कळेल कधीतरी शत्रुनांही
घाव घातला आपण भारतीयांच्या
उरी
पुरे झाल्या चर्चा
आणिक वाटाघाटी आजवरी
नकोच त्यांचे हस्तांदोलन, नकोच ते गोड बोलणे दुटप्पी आणि दुहेरी
...... कळेल कधीतरी
आम्हालाही.... !!
....... कळेल कधीतरी......
!!
जवानांचे बलिदान व्यर्थ
न जाईल खरोखरी
इथेच टाकून तंबू आम्ही उत्तर देऊ वरचेवरी
'साप म्हणू नये धाकला, शत्रू म्हणू नये आपुला'
याचीच प्रचिती येई 'त्यांना' पाहिल्यावरी
.....कळेल कधीतरी आम्हालाही...... !!
..... कळेल कधीतरी......... !!
सामोपचार नाही उपयोगाचा
दंडुक्याला दंडुका,
ठोश्यास ठोसा, जशास तसा,
हीच खरी जबाबदारी
तह नाही कामाचा, वर्चस्वाची
रणनीति अंगिकारी
...... कळेल कधीतरी आम्हालाही...... !!
...... कळेल कधीतरी आम्हालाही...... !!
....... कळेल कधीतरी....... !!
'जशास तसे' हाच मूलमंत्र
स्वीकारी
घाबरण्याची नाही जरुरी
मानू नका कुणाचीच मक्तेदारी
आम्हीच आहोत राजे अमुच्या ह्या दरबारी
हानी होणार नाही याची बाळगा सावधगिरी
..... कळेल कधीतरी आम्हालाही....... !!
....... कळेल कधीतरी........ !!
विजयाची उंच उंच पताका
फडकवू या गगनावरी
एकत्र सारे भारतीय येऊ, भेटू उराउरी
मनोबल खचवू शत्रूंचे आणिक धैर्यही
सामर्थ्य आपुले सारे दाखवू लय भारी
........ कळेल कधीतरी आम्हालाही..... !!
एकत्र सारे भारतीय येऊ, भेटू उराउरी
मनोबल खचवू शत्रूंचे आणिक धैर्यही
सामर्थ्य आपुले सारे दाखवू लय भारी
........ कळेल कधीतरी आम्हालाही..... !!
........ कळेल कधीतरी....... !!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२५/९/२०१६.
No comments:
Post a Comment