घाव भरत नाही, अवसर सोडत नाही
कोरडी
ममता, सद्गदित!
मिथ्योपचार
संपत नाही, मत्सर दुरावत नाही
पायात
काटा रुतत नाही, वास्तविकतेचा!
पाण्यात
मी पाहिले, जळले लक्षण मेले
दुसऱ्यास
काही न झाले, प्रतिकूल!
मेंदूचा
भार, ग्रंथांचे आभार
अंगीकारणे
विचार, अलिप्त!
प्रेषितांचे
प्रेषित, उद्गारतो अतिशुद्ध
अश्वांचे
नियंत्रण, शिथिल!
जुने ते सोने,
असे जरी खरे
नव्याचे बोलबाले,
यथायोग्य!
अन्य
केले, नगण्य ते होते
कर्म
मी केले, महाकठीण!
मोळीचा
बोझ, कण्याचा दोष
संचित
भोग, अनिवार्य!
भूतकाळ सावट,
वर्तमान प्रतिबिंब
ठरवे भविष्यकाळ
, प्रारब्ध!
अमोल पाटखेडकर
२५-मे-२०२१
No comments:
Post a Comment