Sunday, 14 May 2017

माझी आई


जीवनगाणे तू गातच राहिली हसतमुखाने आयुष्याला तोंड देत राहिली

दुःखाची भैरवी आळविता तू ,

रडगाणे कधीही गाता तू ,

जीवन संगीताची सुरेल तार छेडत राहिली

 

बाबांच्या आयुष्यातील काळोखाला

प्रकाशाची वाट तू दाखवत राहिली

ऊर्जेचे, कष्टाचे, ज्ञानाचे असीम सामर्थ्य तू,

आम्हां बळ आणि प्रेरणा देत राहिली

 

वात्सल्य तुझे अपार आभाळाएवढे

मन तुझे शुध्द निर्मळ पाण्यासारखे

कष्ट तुझे अपार संपणारे

सुख लाभण्या आम्हां तू सदा

झिजत राहिली

साध्या, भोळ्या वर्तनातून

आशय जीवनाचा देत राहिली

 

तुझी कधीच करु शकणार नाही मी बरोबरी

विद्यावंत, गुणवान विदुषी तू

अखंड वाचन, मनन, चिंतनाची खाण तू खरोखरी

 

जिथे जाशील तिथे मांडलीस तू यशाची वैखरी

सुकन्या, पत्नी, माता, सर्व भूमिका चपखल वठवित राहिली

कर्माच्या तालासुरांवर आयुष्याचा ठेका धरत राहिली

 

अतिशयोक्ती नाही म्हणत; पण मला मात्र,

मुकुंदाची 'गीता' तुझ्यात दिसत राहिली.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१४//२०१७

Mother's Day.

No comments:

Post a Comment