Sunday, 25 March 2018

फाटकं नशीब

सटवीने लिहिले माझ्या ललाटी नशीब अवदसेचे!
राखरांगोळी, पालापाचोळा हेच काहीसेचे!
राखच हाती आली; रांगोळ्या पण विस्कटलेल्या!
ललाट रेषा फार; पण फक्त अंधूक धूसरलेल्या!

भंगलेली स्वप्ने, जळलेली नातीगोती; दुख्खी, खिन्न, विषण्ण मन!
उदास, भकास, सुतकी पायवाट; पायपीटही खिन्न!
वीटण्यालाही वीट येईल इतका आला नशिबी; वर्ष्यानुवर्षे फक्त कर्कश्य परामर्ष!
ओढाताण, ताटातूट; हाच जीवनमृत्यूमधील संघर्ष!

एकटलेल्या पडीक जमिनीवर; कसे उगवेल झाड!
व्यर्थ हा अपेक्षाभंगाचा जन्म-मृत्यूचा खेळ; होऊ दे मेळ मृत्यूला धाड!
गिळू दे कावळ्यांना ह्या छिन्नभिन्न देहाचे लचके; पण शिवणे कावळा पिंडाला नको!
राहू दे त्रिशंकू बनून; पण पुन्हा जन्म-मृत्यू मात्र नको!


अमोल पाटखेडकर
२५-मार्च-२०१८


No comments:

Post a Comment