
कळकळ ही
फुल
कळींतून उमलेना
दूर
रानीं एकटे पक्षी
सूर
कानीं पडेना
पाऊस
नाही, पाणी नाही
भीती
अवकाळी जाईना
गंध
ओल्या मातीचा
श्वासात
भरेना
सरींवर
सरींचा
वर्षाव
होईना
मनचिंब
पावसात भिजेना
वावटळ
मनातली अघोरी
पावसाला
दिसेना
ये
रे पावसा ये रे येरे
म्हणता
म्हणता येईना
तुझ्यासाठी
ये ना
माझ्यासाठी
ये ना
सर्वांसाठी
ये ना
तापलेल्या
मातीसाठी ये ना
सरीसरींनी
कोसळत
नाचत
नाचत ये ना
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२०
जुलै २०१९.
No comments:
Post a Comment