Wednesday, 28 March 2018

मानवी कृष्ण

नव्हता देव कृष्ण खरोखरीच; परंतु मुसद्दी द्रष्टा!
चतुर राजनीतीज्ञ; युद्धनीती नियोजन प्रणेता!
कंस प्रताडता जनतेला; क्षत्रिय बाणा दाखवला!
उग्रसेन राज्यावर आता; कृष्ण मथुरेला विसावला!
मग्रूर जरासंध दुखावला; बघून दोन कन्या विधवा!
आक्रमणे मथुरेवर सतरा; त्राही त्राही जनता!
सुकर भविष्यासाठी; प्रस्थापित राजधानी द्वारकेला!
अपवाद समाज-नियमांचा; द्रौपदी वरे पाच पांडवा!
केला सहजच स्वीकार; कृष्णाने सखीच्या निर्णयाचा!
यशस्वी राजसूयासाठी युधिष्ठीरा; अनिवार्य काढणे काटा क्रूर जरासंधा!
निघाला मगधेला; घेऊनि भीमार्जुना!
हाथ टेकले जरासंधाने वृद्ध; शक्तीपुढे बलाढ्य भीमाच्या!
दर्पाचा काटा निघाला; न पारावार आनंदाला!
मुक्त केले अधिपती कारावासी ; पुत्र सहदेव जरासंधाचा, नूतन अधिपती मगधेचा!
नव्हते उद्दिष्ट बनणे राजा; पण प्रजा आणि राजकीय सुरक्षा!
मारले शिशुपालाला; राग अनावर होता, इंद्रप्रस्थाला!
हस्तिनापुरात द्युत; युद्धात कृष्ण गुंतलेला!
न थांबवू शकला; द्रौपदी वस्रहरणा!
प्रसंगी द्युत परत झाला; अनभिज्ञ तो त्याला!
पासा नशिबाचा उलटा पडला; वनवास नशिबी पांडवा आला!
न थांबवू शकला; पाशवी क्रौर्याला!
संपली तेरा वर्षे; पण कौरव विचार नाही बदलला!
देणे नको पांडवांना; सुईच्या अग्रटोकावर मावणाऱ्या जमिनीला!
शांतीचा पुरस्कर्ता; नियोजक समाजकंटकांचा!
न थांबवू शकला; मात्र युध्दाला!
सखा, सोबती, सारथी; तो अर्जुनाचा!
उपदेश केला त्याला; युध्दाला उभा केला!
गीतोपदेश काही नसे; फक्त कर्तव्याची जाणीव प्रेरणा!
उन्नत उद्दात्त विचार न्हवेत; संदेश व्यावहारिकतेचा!
गळपटलेल्या आत्म्याला; धग देणारी ऊर्जा!
बेरकी दूरदृष्टी जरी होती; भविष्यवेत्ता तरी न्हवता!
अन्यथा पांडवपुत्र वध; अश्वथ्थामा न करता!
शापाने गांधारीच्या; न झाला नायनाट यादवकुळाचा!
जवाबदार कृष्णच; त्या कृत्याला!
पुढे काय होईल; न्हवते अनुमान त्याला!
यादव सैन्य लढेल दोन्ही बाजूने; अनुमती दिली जेंव्हा!
ठिणगी यादवी वैमनस्याची पडली; निर्णय चुकला जेंव्हा!
अंत यादवकुळाचा; एकमेकांना मारण्यात झाला!
अवस्थेत विमनस्क; अरण्यात कृष्ण गेला!
बाणाने पारध्याच्या; अंत जीवनाचा केला!

अमोल मुकुंद पाटखेडकर
२८-मार्च-२०१८

No comments:

Post a Comment