Sunday, 25 March 2018

'राम' कुठे आहे?

जिथे ओढ पुत्रांस माता-पित्याची आहे; तिथे 'राम' आहे

जिथे सत्य वचनांची किंमत प्राणांहून अधिक आहे; तिथे 'राम' आहे

जिथे बंधुप्रेमात 'सावत्रपणा' नाही; तिथे 'राम' आहे
 
जिथे जीवश्च कंठश्च 'सख्य' आहे; तिथे 'राम' आहे

ठेवलेल्या 'रखेल्या' कैक असतील चरित्रहिनांच्या!!!

जिथे एकनिष्ठ एकपत्नी 'प्रेम' आहे; तिथे 'राम' आहे

 जिथे दुःखावेगातही देह देव्हारी शांत 'समई' लावली आहे; तिथे 'राम' आहे

 जिथे रोम-रोमांत 'चैतन्य' आहे; तिथे 'राम' आहे

जिथे मनांतल्या आसुरी आनंदाला 'प्रवेश' नाही; तिथे 'राम' आहे

 जिथे शुध्द आहे आचरण; तिथे वंदनीय चरण 'राम' आहे

 जिथे पराक्रमी तेजाची 'परिसीमा' आहे; तिथे 'राम' आहे

जिथे अपेक्षारहित 'परोपकार' आहे; तिथे 'राम' आहे

जिथे निष्पाप, निष्कपट निरागसता आहे; तिथे 'राम' आहे

 
जिथे 'कर्तव्य' संपन्नता आहे;तिथे 'राम' आहे

जिथे मर्यादशील 'पुरुषोत्तमांची' अमर्याद श्रृंखला आहे; तिथे 'राम' आहे

जिथे जनता जनार्दनाचं 'सरकार' आहे; तिथे 'राम' आहे

जिथे तत्त्वनिष्ठांचं अमर अधिष्ठान आहे; तिथे 'राम' आहे

 जगविणारा 'राम' आहे

घडविणारा 'राम' आहे

अंतःकरणाचा प्राण 'राम' आहे

आत्मस्वरुप 'राम' आहे

आत्मानंद 'राम' आहे

 
मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२५ मार्च २०१८.

श्रीरामनवमी.

No comments:

Post a Comment