Monday, 26 March 2018

आक्रोश

जे असून डोळे आंधळे; मेले पाहिजेत ते नेते!
होता तळपत सूर्य माथ्यावर; देशद्रोही जेंव्हा पळाले!
वरदहस्त ज्यांचा त्यांच्यावर; मोठा आहेर केला त्यांना!
खिदळले मनमोकळेपणाने नंतर; रोग समाज विस्मृतीचा फावला!

गिळणे फुकटाचे सवय ज्याला, त्या निष्क्रिय माजलेल्या कुत्र्याला; आणा ताळ्यावर, घाला सोटे!
कोण नोकर नि कोण मालक; त्याला उमजूदे!
कशाला रडावे त्या घुशीवर; जिने घर केले भुसभुशीत!
अंकुशाने घाव घाला; हत्तीला त्या उन्मत्त!

नको त्या विषारी सापाला; दुधाचे आंदण!
चावणे आणि फुत्कारणे; हाच स्वभावधर्म!
न्हवता तो कधीच तुमचा; न राहणार!
लांगुलचालन कशास मग ते; सत्य हे त्रिवार!

अकलेचा गोटा, बरळला बभ्रा सावरकराला!
निर्लज्याला ओढा; पाठवा काळ्यापाण्याला, कोलूला जुंपा!
नका दाखवू दयामाया गद्दारांना; खाल्ला ज्यांनी पैसा देशाचा!
शोधा त्यांच्या अणुरेणूंना; पडतील त्या कडावर हाणामारा, पर्वा करू नका!

हुरळून जाऊ नका; खुर्चीवर बसलेल्या बुडांच्या साखर वचनांना!
मिळमिळीत राहू नका; 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणा'!
निवडणुकीवर सर्व लक्ष्य; बरळतात फक्त खोट्या बाता!
आखीव-रेखीव सत्य एकच; कुणीच नसतो राजकारणात कुणाचा!

लोकसभा राज्यसभा ठप्प आहे; रस्ता अधोगतीचा!
अवमानच तर हा आहे; तुमच्या मातृभूमीचा!
उसासे तिच्या हुंदक्यांचे; ऐकू येतात अस्खलित!
आपण राहावे प्रामाणिक; मार्ग प्रगतीचा हा एकच अधोरेखित!


अमोल पाटखेडकर
२६-मार्च-२०१८

 

No comments:

Post a Comment