Sunday, 25 March 2018

विल्हेवाट

षंढ पणा नडला; वेळेवारी अभ्यास नाही केला!
जात होतो शाळेत; फक्त टवाळक्या उडाणटप्पूपणा करायला!
कृपा देवाचीच! होत होतो पास वार्षिक परीक्षेत कसाबसा!
दातांच्या कण्या केल्या आई-बाबांनी; सांगून सांगून अभ्यासाचे महत्व मला!
भविष्याची माझ्या; चिंता होती बहुतेक त्यांना!
धुंदीत मी माझ्याच होतो; 'अर्ध्या हळकुंडात पिवळा'!
वर्षे सरली! मिळाला प्रवेश अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रबंधक सहाय्यतेने!
पैसे भरपूर बाबांना मोजावे लागले!
मित्र, मैत्रिणी, खेळ; रुची ह्यातच सारी!
गणिती प्रमेये वृथा व्यर्थ वाटली!
सवंगडी सर्व लागले कामावर!
बॅच मागून आलेली; निघून पुढे गेली!
गुरफटून मात्र मी पडलो; ATKT वर ATKT च्या चक्रात!
वैतागलो! सोडले कॉलेज!
भांबावलो! बावचळलो! डिग्री नाही आणि नोकरीही नाही!
धावून आले वडील मदतीस!
करायला छोटा Business केले प्रवृत्त; भांडवल उभे करून!
करून दिले लग्न; ताळ्यावर ह्याला बायकोच आणेल म्हणून!
कसले काय अन कसले काय!
बुडाला Business! दिवाळे निघाले!
नाते-संबंध बायकोशीही संपले!
म्हातारे आई-वडील मला सांभाळणार कि मी त्यांना?
स्वतः साठी स्वतःच खड्डा खणला!
षंढ पणा नडला; वेळेवारी अभ्यास नाही केला!

अमोल पाटखेडकर
२५-मार्च-२०१८

No comments:

Post a Comment