Monday, 13 February 2017

माझी बालभारती



सुंदर सुंदर विचारांची पखरण करणारी ती

सुंदर सुंदर कथा, काव्याची खाण ती

सुंदर सुंदर चित्रांनी सजलेली ती

मराठी भाषेची अवीट गोडी चाखवणारी ती

माझी बालभारती!! माझी बालभारती!!

 

कोमल बालमनांचा विचार करणारी ती

लहानपणीची माझी वाचनसखी ती

भाषेचे, साहित्याचे, वाचनाचे संस्कार करणारी ती

माझी बालभारती!! माझी बालभारती!!

 

सुवर्णमहोत्सवी वर्षातली सुवर्णभरारी ती

उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी ती

मोठमोठया कवी, लेखकांनी नावाजलेली ती

मोठमोठया कवी, लेखकांच्या लेखणीने सजलेली ती

माझी बालभारती!! माझी बालभारती!!

 

देश-विदेशी पोहोचलेली ख्याती ती

-लर्निंगद्वारे आजच्या काळासोबत चालणारी ती

व्यवस्थापन कौशल्याचा उच्चतम नमुना ती

अनेक भाषांमधून ज्ञान देणारी ती

माझी बालभारती!! माझी बालभारती!!

 

वास्तुसौंदर्याचा आदर्श नमुना ती

सर्वांना आकर्षून घेणारी प्रेक्षणीय स्थळ ती

किंमतीपेक्षा श्रेष्ठ दर्जाला मान देणारी ती

आयुष्यभर पुरुन उरेल असा आदर्शाचा परिपाठ ती

माझी बालभारती!! माझी बालभारती!!

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१३//२०१७.
 

No comments:

Post a Comment