रस्ता
निर्मनुष्य
दिसतो
झाडे
निष्पर्ण
होतात
पक्षी
चोच
उघडतात
ऊन्हाच्या
झळा
अंगाची
लाही
लाही
करतात
सर्वदूर
कोरडे
पाषाण
ओलाव्यासाठी
झुरतात
थंडाव्यासाठी आसुसतात
सजीव
सावली
शोधतात
धनिक
पाणपोई
लावतात
गर्मीवर
मात
करण्या
थंडाईचे
मार्ग
काढतात
कुठेच
नसते
का
हो
हिरवळ?
कुठेच
नसतो
का
हो
बहर?
का
इतका
ऊन्हाचा
कहर??
नजर
शोधू
लागे
बहार...
अवचित
अचानक
दिसे
मग
फुललेला
तो
एक
गुलमोहर
हिरवी
हिरवीगार
इवलीशी
दाट
त्याची
पानें
स्पर्शता
ती
हिरवाई
हिरवी
होती
मनें
मोठी
दाट
त्याची
छाया
गारवा
मिळतसे
काया
निसर्गाची
किमया
बघा...
सा-या जगात उन्हाळा पेटतो
अन्
मग
हा
एकटाच
गुलमोहर
लाल
फुलाफुलांनी
दाटतो
जणू
शुष्क
धरित्रीवर
बहारदार
मोहर
उमटवितो
कोरड्या,
दुःखद
वाटांवर
रणरणत्या
ऊन्हाच्या
वाटेतही
सुखछायेची
आशा
जागवितो
गुलमोहर.
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
६
मे
२०१७.
No comments:
Post a Comment