रोज
येतो नवा नवा
दिवस
रोजचाच हवा
नव्या
नव्या रोजनिशीत
आठवणींचा
जुना थवा
रोजनिशीतले
कागद कोरे
पृष्ठावरचे
चित्र हसरे
भरगच्च
शाईतले अक्षर गहिरे
वेधती
जुन्या खुणांचे धागेदोरे
अबोल
सा-या भावना
बोलक्या
होती संवेदना
मुक्याच
बरं काही वेणा
क्षीण
जाणिव मनांमनां
कालवाकालव
ही साहवेना
भार
हा तनमना सोसवेना
आठवणीँच्या
ऋणानुबंधा
रोजनिशीचे
पान पुरेना
रोज
येतो नवा नवा
दिवस
रोजचाच हवा
नव्या
नव्या रोजनिशीत
आठवणींचा
जुना थवा
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
४
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment